एक्स्प्लोर

Pune Mango News : महाराष्ट्रातील हापूस आंबे समुद्रामार्गे जपान अन् अमेरिकेत रवाना

राज्यात उत्पादित होणाऱ्या आंब्याला विकसित देशांची बाजारपेठ उपलब्ध होण्याकरिता, निर्यातीसाठी आवश्यक असलेल्या सर्व सोयीसुविधा महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाने उपलब्ध करुन दिल्या आहेत.

Pune Mango News :  आंबा हंगाम 2023 मध्ये (Mango) राज्यात उत्पादित होणाऱ्या आंब्याला विकसित देशांची बाजारपेठ उपलब्ध होण्याकरिता निर्यातीसाठी आवश्यक असलेल्या सर्व सोयीसुविधा महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाने उपलब्ध करुन दिल्या आहेत. त्याअंतर्गत 8 एप्रिल रोजी जपानला आणि 11 एप्रिल रोजी अमेरिकेला पहिला आंबा पाठविण्यात आला. त्यामुळे पुण्यातील आंब्याची चव आता जपान आणि अमेरिकेतील नागरिक चाखू शकणार आहे

महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या वाशी, नवी मुंबई येथील व्हेपर हीट ट्रिटमेंट सुविधेवरुन 8 एप्रिल 2023 रोजी केशर आणि बैगनपल्ली असा एकूण 1.1 मेट्रिक. टन आंबा जपानला रवाना करण्यात आला. अशाचप्रकारे 11 एप्रिल रोजी मंडळाच्या वाशी येथील विकिरण सुविधा केंद्रावरुन 6.5  मेट्रिक. टन  हापूस, केशर आणि बैगनपल्ली या आंब्याची पहिली कन्साईनमेंट अमेरिका येथे निर्यात करण्यात आली.

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरातील मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळ, बंदराचे फळे आणि भाजीपाला निर्यातीसाठी असलेले स्थान महत्व लक्षात घेता कृषी पणन मंडळाने आंतरराष्ट्रीय पातळीवर आवश्यक निकषांची पूर्तता करुन निर्यातभिमुख विकिरण सुविधा, भाजीपाला प्रक्रिया केंद्र आणि व्हेपर हीट ट्रीटमेंट या अद्ययावत सुविधांची उभारणी वाशी, नवी मुंबई येथे करण्यात आलेली आहे.

सर्व प्रक्रिया केलेले आंबे रवाना

जपान, न्युझीलंड, दक्षिण कोरिया, युरोपियन देश तसेच रशिया या आयातदार देशांच्या निकषान्वये निर्यातीपूर्वी आंब्यावर व्हेपर हीट ट्रिटमेंट प्रक्रिया करणे बंधनकारक आहे. फळमाशी (फ्रूट फ्लायचा) चा होणारा प्रादुर्भाव नष्ट होण्यासाठी ही प्रक्रिया केली जाते. कृषी पणन मंडळाच्या अद्ययावत अशा व्हेपर हीट ट्रिटमेंट सुविधेमुळे हे शक्य झाले आहे. आंबा हंगाम-2022 पासून जपानने त्यांचे निरीक्षक न पाठविता केंद्र शासनाच्या एनपीपीओ विभागाच्या निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सर्व प्रक्रिया करून आणि प्रक्रियेचे प्रमाणीकरण करुन आंबा आयातीस परवानगी दिली आहे.

अमेरिका, ऑस्ट्रेलिया, मलेशिया, अर्जेंटीना या आयातदार देशांच्या निकषान्वये निर्यातीपूर्वी आंब्यामधील कोयकिडा आणि किटकांचे निर्मुलन करण्याकरिता विकिरण प्रक्रिया बंधनकारक आहे. कृषि पणन मंडळामार्फत निर्यातदारांच्या मागणीनुसार राष्ट्रीय कृषी विकास योजना व अपेडा यांच्या सहकार्याने विकिरण सुविधा केंद्राची वाशी येथे उभारणी करण्यात आल्यामुळे ही सोय झाली आहे. विकिरण सुविधेवर कोबाल्ट-60  किरणांचा विकीरणासाठी वापर केला जातो.

या सुविधेकरीता आवश्यक असलेले भारत सरकारचे एनपीपीओ, अणुउर्जा नियामक मंडळ, अणुउर्जा विभाग भारत सरकार आदी प्रमाणीकरण पूर्ण करुन सदर सुविधा अमेरीकेच्या आंबा निर्यातीसाठी आवश्यक असलेले युएसडीए- एफीस या संस्थेचे प्रमाणीकरण पूर्ण करण्यात आले.  सुविधेवर विकिरण प्रक्रिया करताना अमेरिकेचे निरीक्षक प्रत्यक्ष उपस्थित असतात. अमेरीकेकरिता आंब्याची पहिली कन्साईनमेंट कृषी पणन मंडळाचे कार्यकारी संचालक दिपक शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये मंगळवारी रवाना झाली.

समुद्राद्वारे आंबा अमेरिकेत...

गेल्यावर्षी अमेरिकेला समुद्रामार्गे आंबा निर्यात यशस्वीपणे प्रायोगिक तत्वावर करण्यात आलेली होती. आंबा हंगाम-2023 मध्येदेखील व्यावसायिकदृष्ट्या आंबा निर्यात समुद्रमार्गे करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.  पणन मंडळाच्या आंबाविषयक सर्व सुविधा संगणक प्रणालीद्वारे मॅगोनेटमध्ये नोंदणीकृत शेतकऱ्यांसमवेत आणि पॅकहाऊससमवेत लिंकिंग झालेल्या आहेत. यामुळे आयातदारास आंब्याच्या गुणवत्तेबाबत खात्री मिळत असून निर्यातवृद्धीस मदत होत आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Chandrapur Mayor Election 2026 : चंद्रपुरात ठाकरेंच्या शिवसेनेमुळे भाजपचा महापौर; काँग्रेसचा अवघ्या एका मताने पराभव; पक्षश्रेष्ठींचा आदेश न जुमानाऱ्यांवर वंचितकडून कारवाई
पक्षश्रेष्ठींचा आदेश असताना वंचितच्या नगरसेवकांची ऐनवेळी अनुपस्थिती; चंद्रपुरात काँग्रेसचा एका मताने पराभव, वंचितच्या शहराध्यक्षावर कारवाई
Mumbai Pune Expressway: प्रोपिलीन टँकरबाहेरील बर्फाला ड्रायव्हरने स्पर्श केला, दोन्ही हात भाजले, पेरुच्या झाडापासून बनलेल्या खुट्टीने हजारो प्रवाशांचा जीव वाचला
प्रोपिलीन टँकरबाहेरील बर्फाला ड्रायव्हरने स्पर्श केला, हात भाजले, पेरुच्या झाडापासून बनलेल्या खुट्टीने हजारो प्रवाशांचा जीव वाचला
Photo : अर्जुनच्या लग्नाचे निमंत्रण, सचिन तेंडुलकरची दिल्लीवारी
Photo : अर्जुनच्या लग्नाचे निमंत्रण, सचिन तेंडुलकरची दिल्लीवारी
Maharashtra Live blog updates: मुंबईत 10 कोटींचं सोनं वितळवून विकायला आणलं, काळबादेवीत पोलिसांनी दोघांना सापळा रचून पकडलं
Maharashtra Live blog updates: मुंबईत 10 कोटींचं सोनं वितळवून विकायला आणलं, काळबादेवीत पोलिसांनी दोघांना सापळा रचून पकडलं

व्हिडीओ

Govinda Politics : राजकारण पुरे झालं असं गोविंदा का म्हणाला? Special Report
Revati Sule : सुप्रिया सुळेंच्या कन्या रेवती सुळेंचं लग्न ठरलं? Special Report
Rahul Gandhi at Loksabha : संसदेत तिसऱ्या दिवशी तरी वादाची कोंडी फुटली की नाही? Special Report
Raj Thackeray Tweet On RSS : राज ठाकरेंचे मोहन भागवतांना पत्र Special Report
Sunetra Pawar : सुनेत्रा पवारांनी स्वीकारला पदभार, आठवणींचा गहिवर Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chandrapur Mayor Election 2026 : चंद्रपुरात ठाकरेंच्या शिवसेनेमुळे भाजपचा महापौर; काँग्रेसचा अवघ्या एका मताने पराभव; पक्षश्रेष्ठींचा आदेश न जुमानाऱ्यांवर वंचितकडून कारवाई
पक्षश्रेष्ठींचा आदेश असताना वंचितच्या नगरसेवकांची ऐनवेळी अनुपस्थिती; चंद्रपुरात काँग्रेसचा एका मताने पराभव, वंचितच्या शहराध्यक्षावर कारवाई
Mumbai Pune Expressway: प्रोपिलीन टँकरबाहेरील बर्फाला ड्रायव्हरने स्पर्श केला, दोन्ही हात भाजले, पेरुच्या झाडापासून बनलेल्या खुट्टीने हजारो प्रवाशांचा जीव वाचला
प्रोपिलीन टँकरबाहेरील बर्फाला ड्रायव्हरने स्पर्श केला, हात भाजले, पेरुच्या झाडापासून बनलेल्या खुट्टीने हजारो प्रवाशांचा जीव वाचला
Photo : अर्जुनच्या लग्नाचे निमंत्रण, सचिन तेंडुलकरची दिल्लीवारी
Photo : अर्जुनच्या लग्नाचे निमंत्रण, सचिन तेंडुलकरची दिल्लीवारी
Maharashtra Live blog updates: मुंबईत 10 कोटींचं सोनं वितळवून विकायला आणलं, काळबादेवीत पोलिसांनी दोघांना सापळा रचून पकडलं
Maharashtra Live blog updates: मुंबईत 10 कोटींचं सोनं वितळवून विकायला आणलं, काळबादेवीत पोलिसांनी दोघांना सापळा रचून पकडलं
Mumbai Crime News : सोनं तस्करी रॅकेटचा पर्दाफाश, मुंबईच्या काळबादेवीतुन दोघांना अटक, तब्बल 10 कोटींचं सोनं जप्त
सोनं तस्करी रॅकेटचा पर्दाफाश, मुंबईच्या काळबादेवीतुन दोघांना अटक, तब्बल 10 कोटींचं सोनं जप्त
कामगार बापाकडे पैशांची मागणी, 11 हजारांची लाच घेताना सेतू केंद्रचालकास रंगेहात बेड्या ठोकल्या
कामगार बापाकडे पैशांची मागणी, 11 हजारांची लाच घेताना सेतू केंद्रचालकास रंगेहात बेड्या ठोकल्या
''राम सातपुतेंच्या हत्येचा कट रचला गेला होता''; मंत्री जयकुमार गोरेंचा गंभीर आरोप, साताऱ्यातील पराभवावरही बोलले
''राम सातपुतेंच्या हत्येचा कट रचला गेला होता''; मंत्री जयकुमार गोरेंचा गंभीर आरोप, साताऱ्यातील पराभवावरही बोलले
मुंबईत DRI ची मोठी कारवाई, झवेरी बाजारातून 5.8 किलो सोनं जप्त, वितळवण्याची मशिनही ताब्यात, किंमत किती?
मुंबईत DRI ची मोठी कारवाई, झवेरी बाजारातून 5.8 किलो सोनं जप्त, वितळवण्याची मशिनही ताब्यात, किंमत किती?
Embed widget