एक्स्प्लोर

Pune Helmet day : हेल्मेट का वापरत नाही? शासकीय कर्मचाऱ्यांनी वाचला भन्नाट कारणांचा पाढा; पोलिसांची धकड कारवाई

शासकीय कर्मचारी हेल्मेट वापरत नसल्याचं आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे. मात्र कर्मचारीदेखील पुणेकरच. त्यामुळे त्यांनी पोलिसांसमोर हेल्मेट न घातल्याची वेगवेगळी भन्नाट कारणं सांगितली आहेत. 

Pune Helmet day :  रस्ता सुरक्षा वाढवण्यासाठी आणि रस्ते अपघातांच्या वाढत्या संख्येला आळा घालण्यासाठी आजपासून सलग तीन दिवस पुण्यात हेल्मेट जनजागृतीची मोहीम राबविण्यात येणार आहे. पुण्यातील शासकीय कार्यालयात हेल्मेट जनजागृती करण्यात येत आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये हेल्मेट न वापरणाऱ्यांवर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी पुण्यातील अनेक शासकीय कार्यलयाच्या बाहेर पोलीस बंदोबस्त करण्यात आला आहे. शासकीय कर्मचारी हेल्मेट वापरत नसल्याचं आढळल्यास त्यांच्यावर  कारवाई करण्यात येत आहे. मात्र कर्मचारीदेखील पुणेकरच. त्यामुळे त्यांनी पोलिसांसमोरच हेल्मेट न घातल्याची वेगवेगळी भन्नाट कारणं सांगितली आहेत. 

यापूर्वी, वाहतूक पोलीस मोटारसायकलस्वारांना चौकाचौकात थांबवायचं आणि रस्त्यावर उभे राहून हेल्मेट वापरण्याची अंमलबजावणी करायचे. मात्र, पुण्यातील विरोधामुळे या भागातील अंमलबजावणीची कारवाई रखडली आहे. सध्या हेल्मेटची अंमलबजावणी प्रामुख्याने सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून केली जाते.हेल्मेट वापराबाबत जनजागृती करण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून आज (24 मे रोजी) पुण्यात "लाक्षणिक हेल्मेट दिन" साजरा केला जात आहे. याशिवाय, शहरातील प्रमुख शासकीय कार्यालयांसमोर हेल्मेट न घालणाऱ्या दुचाकीस्वारांवर कठोर कारवाई केली जात आहे.

कोणती कारणं दिली?

  • रोज हेल्मेट घालतो आज विसरलो.
  • घरातून निघायला उशीर झाला.
  • महिनाअखेर असल्याने हेल्मेट घेण्यास तेवढे पैसे देखील नाही, आता पेमेंट झाले की हेल्मेट घेणार आहे.
  • कार्यालयातून हेल्मेट चोरी गेलं. 
  • हेल्मेट घातल्याने मान दुखते म्हणून हेल्मेट घालत नाही.

शासकीय कर्मचाऱ्यांना आवाहन

दुचाकीस्वारांमुळे वारंवार अपघात होत असल्याने हेल्मेटच्या महत्त्वाबाबत जनजागृती करण्यासाठी 24 मे रोजी “लाक्षणिक हेल्मेट दिन” साजरा करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी केले होते. त्यात सुरुवातीला सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना हेल्मेट घालण्यासाठी प्रोत्साहन देण्यात आले आहे. सुरुवातीला जनजागृती करणे आणि सरकारी कार्यालयात येणाऱ्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना हेल्मेट घालण्यास प्रोत्साहित करणे यावर भर दिला जाईल. हेल्मेट नसलेल्या दुचाकीस्वारांवरही कडक कारवाई केली जाईल, असं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.  हा उपक्रम सुलभ करण्यासाठी, विद्यमान वाहतूक पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना शासकीय कार्यालयांच्या आजूबाजूच्या भागात नियुक्त करण्यात आले आहे.

'या' सगळ्यांना हेल्मेट परिधान करणं बंधनकारक

दुचाकीचा वापर करणाऱ्या सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, महामंडळे, महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषद, सर्व शाळा, कॉलेज व शासकीय यंत्रणा यांच्या कार्यालयात काम करणाऱ्या शासकीय अधिकारी, कर्मचारी यांना शासकीय कार्यालयात येताना जाताना हेल्मेट परिधान करणे बंधनकारक आहे. 

हेल्मेटमुळे 80 टक्के संरक्षण

भारतात दररोज सुमारे 411 भारतीयांचा रस्ते अपघातांमध्ये बळी जातो. वाहन अपघातात दगावणाच्या व्यक्तींमध्ये सुमारे 80  टक्के लोक या दुचाकी वाहन चालक, पादचारी आणि सायकलस्वार असतात. हेल्मेटमुळे दुचाकीचा अपघात घडल्यास जीव वाचण्याची शक्यता 80  टक्क्याने वाढते. मोटार वाहन कायद्यानुसार 4 वर्षांवरील प्रत्येक व्यक्तीने दुचाकीवरुन प्रवास करतांना हेल्मेट परिधान करणे आवश्यक आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Gondia Crime : कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने स्वत:वर गोळ्या झाडून आयुष्य संपवलं, तिरोडा येथे बदली झाल्याने टोकाचं पाऊल उचलल्याचा संशय
कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने स्वत:वर गोळ्या झाडून आयुष्य संपवलं, तिरोडा येथे बदली झाल्याने टोकाचं पाऊल उचलल्याचा संशय
गुडन्यूज ! शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात; 20 जानेवारीपासून पवित्र पोर्टल सुरू
गुडन्यूज ! शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात; 20 जानेवारीपासून पवित्र पोर्टल सुरू
माणुसकी असो की स्टंट, आला अंगलट; रिक्षाला टोचन देणाऱ्या बसचालक अन् वाहकास 'निलंबनाचा दे धक्का'
माणुसकी असो की स्टंट, आला अंगलट; रिक्षाला टोचन देणाऱ्या बसचालक अन् वाहकास 'निलंबनाचा दे धक्का'
दिल्ली विधानसभेसाठी राष्ट्रवादीचे 20 स्टार प्रचारक जाहीर; धनंजय मुंडेंना स्थान नाही, पार्थ पवारांना संधी
दिल्ली विधानसभेसाठी राष्ट्रवादीचे 20 स्टार प्रचारक जाहीर; धनंजय मुंडेंना स्थान नाही, पार्थ पवारांना संधी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11PM 16 January 2025Hindenburg Research | हिंडेनबर्गचं पॅकअप, अदानींचे शेअर वधारले, भारतावर काय परिणाम? Special ReportSupriya Sule VS Ajit Pawar | काका पुतणे बसले लांब, ताई-दादांचीही टाळाटाळ Special ReportRajkiya Shole on Saif ali Khan| सैफ अली खानवर हल्ला, विरोधकांकडून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gondia Crime : कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने स्वत:वर गोळ्या झाडून आयुष्य संपवलं, तिरोडा येथे बदली झाल्याने टोकाचं पाऊल उचलल्याचा संशय
कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने स्वत:वर गोळ्या झाडून आयुष्य संपवलं, तिरोडा येथे बदली झाल्याने टोकाचं पाऊल उचलल्याचा संशय
गुडन्यूज ! शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात; 20 जानेवारीपासून पवित्र पोर्टल सुरू
गुडन्यूज ! शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात; 20 जानेवारीपासून पवित्र पोर्टल सुरू
माणुसकी असो की स्टंट, आला अंगलट; रिक्षाला टोचन देणाऱ्या बसचालक अन् वाहकास 'निलंबनाचा दे धक्का'
माणुसकी असो की स्टंट, आला अंगलट; रिक्षाला टोचन देणाऱ्या बसचालक अन् वाहकास 'निलंबनाचा दे धक्का'
दिल्ली विधानसभेसाठी राष्ट्रवादीचे 20 स्टार प्रचारक जाहीर; धनंजय मुंडेंना स्थान नाही, पार्थ पवारांना संधी
दिल्ली विधानसभेसाठी राष्ट्रवादीचे 20 स्टार प्रचारक जाहीर; धनंजय मुंडेंना स्थान नाही, पार्थ पवारांना संधी
Shitanshu Kotak Batting Coach : टीम इंडियाला नवा बॅटिंग कोच मिळाला, इंग्लंडविरुद्धच्या मालिकेपासूनच जबाबदारी सांभाळणार!
टीम इंडियाला नवा बॅटिंग कोच मिळाला, इंग्लंडविरुद्धच्या मालिकेपासूनच जबाबदारी सांभाळणार!
Raju Shetti on Almatti Dam : अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याच्या निर्णयाला स्थगिती द्या; राजू शेट्टींची केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाकडे मागणी
अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याच्या निर्णयाला स्थगिती द्या; राजू शेट्टींची केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाकडे मागणी
ती माझी बहीण, व्हिडिओ-फिडिओ काही नाही; धस म्हणाले, मी धुतल्या तांदळासारखं आयुष्य जगलोय
ती माझी बहीण, व्हिडिओ-फिडिओ काही नाही; धस म्हणाले, मी धुतल्या तांदळासारखं आयुष्य जगलोय
Buldhana Hair Loss : वातावरणातील विषारी घटकामुळे शेगाव तालुक्यात केस गळती, ICMR पथकातील संशोधकांचा प्राथमिक अंदाज
वातावरणातील विषारी घटकामुळे शेगाव तालुक्यात केस गळती, ICMR पथकातील संशोधकांचा प्राथमिक अंदाज
Embed widget