Pune car Accident : एकनाथ शिंदेनी साधला जखमी विद्यार्थ्यांशी संवाद, सर्वोतपरी मदत करण्याचं आश्वासन
पुण्यातील सदाशिव पेठ परिसरात भावे हायस्कूल जवळ चहा घेत असलेल्या एमपीएससीच्या 12 विद्यार्थ्यांना एका कार चालकाने उडवल्याची घटना घडली आहे. हा कार चालक दारू पिऊन कार चालवत होता हे समोर आलं आहे.

Pune car Accident : पुण्यातील सदाशिव पेठ परिसरात भावे हायस्कूल जवळ चहा घेत असलेल्या एमपीएससीच्या 12 विद्यार्थ्यांना एका कार चालकाने उडवल्याची घटना घडली आहे. हा कार चालक दारू पिऊन कार चालवत होता हे समोर आलं आहे. या अपघातात जखमी झालेल्या विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान, अपघातानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जखमी विद्यार्थ्यांशी संवाद साधला आहे. युवा सेनेच्या नेत्या शर्मिला येवले यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विद्यार्थ्यांशी बातचीत करुन दिली. जी मदत लागेल ती आम्ही करु असे आश्वासन देखील एकनाथ शिंदे यांनी विद्यार्थ्यांना दिलं आहे.
उद्या MPSC ची परीक्षा
दरम्यान, या अपघातानंतर भाजप आमदार हेमंत रासने यांनी देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क साधला. यातील काही विद्यार्थ्यांची उद्या MPSC ची परीक्षा आहे. त्यामुळं यातून काही मार्ग काढून या विद्यार्थ्यांची परीक्षा नंतर घेता येईल का? याबाबत विचार करु असं त्यांनी सांगितल्याचे रासने म्हणाले.
जखमींवर संचेती आणि मोडक हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु
आज संध्याकाळी पुण्यातील भावे हायस्कूलजवळ ही अपघाताची घटना घडली आहे. चहाच्या टपरीवर चहा पिण्यासाठी आलेल्या 12 विद्यार्थ्यांना एका भरधाव वेगाने आलेल्या कारने उडवलं. या अपघातात तीन जण गंभीर जखमी झाले. तर नऊ विद्यार्थी किरकोळ जखमी झाले आहेत. सर्व जखमींवर संचेती आणि मोडक हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. भरधाव वेगाने कार चालवणाऱ्या ड्रायव्हरने दारू प्यायल्याचं स्पष्ट झालं आहे. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. जखमींमध्ये काही विद्यार्थी हे रविवारी होणाऱ्या एमपीएससीच्या परीक्षेला सामोरे जाणार होते. या अपघातात जखमी झालेले काही विद्यार्थी हे रविवारी होणाऱ्या एमपीएससीच्या परीक्षेला सामोरे जाणार आहेत. पण त्यांची सध्याची परिस्थिती गंभीर आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांसंदर्भात काही वेगळा मार्ग निघू शकतो का यावरही विचार करण्यात येणार आहे. दरम्यान, या घटनेनंतर पोलिसांनी कारचालकाला ताब्यात घेतलं आहे. मद्यप्राशन करून कॅब चालक कार चालवत होता. दरम्यान, या घटनेनंतर पुण्यात खळबळ निर्माण झाली. कारण एकाच वेळी कारने 12 जणांना उडवले होते. दरम्यान, या घटनेनंतर लगेच पोलिस घटनास्थळी दाखल झाले होते.
महत्वाच्या बातम्या:
Pune Accident : मोठी बातमी, पुण्यातील भावे हायस्कूलजवळ कारनं स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या 7-8 विद्यार्थ्यांना उडवलं, जखमी विद्यार्थ्यांवर उपचार सुरु
























