Pune Crime news : जॉब सोडून व्यवसाय केला, उधारीत बुडाला; बायको, मुलानंतर स्वत:लाही संपवलं...
पुण्याच्या औंध परिसरात राहणाऱ्या एका आयटी इंजिनिअरने पत्नी आणि मुलाची हत्या करून आत्महत्या केली. या व्यक्तीने नोकरी सोडून व्यावसाय सुरु करण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी कर्जही घेतलं होतं.
Pune Crime news : पुण्याच्या औंध परिसरात राहणाऱ्या (Pune Crime News) एका आय टी इंजिनिअरने पत्नी आणि मुलाची हत्या करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बुधवारी घडली. मात्र असे टोकाचे पाऊल त्याने का उचलले, नेमकं याचं कारण काय आहे. यासंदर्भात पोलिसांनी उलगडा केला आहे. या व्यक्तीने नोकरी सोडून व्यावसाय सुरु करण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी कर्जही घेतलं होतं. मात्र हा व्यवसाय उधारीत बुडाल्याने त्याने हा टोकाचा निर्णय घेतला असल्याची माहिती समोर आली आहे.
पुणे आयटी हब म्हणून ओळख असलेले देशातील अव्वल शहर आहे. हजारो तरुण या शहरात नोकरी, व्यवसायासाठी येतात. 44 वर्षीय सुदिप्तो हे पत्नी प्रियांका सह पुण्यात एका प्रसिद्ध आयटी कंपनी मध्ये काम करत होते. मूळचे पश्चिम बंगालचे राहणारे गांगुली गेल्या अनेक वर्षापासून बायको आणि एका 8 वर्षीय मुलासह औंध भागात राहायला होते.
नोकरी सोडली अन् व्यावसाय करण्याचा निर्णय...
आयटी क्षेत्रात काम करत असलेल्या गांगुली यांनी काही आठ-नऊ महिन्यांपूर्वी नोकरी मधून ब्रेक घेऊन एक व्यावसाय करण्याचा निर्णय घेतला. आयटी मध्ये काम करत असलेला अनुभव असल्यामुळे त्याचा फायदा व्यावसायात होईल, असे वाटल्यामुळे त्याने ऑनलाईन भाजी विकण्यासाठी एक सॉफ्टवेअर तयार करायचे ठरवले. व्यवसायासाठी सुदिप्तो यांना भांडवलाची आवश्यकता भासली. यासाठी त्याने काही पैसे उधारीवर घेतले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही रक्कम जवळपास 30 लाख रुपये इतकी होती. उधार घेतलेले पैसे कसे परत करणार आणि हे ओझे कसे हलके होणार या चिंतेने त्याला ग्रासले होते. या चिंतेतून गांगुली यांनी स्वतः आत्महत्या केली. मात्र त्यापूर्वी त्यांनी निरपराध पत्नी प्रियांका आणि अवघ्या 8 वर्ष मुलगा तनिष्क यांची निर्घृण हत्या केली. या घटनेमुळे सगळीकडे खळबळ उडाली होती.
निष्पाप जिवाची काय चूक?
गांगुली यांचा भाऊ बेंगळुरू मध्ये राहायला आहे. भावाचा फोन लागत नाही म्हणून त्याने एका मित्राच्या मदतीने मिसिंगची तक्रार दिली आणि पोलिसांच्या समोर हा भयानक प्रकार समोर आला. एकाच कुटुंबातील 3 जणांचे मृतदेह सापडल्याने परिसरात खळबळ उडाली होती. गांगुली यांनी आत्महत्या केली या सगळ्या गोष्टींमध्ये त्यांची बायको प्रियांका आणि त्यांचा चिमुरडा तनिष्क यांची काय चूक होती, असा प्रश्न सध्या विचारला जात आहे.