एक्स्प्लोर

Pune Crime News : पुण्यात स्पा सेंटरमधील वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश; चार महिलांची सुटका

 स्पा सेंटरच्या नावाखाली चालणाऱ्या सेक्स रॅकेटचा सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने पर्दाफाश केला आहे. कोंढवा परिसरातील लुल्ला नगरमध्ये असलेल्या ऑर्चिड बिल्डींग मध्ये हा प्रकार उघडकीस आला.

Pune Crime News : स्पा सेंटरच्या (Pune Crime) नावाखाली चालणाऱ्या (Spa Center) सेक्स रॅकेटचा पुणे पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने पर्दाफाश केला आहे. कोंढवा परिसरातील लुल्ला नगरमध्ये असलेल्या ऑर्किड बिल्डिंमध्ये हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून एकाला अटक करण्यात आली आहे. 

लालरामन लाफतफळा (वय 21 वर्षे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तर संदीप मोकाशी आणि अमोल राऊत यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस हवालदार अण्णा माने यांनी या प्रकरणी तक्रार दिली आहे. नगर परिसरातील ऑर्किड बिल्डिंगमध्ये असलेल्या स्पर्श स्पा गुलमोहर या ठिकाणी वेश्या व्यवसाय सुरु असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाच्या पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी एक बनावट ग्राहक त्या ठिकाणी पाठवून या संपूर्ण प्रकाराची खातरजमा केली आणि या ठिकाणी छापा टाकला. यावेळी त्यांना चार महिला वेश्याव्यवसाय करत असल्याचे दिसून आले. या सर्व महिलांची पोलिसांनी सुटका केली. आरोपींनी जास्तीच्या पैशाचे आमिष दाखवून या महिलांकडून वेश्या व्यवसाय करुन घेत होते. कोंढवा पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वारजे-माळवाडी परिसरातील स्पा सेंटरवर काही दिवसांपूर्वी छापा

काही दिवसांपूर्वी देखील पोलिसांनी अशाच सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला होता. सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरु असल्याचं उघडकीस आल्यानंतर पुण्यातील वारजे-माळवाडी परिसरात ओम स्पावर छापा टाकून गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने कारवाई केली होती. त्यावेळी स्पा सेंटरच्या मॅनेजरला पुणे पोलिसांनी अटक केली होती. संदीप संतोष तिवारी (वय 23 वर्षे) असं स्पा मॅनेजरचं नाव होतं. वारजे माळवाडी येथील ओम स्पामध्ये मसाजच्या नावाखाली वेश्या व्यवसाय केला जात असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवला. त्याने इशारा करताच ओम स्पावर सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने छापा टाकला. तेथे दोन महिलांकडून वेश्या व्यवसाय करवून घेतला जात होता. संदीप तिवारी या मॅनेजरला अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून 12 हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला होता.

स्पा सेंटरवर पोलिसांची नजर

पुण्यात आतापर्यंत अनेक स्पा सेंटर छापा टाकला आहे. अनेक महिलांची सुटका केली आहे. मात्र मागील काही महिन्यांपासून या अशा स्पा सेंटरवर पोलिसांची करडी नजर आहे. माहिती मिळताच पोलिसांनी कारवाई करायला सुरुवात केली आहे. त्यात सापळा रचून अनेकांना जेरबंद केलं आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप

व्हिडीओ

Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
EPFO : ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
FDA : महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
Manoj Jarange Patil : देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण

Embed widget