एक्स्प्लोर
पुण्यात अंगावर फरशा पडून दोन कामगारांचा मृत्यू
पुण्यात इमारतीचं बांधकाम सुरु असताना फरशा कोसळल्याने त्याखाली दोन कामगार दबले गेले. मात्र त्यांना रुग्णालयात दाखल करेपर्यंत त्यांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.

पुणे : पुण्यात इमारतीचं बांधकाम सुरु असताना झालेल्या अपघातात दोन कामगारांचा मृत्यू झाला. फरशीखाली दबून दोन कामगारांना प्राण गमवावे लागले.
पुण्यातील येरवडा पोलिस स्टेशनच्या हद्दीतील बोट क्लब रस्त्यावर एका इमारतीचं काम सुरु आहे. या ठिकाणी मोठ्या फरशांची ने-आण करत असताना काही फरशा कामगारांच्या अंगावर कोसळल्या.
फरशांखाली दबल्या गेलेल्या कामगारांना तातडीने बाहेर काढून रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र दोघांचाही मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. आज सकाळी दहा वाजताच्या सुमारास ही घटना घडली.
मृत्युमुखी पडलेल्या दोन्ही कामगारांची ओळख अद्याप पटली नाही. अग्निशमन दलाचे जवान आणि पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत.
आणखी वाचा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
यवतमाळ
व्यापार-उद्योग
क्रीडा
व्यापार-उद्योग
Advertisement
Advertisement


















