(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pune crime News : माजी नगरसेविकेडून PMPML चालकाला बेदम मारहाण; चालक रक्तबंबाळ...
पुण्यात पीएमपीएल बस चालकाला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. किरकोळ वादातून महिलेने पीएमपीएल बस चालकाला मारहाण केली आहे
Pune Crime News : पुण्यात पी एम पी एल बस (PMPML) चालकाला (Pune Crime News) बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. किरकोळ वादातून महिलेने पी एम पी एल बस चालकाला मारहाण केली आहे. मारहाण करणारी महिला भाजपची माजी नगरसेविका असल्याचा दावा या बस चालकाने केला आहे. स्वारगेट डेपोमध्ये कार्यरत चालक शशांक देशमाने असं मारहाण करण्यात आलेल्या चालकाचं नाव आहे. पुण्यातील अभिनव चौकात दुपारी घटना घटली.
मिळालेल्या माहितीनुसार, आज दुपारी स्वारगेट डेपोतील पी एम पी एल बसचे चालक शशांक देशमाने यांचा मार्ग क्र 2 वरती सकाळी काम करत असताना अभिनव कॉलेज चौकात बस आणि कारचा किरकोळ अपघात झाला. त्या अपघातात किरकोळ कारचालक महिला आणि चालक यांच्यामध्ये वाद झाले. त्या वादातून महिलेने इतर 3 साथीदारांसह चालक देशमाने यांना जबर मारहाण केली. ज्या चारचाकी गाडीचा अपघात झाला होता त्यातील महिला आणि त्यांच्या बरोबरीचे कारमधील व्यक्ती हे भाजपचे माजी नगरसेवक आहेत, असा दावा देशमाने यांनी केला आहे. जखमी चालकाला ससून हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. पोलीस प्रशासनाने या बाबत कडक भूमिका घेणे गरजेचे आहे, अशी भूमिका पी. एम. पी. एल. चालकांनी एकत्र मांडली आहे.
बसचालक असुरक्षित...
पुण्यात बसचालकाला मारहाण होण्याचं हे काही पहिलं प्रकरण नाही. यापूर्वी सुद्धा चालकाला मारहाण केल्याचं समोर आलं आहे. काही दिवसांपूर्वी एका मुलाने थेट बसमध्ये शिरुन चालकाला मारहाण केल होती. त्यावेळी त्या मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र आपल्याला सुरक्षित प्रवास घडवणाऱ्या चालकालाच मारहाण केल्याच्या घटना समोर आल्याने बसचालकच असुरक्षित आहेत का?, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
कंडक्टरला लुटलं ...
PMPLM बसमध्ये रोज अनेक छेडाछेडीचे प्रकरणं समोर येतात. या सगळ्यांमध्ये कंडक्टर मदत करण्यासाठी तत्पर असतात. रात्रीच्या वेळी कंडक्टर अनेक महिलांची सुरक्षा करत असल्याचं आपण कायम ऐकतो. कात्रज परिसरात एक महिला बस स्थानकावर एकटीच असल्याचं पाहून कंडक्टर त्या महिलेच्या कुटुंबातील व्यक्ती येतपर्यंत थांबले होते. अशा अनेक प्रकारे कंडक्टर सुरक्षित बस कशी ठेवता येईल. याची काळजी घेतात मात्र यंदा कंडक्टरलाच लुटण्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकारामुळे कंडक्टरच सुरक्षित नसल्याचं समोर आलं आहे.