एक्स्प्लोर

Pune Railway Station : पुणे रेल्वे स्थानकाची सुरक्षा आता AI च्या हाती; कशी असेल सुरक्षा?

आर्टिफिशियल इंटेलिजन्समार्फत (AI) आता पुणे रेल्वे स्थानकावर लक्ष ठेवण्यात येणार आहे. रेल्वे स्थानकावर अत्याधुनिक 'इंटरनेट प्रोटोकॉल कॅमेरे' बसवण्यात येणार आहेत.

पुणे : आर्टिफिशियल इंटेलिजन्समार्फत (AI) आता पुणे रेल्वे स्थानकावर लक्ष ठेवण्यात येणार आहे. रेल्वे स्थानकावर अत्याधुनिक 'इंटरनेट प्रोटोकॉल कॅमेरे' बसवण्यात येणार आहेत. AI कॅमेरे परिसरात संशयास्पद हालचालींवर नजर ठेवतील. संशयास्पद हालचाली आढळून आल्यास ते तात्काळ रेल्वे प्रशासनाला सतर्क करणार आहेत. आयओटी मार्फत ही सीस्टिम काम करणार आहे. प्रायोगिक तत्वावर ही उपाययोजना करण्यात येणार आहे. पुणे रेल्वे स्थानकावर सुरुवातीला 30 दिवसांसाठी प्रकल्प राबवण्यात येणार आहे.

केंद्रीय रेल्वे मंत्रालयानं आपल्या कामात प्रगत तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्यासाठी सुरुवात केली आहे. यासंदर्भात प्रत्येक विभागाकडून प्रस्ताव मागविण्यात आले होते. पुणे विभागाने असे सात आराखडे मुख्यालयात सादर केले होते. त्याच्या दक्षता यंत्रणेच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. 

रेल्वे स्टेशनवर इंटरनेट प्रोटोकॉल कॅमेरे बसवण्याचा हा प्रस्ताव असणार आहे. जिओ प्लॅटफॉर्मच्या जिओ थिंग्ज लिमिटेडने या कामाचे कंत्राट मिळवले आहे. डीआरएम इंदू राणी दुबे यांनी अंतिम मंजुरी दिल्यानंतर हा प्रकल्प सुरु करण्यात येणार आहे. चार इंटरनेट प्रोटोकॉल कॅमेरे एंट्री आणि एक्झिट गेट्स आणि तिकीट आरक्षण खिडक्यांवर बसवले जाणार आहेत.

शिवाय रेल्वे स्थानकाच्या परिसरात सध्या असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरा प्रणालीमध्ये जिओ ब्रिजची उपकरणं देखील असतील. यामुळे प्रवाशांची नेमकी संख्या आणि ते रांगेत आहेत की नाही याची मोजणी करणे सोपं होणार आहे. त्यासोबतच संशयास्पद हालचाली, तिकिटांचा काळाबाजार आणि बेकायदेशीर रांगा हे कॅमेरे टिपतील. अशा प्रथांना आता आळा बसू शकतो, असं जनसंपर्क अधिकारी रामदास भिसे यांनी सांगितलं आहे.

नजर कशी ठेवण्यात येणार?

रेल्वे स्थानकावरील प्रवाशांची संख्या कळेल. संशयास्पद हालचाली करणाऱ्या प्रवाशांचा माग काढला जाईल. तिकिटांचा काळाबाजार पकडला जाईल. अनधिकृत रांगा असू शकतात. इतर गैरप्रकार आढळून येऊ शकतात. पुणे रेल्वे स्थानकावर अत्याधुनिक इंटरनेट प्रोटोकॉल कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. ते त्याच्या परिसरात संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवतील. लवकरच हा प्रकल्प कार्यान्वित होणार आहे.

मागील काही दिवसांपासून पुणे स्टेशनवर अनेक घटना घडल्या आहेत. अनेकदा बॉम्ब सदृष्य वस्तू सापडल्याचंदेखील निदर्शनास आलं आहे . त्यासोबतच काही दिवसांपूर्वी पुण्यात दहशतवादीदेखील सापडले. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून AI मार्फत नजर ठेण्यात येणार आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या : 

Pune Accident : भावाला राखी बांधायला निघाली पण रस्त्यातच मृत्यूनं गाठलं; खडकवासला धरणात कोसळली कार, 16 वर्षीय मुलीचा मृत्यू, कुटुंब बचावलं!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Dharashiv Crime: आधी मृतदेह सोबत झोपला,आता महिलेसोबत अनैतिक संबंध अन पैशाचाही मॅटर;कळंब हत्या प्रकरणात आरोपीचा नवा खुलासा
आधी मृतदेह सोबत झोपला,आता महिलेसोबत अनैतिक संबंध अन पैशाचाही मॅटर;कळंब हत्या प्रकरणात आरोपीचा नवा खुलासा
राज्यात लवकरच 'श्री सिद्धिविनायक भाग्यलक्ष्मी योजना'; मुलींच्या नावे 10,000 रुपये, समितीच्या बैठकीत मंजुरी
राज्यात लवकरच 'श्री सिद्धिविनायक भाग्यलक्ष्मी योजना'; मुलींच्या नावे 10,000 रुपये, समितीच्या बैठकीत मंजुरी
Raj Thackeray : राज ठाकरेंचा हटके प्लॅन, मनसे सुरू करणार 'प्रति महापालिका', काय आहे संकल्पना?
राज ठाकरेंचा हटके प्लॅन, मनसे सुरू करणार 'प्रति महापालिका', काय आहे संकल्पना?
गुजरातमध्ये भीषण स्फोट, अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल; 10 ठार अनेक जखमी
गुजरातमध्ये भीषण स्फोट, अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल; 10 ठार अनेक जखमी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Dhananjay Deshmukh : केज पोलिसांच्या 'या' दोन चूका भावाच्या मृत्यूस कारणीभूतABP Majha Marathi News Headlines 2 PM TOP Headlines 2 PM 01 April 2025Kalamb Lady Death : कळंब महिला हत्या प्रकरणी दोघं अटकेत, आरोपी मृतदेहासोबत 2 दिवस त्याच खोलीत राहिलाProperty Purchase Rate : रेडी रेकनर वाढला, मालमत्ता खरेदी महागली; सरासरी 4.39 टक्के वाढ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dharashiv Crime: आधी मृतदेह सोबत झोपला,आता महिलेसोबत अनैतिक संबंध अन पैशाचाही मॅटर;कळंब हत्या प्रकरणात आरोपीचा नवा खुलासा
आधी मृतदेह सोबत झोपला,आता महिलेसोबत अनैतिक संबंध अन पैशाचाही मॅटर;कळंब हत्या प्रकरणात आरोपीचा नवा खुलासा
राज्यात लवकरच 'श्री सिद्धिविनायक भाग्यलक्ष्मी योजना'; मुलींच्या नावे 10,000 रुपये, समितीच्या बैठकीत मंजुरी
राज्यात लवकरच 'श्री सिद्धिविनायक भाग्यलक्ष्मी योजना'; मुलींच्या नावे 10,000 रुपये, समितीच्या बैठकीत मंजुरी
Raj Thackeray : राज ठाकरेंचा हटके प्लॅन, मनसे सुरू करणार 'प्रति महापालिका', काय आहे संकल्पना?
राज ठाकरेंचा हटके प्लॅन, मनसे सुरू करणार 'प्रति महापालिका', काय आहे संकल्पना?
गुजरातमध्ये भीषण स्फोट, अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल; 10 ठार अनेक जखमी
गुजरातमध्ये भीषण स्फोट, अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल; 10 ठार अनेक जखमी
ब्रेड खाण्याची योग्य वेळ कोणती?
ब्रेड खाण्याची योग्य वेळ कोणती?
Maharashtra Goverment : आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दिवशी शासन निर्णयांचा धडाका; रात्री उशीरापर्यंत मंत्रालयात काम सुरु, 290 शासन निर्णय जारी 
आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दिवशी शासन निर्णयांचा धडाका; रात्री उशीरापर्यंत मंत्रालयात काम सुरु, 290 शासन निर्णय जारी 
Anjali Damania & Dhananjay Munde: धनंजय मुंडे पंकजांच्या 'त्या' फाईल्स घेऊन माझ्याकडे आले होते; अंजली दमानियांचा सनसनाटी दावा
धनंजय मुंडे पंकजांच्या 'त्या' फाईल्स घेऊन माझ्याकडे आले होते; अंजली दमानियांचा सनसनाटी दावा
Nashik News : कुंभमेळा नामकरणाच्या वादानंतर नाशिकमध्ये नवा वाद उफाळला, 'मोदी मैदाना'वरून शरद पवार गट आक्रमक, केली मोठी मागणी
कुंभमेळा नामकरणाच्या वादानंतर नाशिकमध्ये नवा वाद उफाळला, 'मोदी मैदाना'वरून शरद पवार गट आक्रमक, केली मोठी मागणी
Embed widget