एक्स्प्लोर

Pune Crime News: भाजप कार्यकर्त्यांना मारहाण केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक सचिन दोडके यांच्यावर गुन्हा दाखल

पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक सचिन दोडके यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारहाण तसेच शिवीगाळ करून धमकी दिल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

Pune Crime News: पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक सचिन दोडके यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारहाण तसेच शिवीगाळ करून धमकी दिल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. दोडके यांच्यासह 5-6 कार्यकर्त्यांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. वारजे पोलीस ठाण्यात भाजपचे कार्यकर्ते वासुदेव भोसले यांनी तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी कारवाई केली आहे. पुणे शहरातील वारजे भागात गेल्या अनेक वर्षांपासून सचिन दोडके नगरसेवक आहेत.

तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीनुसार, मंगळवारी संध्याकाळी 7:30 वाजता वारजे भागात असलेल्या आरएमडी कॉलेज ते साई सयाजी नगर येथे एक अंडरपस (बोगदा) आहे. त्या ठिकाणी खडकवासला लोकसभा मतदारसंघाचे आमदार भीमराव तापकीर यांच्या निधीतून काही काम चालू असलेल्या ठिकाणी सचिन दोडके, संजय दोडके आणि त्यांचे इतर कार्यकर्ते पोहचले. त्यांनी फिर्यादी यांना शिवीगाळ करायला सुरुवात केली आणि यातच संजय दोडके यांनी हातात बांबू घेऊन फिर्यादी यांच्या अंगावर जाऊन जिवे मारण्याची धमकी दिली. तिथे सुरू असलेल्या कामगारांना सुद्धा मारहाण केल्याचा आरोप फिर्यादी यांनी केला आहे.

सचिन दोडके मागील अनेक वर्षांपासून नगरसेवक

सचिन दोडके हे मागील अनेक वर्षांपासून वारजे परिसरात नगरसेवक आहे. सचिन दोडेक हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांचे निकटवर्तीय म्हणून देखील ओळखले जातात. त्यामुळे त्यांनी नेमकी का मारहाण केली? याचा तपास पोलीस करत आहे. मात्र राजकारणाऱ्यांनीच अशा प्रकारे दहशत निर्माण केल्यास लोकप्रतिनिधींवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. 

सुप्रिया सुळेंची डोकेदुखी वाढली...

राष्ट्रवादीचे पुण्यात अनेक नगरसेवक आहेत. प्रत्येक भागात हे सगळे नगरसेवक कम करतात. यातील अनेक नगरसेवक खासदार सप्रिया सुळेंचे निकटवर्तीय आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक नगरसेवक काम करत असतात. आता त्यांच्याच निकटवर्तीयावर गुन्हा दाखल झाल्याने सुप्रिया सुळे यांची डोकेदुखी वाढली आहे.

पुण्यात गुन्हेगारीत वाढ

पुण्यात मागील अनेक दिवसांपासून पुण्यात गुन्हेगारीत वाढ झाली आहे. काही क्षृल्लक कारणांवरुन वादावादी निर्माण करुन दगशत निर्माण करण्याचे प्रकार पुण्यातून समोर येत आहे. त्यात राजकारणी आणि लोकप्रतिनिधींचादेखील समावेश आहे. कालच चहावरुन झालेल्या वादातून एका व्यक्तीवर धारदार शस्त्राने वार केले होते. त्यानंतर एकावर गुन्हादेखील दाखल करण्यात आला होता. क्षृल्लक कारणावरुन होणारे वाद सध्या अनेक परिसरात दहशत परसवत असल्याचं दिसत आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Manoj Jarange Patil: मनोज जरांगे पुन्हा मैदानात, हिंगोलीत मराठा महाएल्गार संवाद रॅलीच्या तयारीला वेग, शहरातील चौकाचौकात 200 भोंगे लागणार
मनोज जरांगे पुन्हा मैदानात, हिंगोलीत मराठा महाएल्गार संवाद रॅलीच्या तयारीला वेग, शहरातील चौकाचौकात 200 भोंगे लागणार
Monalisa Net Worth : कधी दिवसरात्र काम करून कमवायची 120 रुपये, 'ही' अभिनेत्री आहे कोट्यधीश...
कधी दिवसरात्र काम करून कमवायची 120 रुपये, 'ही' अभिनेत्री आहे कोट्यधीश...
Shatrughan Sinha :  रुग्णालयात दाखल का व्हावे लागलं?  शत्रुघ्न सिन्हांनी सांगितले कारण, सोनाक्षीच्या लग्नावर सोडलं मौन
रुग्णालयात दाखल का व्हावे लागलं? शत्रुघ्न सिन्हांनी सांगितले कारण, सोनाक्षीच्या लग्नावर सोडलं मौन
Deepika Padukone : 'मॉम टू बी' दीपिका पदुकोणची पती रणवीरसह मुव्ही डेट, पाहा फोटो
'मॉम टू बी' दीपिका पदुकोणची पती रणवीरसह मुव्ही डेट, पाहा फोटो
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Bhole Baba Hathras : हाथरस दुर्घटनेत मृतांचा आकडा वाढला; 121 जणांचा जीव गेला9 Second News : 9 सेकंदात बातमी राज्यातील बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर ABP MajhaPregnancy Food Sangli : सांगलीतील पलूसमध्ये गरोदर माता पोषण आहारात मृत सापABP Majha Headlines :  9:00AM : 3 July 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Manoj Jarange Patil: मनोज जरांगे पुन्हा मैदानात, हिंगोलीत मराठा महाएल्गार संवाद रॅलीच्या तयारीला वेग, शहरातील चौकाचौकात 200 भोंगे लागणार
मनोज जरांगे पुन्हा मैदानात, हिंगोलीत मराठा महाएल्गार संवाद रॅलीच्या तयारीला वेग, शहरातील चौकाचौकात 200 भोंगे लागणार
Monalisa Net Worth : कधी दिवसरात्र काम करून कमवायची 120 रुपये, 'ही' अभिनेत्री आहे कोट्यधीश...
कधी दिवसरात्र काम करून कमवायची 120 रुपये, 'ही' अभिनेत्री आहे कोट्यधीश...
Shatrughan Sinha :  रुग्णालयात दाखल का व्हावे लागलं?  शत्रुघ्न सिन्हांनी सांगितले कारण, सोनाक्षीच्या लग्नावर सोडलं मौन
रुग्णालयात दाखल का व्हावे लागलं? शत्रुघ्न सिन्हांनी सांगितले कारण, सोनाक्षीच्या लग्नावर सोडलं मौन
Deepika Padukone : 'मॉम टू बी' दीपिका पदुकोणची पती रणवीरसह मुव्ही डेट, पाहा फोटो
'मॉम टू बी' दीपिका पदुकोणची पती रणवीरसह मुव्ही डेट, पाहा फोटो
सावधान! कोकणसह विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा, आज संपूर्ण राज्यात कसं असेल हवामान?
सावधान! कोकणसह विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा, आज संपूर्ण राज्यात कसं असेल हवामान?
Hathras Stempede: पोलीस खात्यात नोकरी, पण अचानक देवाचा दृष्टांत अन्...; हाथरसमध्ये सत्संग भरवणाऱ्या भोले बाबांची फिल्मी कहाणी
पोलीस खात्यात नोकरी, पण अचानक देवाचा दृष्टांत अन्...; हाथरसमध्ये सत्संग भरवणाऱ्या भोले बाबांची फिल्मी कहाणी
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
Kamal Haasan Movie : कमल हासनचा 'तो' चित्रपट, ज्याने दोन वर्ष थिएटरमध्ये ठोकला होता तळ!
कमल हासनचा 'तो' चित्रपट, ज्याने दोन वर्ष थिएटरमध्ये ठोकला होता तळ!
Embed widget