एक्स्प्लोर

Indapur News : मेल मिळाला अन् डॉक्टरांनी थेट रुग्णालयातच धाड टाकली; 'मदर्स डे'च्या दिवशीच उघड झाला स्त्रीभ्रूणहत्येचा प्रकार

देशात सगळीकडे मदर्सडे साजरा करण्यात येत आहे. मात्र याच दिवशी दवाखान्यात बेकादेशीर गर्भपात केला जात असल्याचे उघडकीस आलं आहे. पुरंदर तालुक्यातील नीरा गावात हा प्रकार घडत असल्याचं समोर आल आहे.

Indapur News : देशात सगळीकडे 'मदर्स डे' साजरा करण्यात (Indapur crime) येत आहे. मात्र याच दिवशी दवाखान्यात बेकायदेशीर गर्भपात केला जात असल्याचे उघडकीस आलं आहे. पुरंदर तालुक्यातील नीरा गावात हा प्रकार घडत असल्याचं समोर आल आहे. जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर सचिन रामचंद्र रणवरे याच्यासह गर्भपात केलेली महिला दिपाली थोपटे आणि बरकडे नावाचा एजंट या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 'मदर्स डे'च्या दिवशी हा प्रकार घडल्याने संताप व्यक्त केला जात आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागनाथ संग्रामआप्पा यम्पल्ले यांनी जेजुरी पोलिसांकडे फिर्याद दाखल केली होती. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाला राज्याच्या कुटुंब कल्याण कार्यालयाकडून गोपनीय ईमेल आला होता. हा ई-मेल 12 मे रोजी आला होता. त्यामध्ये पुरंदर तालुक्यातील पिसुर्डी या गावांमध्ये बरकडे नावाचा एजंट असून तो निरा गावातील डॉक्टर सचिन रणवरे यांच्या श्रीराम हॉस्पिटलमध्ये बेकायदेशीररित्या गर्भपात करत असल्याची माहिती दिली होती, असं समोर आलं होतं. दरम्यान 14 मे रोजी डॉक्टर सचिन रणवरे हा डॉक्टर दिपाली थोपटे नावाच्या गर्भवती महिलेचा गर्भपात करणार असल्याची माहिती देखील या ई-मेलवर आली होती. या महिलेला पहिली मुलगी असून बेकायदेशीररीत्या गर्भलिंग निदान केल्यानंतर नीरा येथील बारामती रस्त्यावरील श्रीराम हॉस्पिटलमध्ये डॉ. रणवरे हा तिचा गर्भपात करणार असल्याची माहिती मिळाली होती.

हा सगळा प्रकार कळल्यानंतर डॉक्टर यम्पल्ले हे विधी सल्लागार अॅड. मेघा सतीश सोनतळे यांच्यासह श्रीराम हॉस्पिटलमध्ये आज रविवारी पोहोचले. या ठिकाणी दवाखान्यात गेल्यानंतर डॉक्टर सचिन रणवरे यांचे वडील राम रणवरेदेखील या ठिकाणी होते. त्यांना डॉ. यम्पल्ले यांनी आपली ओळख सांगितली आणि त्यानंतर दवाखान्याची तपासणी केली. 

फोन केला अन् सत्य उघड झालं...

दवाखान्याच्या गर्भपात केंद्र व सोनोग्राफी केंद्राची तपासणी केली. मात्र त्यावेळी रजिस्टरमध्ये दिपाली थोपटे हे नाव नव्हते. त्यानंतर दिपाली यांना फोन केला असता त्यांच्या नातेवाईकांनी शनिवारी संध्याकाळीच गर्भपात केला असल्याची माहिती दिली. हा गर्भपात डॉ. सचिन रणवरे याने केला असून त्यासाठी बरकडे नावाच्या एजंटने गर्भलिंगनिदान केले असल्याची माहिती देखील मिळाली. त्यानंतर डॉक्टर एमपल्ले यांनी पुन्हा डॉक्टर सचिन रणवरे यांच्याकडे चौकशी केली, तेव्हा सचिन रणवरे यांनी दिपाली थोपटे यांचे अर्धवट भरलेले अर्ज आणि इतर माहिती डॉक्टर यांच्याकडे दिली. त्यातून या ठिकाणी बेकायदेशी रित्या गर्भपात झाल्याचं निष्पन्न झालं. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Manoj Jarange Parbhani : Shahapur Rain Updates : शहापूरमध्ये पावसाचं रौद्ररुप, जनजीवन पूर्णपणे विस्कळीतAiit Pawar Supporters Join Sharad Pawar:अजितदादांचे 100कार्यकर्ते शरद पवारांच्या पक्षात प्रवेश करणारABP Majha Marathi News Headlines 07PM TOP Headlines 07PM 07 July 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
Eknath Shinde on Uddhav Thackeray : गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, पण...; मराठा-ओबीसी बद्दल काय म्हणाले पाटील
उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, पण...; मराठा-ओबीसी बद्दल काय म्हणाले पाटील
Embed widget