एक्स्प्लोर

पूरपरिस्थितीची पाहणी करायला आलेल्या पालकमंत्री चंद्रकांत पाटलांवर नागरिकांचा संताप

विरोधकांनी राजकारण करू नये, राजकारणासाठी निवडणूक आहे अशा वेळेस खांद्याला खांदा लावून पुढे गेले पाहिजे, असे पाटील म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी अजित पवार यांना फोन करुन परिस्थितीची माहितीदेखील घेतली होती, असेही त्यांनी सांगितलं.

पुणे : पुण्यातील बहुतांश भागात पावसानं हाहाकार माजवल्यानंतर आज पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील परिस्थितीची पाहणी करण्यासाठी पुण्यात दाखल झाले आहेत. मात्र, अरण्येश्वर परिसरात चंद्रकांत पाटील यांना स्थानिकांच्या रोषाचा सामना करावा लागला. पुरामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठीसाठी नाही तर पाटील हे फोटो काढण्यासाठी आले आहेत, असा आरोप स्थानिकांनी केला. तसंच पाटील यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजीही केली. यावेळी अनधिकृत बांधकामांमुळे पुण्यात पूरपरिस्थिती निर्माण झाल्याचा दावा पालकमंत्री चंद्रकांत पाटलांनी केला आहे. यावेळी पाटील म्हणाले की, पालकमंत्री कुठं आहेत असं विचारलं जातं आहे. काल मी दिल्लीला अमित शाह यांच्याबरोबर पूर्वनियोजित बैठकीला गेलो होतो. परंतु मी इथल्या अधिकार्‍यांशी संपर्कात होतो. मात्र भेगडे आणि देशमुख हे मंत्री  त्याठिकाणी उपस्थित होते. त्यामुळं विरोधकांनी राजकारण करू नये, राजकारणासाठी निवडणूक आहे अशा वेळेस खांद्याला खांदा लावून पुढे गेले पाहिजे, असे पाटील म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी अजित पवार यांना फोन करुन परिस्थितीची माहितीदेखील घेतली होती, असेही त्यांनी सांगितलं. चंद्रकांत पाटील म्हणाले की, पुणे शहरात खूप अनधिकृत बांधकामं झाली आहेत. नालेच्या नाले नष्ट केल्यामुळेच ही परिस्थिती उद्भवली आहे. या नाल्याच्या जागी बांधकामं केल्याने त्याचीही चौकशी झाली पाहिजे, असे ते म्हणाले. पुणे शहर आणि परिसरात बुधवारी रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. पीडितांना सर्वतोपरी मदत देण्यासाठी प्रयत्नशील आहे. सांगली कोल्हापूरमधील नुकसानीच्या धर्तीवर पुण्यातील अतिवृष्टी बाधितांना मदत दिली जाईल. आचारसंहितेमुळे यासाठी निवडणूक आयोगाकडे परवानगी मागितली असून आयोगाकडून लवकरच सकारात्मक प्रतिसाद मिळेल,  असे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. यावेळी शिखर बॅंक प्रकरणी बोलताना ते म्हणाले की, 2010 साली काँग्रेस-राष्ट्रवादी सरकार होतं. राज्य सहकारी बँकेवर शरद पवार यांना मानणार सरकार होतं. त्याच्या सल्ल्याने चालत होतं. त्यावेळी भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आहे. कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झाला आहे. पृथ्वीराज चव्हाणांनी आकसापोटी केलं असेल तर  माहिती नाही असंही ते म्हणाले.  या देशात ईडी, सीबीआय, कोर्ट यात सरकार लक्ष घालू शकत नाही. यामुळे यात भाजप सरकारचा कोणताही संबध नाही, असेही ते म्हणाले. इव्हेंट करून प्रसिद्ध मिळवली जाते. यातून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न आहे. हे छगन भुजबळ यांना अटक झाल्यावर का नाही झालं? असेही ते म्हणाले.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live Blog Updates : महाराष्ट्राच्या राजकारणात अन् प्रशासनात मोठ्या घडामोडी; मनोज जरांगे पाटलांचे आजपासून आमरण उपोषण, तर पुण्यात विषारी दारूकांडानंतर पोलिसांवर बडगा!
Maharashtra Live Updates : महाराष्ट्राच्या राजकारणात अन् प्रशासनात मोठ्या घडामोडी; मनोज जरांगे पाटलांचे आजपासून आमरण उपोषण, तर पुण्यात विषारी दारूकांडानंतर पोलिसांवर बडगा!
Chandrapur Crime : मातृत्वाच्या नात्याला काळिमा! प्रियकराकडून पोटच्या 15 वर्षीय मुलीवर अत्याचार; नवजात बाळाला विकण्याचा कट; चंद्रपुरातील संतापजनक प्रकार
मातृत्वाच्या नात्याला काळिमा! प्रियकराकडून पोटच्या 15 वर्षीय मुलीवर अत्याचार; नवजात बाळाला विकण्याचा कट; चंद्रपुरातील संतापजनक प्रकार
NCP Parth Pawar: पक्षनिधीसाठी रक्कम द्या...निधी न दिल्यास राजीनामाही घेऊ; पार्थ पवारांची राष्ट्रवादीच्या मंत्र्यासह आमदारांना तंबी
पक्षनिधीसाठी रक्कम द्या...निधी न दिल्यास राजीनामाही घेऊ; पार्थ पवारांची राष्ट्रवादीच्या मंत्र्यासह आमदारांना तंबी
Manoj Jarange Patil Protest: आडवं बोलत नाही, सरकारला पट्ट्यावर घेत नाही; आमरण उपोषण करण्याआधी मनोज जरांगेंचा एकच इशारा, काय काय म्हणाले?
आडवं बोलत नाही, सरकारला पट्ट्यावर घेत नाही; आमरण उपोषण करण्याआधी मनोज जरांगेंचा एकच इशारा, काय काय म्हणाले?

व्हिडीओ

Vidhan Parishad Politics : विधान परिषदेत ‘पुढच्या पिढी’ची एंट्री? दिग्गज नेत्यांचं लॉबिंग सुरू | ABP Majha
Pune Liquor Tragedy : विषारी दारूमुळे १४ मृत्यू; पोलिसांच्या भूमिकेवरही सवाल | ABP Majha
NEET Exam Special Report : NEET पेपरफुटीनंतर मोठा निर्णय! आता PM मोदींकडे NEETचं नियंत्रण
Rahul Gandhi Special Report : सीबीएसई परिक्षेवरुन वाद, भाजप आणि राहुल गांधींमध्ये आरोप-प्रत्यारोप
Gunratna Sadavarte Mumbai : रीलस्टार मनोज, तुझ्या मागण्या बेकायदेशीर, गुणरत्न सदावर्ते बरसले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Share Market : अवघ्या 10 मिनिटात सेन्सेक्स 850 अंकांनी कोसळला, MSCI च्या पुनर्रचनेच्या अपडेटनं बाजारात भूकंप; गुंतवणूकदारांना 6 लाख कोटींचा फटका 
विदेशातून एक अपडेट येताच भारतीय शेअर बाजारात भूकंप, 10 मिनिटात सेन्सेक्स कोसळला; गुंतवणूकदारांचे 6 लाख कोटी बुडाले
Jalgaon Crime News: वडिलांसह भावाची कोर्टात संपवल्याची कबुली, मृतदेहही जाळला; 20 दिवसांनी शिवानी म्हणाली, मी जिवंत..., पोलिसांसह सगळे चक्रावले, नेमकं प्रकरण काय?
वडिलांसह भावाची कोर्टात संपवल्याची कबुली, मृतदेहही जाळला; 20 दिवसांनी शिवानी म्हणाली, मी जिवंत..., पोलिसांसह सगळे चक्रावले, नेमकं प्रकरण काय?
Mumbai CNG News : मुंबईकरांना आणखी एक मोठा झटका! CNG दरात पुन्हा 2 रुपयांची वाढ; 15 दिवसांत दुसऱ्यांदा दरवाढ; पीएनजीचे दरही वाढले
मुंबईकरांना आणखी एक मोठा झटका! CNG दरात पुन्हा 2 रुपयांची वाढ; 15 दिवसांत दुसऱ्यांदा दरवाढ; पीएनजीचे दरही वाढले
Vaibhav Sooryavanshi RR vs GT IPL 2026: पराभव होताच चेहरा उतरला, डोळ्यात अश्रू; जडेजाला मनातलं बोलत बसला, वैभव सूर्यवंशीला पाहून सगळे भावूक, PHOTO
पराभव होताच चेहरा उतरला, डोळ्यात अश्रू; जडेजाला मनातलं बोलत बसला, वैभव सूर्यवंशीला पाहून सगळे भावूक, PHOTO
Pune Hooch Tragedy : पुण्यात विषारी दारूमुळे 14 जणांचा मृत्यू; पोलीस आयुक्तांची मोठी कारवाई, हडपसरच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह 3 पोलीस निलंबित
पुण्यात विषारी दारूमुळे 14 जणांचा मृत्यू; पोलीस आयुक्तांची मोठी कारवाई, हडपसरच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह 3 पोलीस निलंबित
Parner Crime : धक्कादायक! गतिमंद मुलाला बरं करण्याच्या बहाण्याने भोंदू बाबाने घातला 6 लाखांचा गंडा; ठार मारण्याची धमकी देत महिलेवर अत्याचार
धक्कादायक! गतिमंद मुलाला बरं करण्याच्या बहाण्याने भोंदू बाबाने घातला 6 लाखांचा गंडा; ठार मारण्याची धमकी देत महिलेवर अत्याचार
Weather Update: हवामान विभागाचा जून आणि जुलैमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा; श्रीलंकेत मान्सून अडकल्याने अजूनही आठवड्याचीव प्रतीक्षा; यंदा 10 टक्के कमी पावसाचा अंदाज
हवामान विभागाचा जून आणि जुलैमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा; श्रीलंकेत मान्सून अडकल्याने अजूनही आठवड्याचीव प्रतीक्षा; यंदा 10 टक्के कमी पावसाचा अंदाज
कर्नाटकात डीकेंसाठी मार्ग प्रशस्त केला, पण राजीनाम्यानंतर सिद्धरामय्यांची भलतीच खेळी; काँग्रेसने 'रिमोट'चा डाव वेळीच ओळखला अन्
कर्नाटकात डीकेंसाठी मार्ग प्रशस्त केला, पण राजीनाम्यानंतर सिद्धरामय्यांची भलतीच खेळी; काँग्रेसने 'रिमोट'चा डाव वेळीच ओळखला अन्
Embed widget