एक्स्प्लोर

Pune Ganeshotsav 2023 : गणेशोत्सवादरम्यान पुणे शहराला धोका? पुणे पोलिसांकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा

गणेशोत्सवादरम्यान पुणे शहराला धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याचं पुणे पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे. त्यामुळे आगामी गणेशोत्सवा दरम्यान नागरिकांनी सतर्क राहण्याचं पुणे पोलिसांकडून आवाहन करण्यात आलं आहे.

पुणे : गणेशोत्सवाला काहीच दिवस (Ganeshotsav 2023) शिल्लक राहिले आहेत. पुण्यात गणेशोत्सवाच्या तयारीला सुरुवात झाली आहे. त्यातच गणेशोत्सवादरम्यान पुणे शहराला धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याचं पुणे पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे. त्यामुळे आगामी गणेशोत्सवादरम्यान नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन पुणे पोलिसांकडून करण्यात आलं आहे. जुलैमध्ये पुणे पोलिसांनी कोथरुड भागात 2 दहशतवादी पकडले होते. या पार्श्वभूमीवर पुणे पोलीस सतर्क झाले आहेत. 

शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही यासाठी पुणे पोलीस सतर्क झाल्याचं पाहायला मिळत आहे. गणपती मंडळांच्या कार्यकर्त्यांनी देखील सुरक्षा व्यवस्थेची काळजी घेण्याच्या पोलीस आयुक्तांनी सूचना दिल्या आहेत. पोलीस आयुक्त रितेशकुमार स्वतः शहरातील गणपती मंडळाशी सुरक्षेच्या संदर्भात आढावा बैठक आहेत. गणेशोत्सवात कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही यासाठी पुणे पोलिसांकडून योग्य ती खबरदारी जाणार आहे.

पुण्यातील गणेशोत्सव राज्यभर प्रसिद्ध आहे. त्यामुळे गणेशोत्सवादरम्यान पुण्यात राज्यातील अनेक जिल्ह्यातून नागरिक येत असतात. त्यामुळे गणेशोत्सवादरम्यान पुण्यातील विविध भागात मोठी गर्दी असते. शिवाय दगडूशेठ गणपती आणि मानाच्या गणपतींना जास्त प्रमाणात गर्दी असते. त्यामुळे दरवर्षी पोलिसांना गणेशोत्सवादरम्यान मोठा बंदोबस्त तैनात ठेवावा लागतो. यावर्षी मात्र हा बंदोबस्त कडक स्वरुपाचा राहण्याची शक्यता आहे. कारण मागील काही दिवसांपासून पुण्यात घडणाऱ्या घटना आणि दहशतवाद्यांची असलेल्या भीतीमुळे यंदा पोलिसांनी चांगलीच कंबर कसल्याचं पाहायला मिळत आहे. 

काही दिवसांपूर्वी पुण्यात दोन दहशतवादी सापडले होते. कोथरुडसारख्या परिसरात चोरीच्या गुन्ह्यात पकडलेल्या दोघांचा संपर्क ISIS सारख्या देशविरोधी संघटनांशी संपर्क असल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर त्यांच्या घराची झडती घेतली असता बंदूक आणि स्फोटकं आढळली होती. त्यानंतर बॉम्ब बनवण्याचं साहित्य आणि क्रिया लिहिलेली चिठ्ठीदेखील सापडली होती. पुण्यातील कोंढवा परिसरात हे दोघं राहत होते. त्यानंतर पुण्यातील कोंढवा परिसरातूनच एका भूलतज्ञ असणाऱ्या डॉक्टरला ISIS मध्ये भरती करुन घेतो या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. त्यामुळे पुण्यात चांगलीच खळबळ उडाली होती.

याच पार्श्वभूमीवर पुण्यात गणेशोत्सवादरम्यान चोख बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. पुणे पोलिसांकडून बंदोबस्त ठेवण्यासाठी तयारीला सुरुवात केली आहे. काही दिवसातच गणेशोत्सवाची नियमावली जाहीर करण्यात येणार आहे. त्यावेळी गणेश मंडळांनादेखील सूचना देण्यात येणार आहे. 

इतर महत्वाची बातमी-

Ajit Pawar : पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! गणपतीत पुणे मेट्रो रात्री 12 वाजेपर्यंत सुरु राहणार, उपमुख्यमंत्री अजित पवारांची घोषणा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
Priyanka Gandhi In Kolhapur : कोल्हापुरात उद्या गांधी मैदानात 'महाराष्ट्र स्वाभिमान' गरजणार; प्रियांका गांधी पहिल्यांदाच करवीरनगरीत!
कोल्हापुरात उद्या गांधी मैदानात 'महाराष्ट्र स्वाभिमान' धडाडणार; प्रियांका गांधी पहिल्यांदाच करवीरनगरीत!
Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  11 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सSanjay Raut on Devendra Fadnavis : फडणवीसांना खोटं बोलण्याचा रोग; त्यामुळे महाराष्ट्राचं नुकसानDevendra Fadnavis : सरकार स्थापनेच्या दिल्लीतील बैठकांना अदानी उपस्थित नव्हतेABP Majha Headlines :  10 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
Priyanka Gandhi In Kolhapur : कोल्हापुरात उद्या गांधी मैदानात 'महाराष्ट्र स्वाभिमान' गरजणार; प्रियांका गांधी पहिल्यांदाच करवीरनगरीत!
कोल्हापुरात उद्या गांधी मैदानात 'महाराष्ट्र स्वाभिमान' धडाडणार; प्रियांका गांधी पहिल्यांदाच करवीरनगरीत!
Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
Pune Crime: क्षुल्लक कारणावरून मारहाण! गार वडापाव दिला म्हणून चिडला, बरणी उचचली अन्..; बाणेर परिसरात गुन्हा दाखल
क्षुल्लक कारणावरून मारहाण! गार वडापाव दिला म्हणून चिडला, बरणी उचचली अन्..; बाणेर परिसरात गुन्हा दाखल
Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक गौप्यस्फोट, म्हणाले, 'शरद पवारांच्या पत्रामुळेच महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागली'
त्यावेळी आम्ही शरद पवारांच्या सूचनेनुसार वागत होतो; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक गौप्यस्फोट
Ramdas Kadam: आदित्य ठाकरेंची औकाद काय? पुन्हा सत्ता आल्यावर दिशा सालियन प्रकरणाची चौकशी लावणारच: रामदास कदम
आदित्य ठाकरे तुमची औकाद काय? रामदास कदम संतापाने लालबुंद होत म्हणाले, तुझी चौकशी....
Embed widget