एक्स्प्लोर
पुण्यात एटीएम जळून खाक, ATM मध्ये नेमकी किती रोकड?
जळालेलं एटीएम आयसीआयसीआय बँकेचं होतं. मात्र एटीएममध्ये नेमकी किती रोकड होती, याची माहिती अद्याप मिळू शकली नाही.

पुणे: पुण्याच्या वारजे भागातील गणपती माथ्यावर मध्यरात्री एका इलेक्ट्रिक दुकानाला आग लागली. त्यात असलेलं एटीएमही जळून खाक झालं. त्यामुळे लाखो रुपयांची रोकडही जळून खाक झाल्याची प्राथमिक माहिती आहे. जळालेलं एटीएम आयसीआयसीआय बँकेचं होतं. मात्र एटीएममध्ये नेमकी किती रोकड होती, याची माहिती अद्याप मिळू शकली नाही.
पहाटे दोनच्या सुमारास हा प्रकार घडला. आगीची माहिती स्थानिकांनी अग्निशमन दलाला कळवली. त्यानंतर रहिवाशी आणि अग्निशमन दलाच्या मदतीनं आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं. 15 दिवसांपूर्वीच पुण्यात जनता बँकेच्या एटीएमला आग लागून रोकड जळाली होती. त्यामुळे या घटनांकडे संशयानं पाहिलं जातंय.
पहाटे दोनच्या सुमारास हा प्रकार घडला. आगीची माहिती स्थानिकांनी अग्निशमन दलाला कळवली. त्यानंतर रहिवाशी आणि अग्निशमन दलाच्या मदतीनं आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं. 15 दिवसांपूर्वीच पुण्यात जनता बँकेच्या एटीएमला आग लागून रोकड जळाली होती. त्यामुळे या घटनांकडे संशयानं पाहिलं जातंय. आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
भारत
व्यापार-उद्योग
छत्रपती संभाजी नगर























