Pune Crime News : गाडीला महाराष्ट्र शासनाची पाटी लावली अन् गाडीत गांजा भरला पण पोलिसांनी प्लॅन हाणून पाडला; पुण्यात 1 कोटी 4 लाखांचा गांजा जप्त
पुणे शहर ड्रग्जच्या विळख्यात असल्याचं मागील काही दिवसांपासून पाहायला मिळत आहे. आंध्रप्रदेशातून विक्रीसाठी आणलेला 1कोटी रुपयांचा 520 किलो गांजा जप्त केला आहे.
पुणे : पुणे शहर ड्रग्जच्या विळख्यात असल्याचं मागील (Pune Crime News) काही दिवसांपासून पाहायला मिळत आहे. आंध्रप्रदेशातून विक्रीसाठी आणलेला 1कोटी रुपयांचा 520 किलो गांजा जप्त केला आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथक -2 ने (Anti Narcotics Cell) मोठी कारवाई केली आहे आणि हा गांजा जप्त केला आहे. पुणे नगर रोडवरील अर्मसेल इंडिया कंपनीच्या समोर ही करण्यात आली.
संदीप बालाजी सोनटक्के (वय 29 रा. मुपो. दहिवली, पाली फाटा, खोपोली, ता. खालापुर, जि. रायगड), निर्मला कोटेश्वरी मुर्ती जुन्नुरी (वय-36 रा.चिलाकरलुपेठ, जि.गंटुर, राज्य आंध्रप्रदेश), महेश तुळशीराम परीट (वय-29 रा. तुपगाव पोस्ट चौक, ता. खालापूर, जि. रायगड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी पुणे नगर रोडवरील एक कार अडवली आणि शासनाचे कोणतेही लोकप्रतिनिधी नसल्याचं लक्षात आल्यावर झाडाझडती घेतली त्यावेळी गांजाची वाहतूक करत असल्याचं समोर आलं.
महाराष्ट्र शासनाची पाटी लावून करत होते गांजाची वाहतूक
अंमली पदार्थ विरोधी पथक दोनचे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलींग करत होते. त्यावेळी पोलिसांना पांढऱ्या रंगाची सेलेरिओ कार आणि स्कॉर्पिओया वाहनांना महाराष्ट्र शासनाची पाटी लावून आंध्रप्रदेशातून मोठ्या प्रमाणात गांजा विक्रिसाठी आणला जात असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी गाडीतील संदीप सोनटक्के आणि महिलेला ताब्यात घेतले. त्यानंतर दुसऱ्या कारला अडवून त्यांची तपासनी केली असता दोन्ही गाड्यांमध्ये गांजा सापडला. यामध्ये 1 कोटी 4 लाख 11 हजार रुपये किंमतीचा 520 किलो 550 ग्रॅम वजनाचा गांजा, 9 लाख रुपये किंमतीची स्कॉर्पिओ, 6 लाख रुपये किमतीची सेलीरीओ कार, 71 हजार रुपये किमतीचे चार मोबाईल व 200 रुपयांचा बोर्ड असा ऐवज जप्त केला आहे.
पुणे शहर ड्रग्जच्या विळख्यात?
काही दिवसांपूर्वीच पुण्यातून 1 कोटी रुपयाचे अफीम जप्त करण्यात आलं होतं. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथक एकने 3 जणांना अटक केली होती. राजस्थानची टोळी अफीमचा साठा गोळा करत होती, असं तपासात समोर आलं होतं. सुमेर जयरामजी बिष्णोई, चावंडसिंग मानसिंग राजपूत, लोकेंद्रसिंह महेंद्रसिंग राजपूत असे अटक केलेल्या आरोपींची नावं होती. पुण्यातील गोकुळनगर भागात पोलिसांनी कारवाई केली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखेचे पोलीस कर्मचारी कात्रज भागात पेट्रोलींग करत असताना माहिती मिळाली की, कात्रज-कोंढवा रोडवर एक व्यक्ती अफिम या अंमली पदार्थाची विक्री करत आहेत. पोलिसांनी छापा टाकून सुमेर बिष्णोई याला ताब्यात घेतलं होतं.
इतर महत्वाची बातमी-