एक्स्प्लोर

Pune Accident: भोर-महाड मार्गावर वरंध घाटात भीषण अपघात; कार 100 फूट खोल दरीत कोसळली अन्...

पुण्यातील भोर महाड मार्गावर सोमवारी पहाटे चार वाजताच्या सुमारास भीषण अपघात झाला.

Pune accident: पुण्यातील भोर महाड मार्गावरील वरंध घाटात (Varandh Ghat Accident) शंभर फूट खोल दरीत इको कार कोसळून भीषण अपघात झाला आहे. या अपघातात शुभम शिर्के (वय 22) या तरुणाचा मृत्यू झाला असून अन्य 8 जण जखमी झाले आहेत. ही घटना पहाटे 4:00 वाजताच्या सुमारास उंबर्डे गावाच्या हद्दीत घडली. महाड होऊन भोरच्या दिशेने भरधाव वेगात येणारी कार अनियंत्रित होऊन 100 फूट खोल दरीत कोसळली.  अपघाताची माहिती मिळताच स्थानिक शिरगाव रेस्क्यू टीमचा सदस्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पोलिसांच्या मदतीने जखमींना बाहेर काढले. अपघात नेमका कशामुळे झाला याचा भोर पोलीस अधिक तपास करत आहेत. (Bhor Mahad Road Accident)

अपघातात शुभम शिर्के (वय 22) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर मंगेश गुजर (वय 26), आशिष गायकवाड (वय 29), सिद्धार्थ गंधणे (वय 26), सौरभ महादे (वय 22), गणेश लवंडे (वय 27), अमोल रेकीणरं (वय 27), यशराज चंद्र (वय 22) आणि आकाश आडकर (वय 25) हे गंभीर जखमी झाले आहेत.

नक्की झाले काय?

पुण्यातील भोर महाड मार्गावर सोमवारी पहाटे चार वाजताच्या सुमारास भीषण अपघात झाला. भोर महाड मार्गावरील वरंध घाटात इको कार  महाडहून भोरच्या दिशेने जात होती. घाटातील उंबरडे गावच्या हद्दीत पहाटे चार वाजताच्या सुमारास चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि कार थेट 100 फूट दरीत कोसळली. या अपघातात  एक तरुण जागीच ठार झाला असून इतर 8 जण गंभीर जखमी झाले.अपघाताची माहिती मिळताच स्थानिक शिरगांव रेस्क्यू टीमच्या सदस्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पोलिसांच्या मदतीने जखमींना  बाहेर काढलं.  जखमींना तात्काळ बाहेर काढून, रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. स्थानिक शिरगाव रेस्क्यू टीम आणि पोलिसांनी बचाव कार्य केले आणि अपघाताची माहिती घेत तपास सुरू केला आहे.

राज्यातील अपघातांचे प्रमाण वाढले

राज्यात अपघातांचे प्रमाण कमालीचे वाढले असून कधी चालकाचे नियंत्रण सुटल्याने तर कधी वेगावर नियंत्रण नसल्याने , खराब रस्त्यांमुळे तर वाहनांच्या धडकेत होणारे अपघात वाढले आहेत. या अपघातांवर नियंत्रण ठेवण्यासाठी काही ठोस पावलं उचलण्याची गरज असून वाहनवेगावर अंकुश ठेवण्यासाठी, घाटात किंवा अपघाती वळणांवर वाहतूक नियमांचे कठोर पालन व्हावे यासाठी सरकार काय कठोर पावलं उचलते हे महत्वाचं ठरणार आहे.

हेही वाचा:

Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावर प्रशासनाच्या नाकावर टिच्चून दारू विक्री, वाहनांच्या लांबच लांब रांगा, अपघाताचा धोका वाढला

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

संतापजनक! बीडमध्ये 5 वर्षीय चिमुरडीवर अत्याचार, आईवर ग्रामस्थांचा दबाव; अखेर गुन्हा दाखल
संतापजनक! बीडमध्ये 5 वर्षीय चिमुरडीवर अत्याचार, आईवर ग्रामस्थांचा दबाव; अखेर गुन्हा दाखल
Multibagger Share : 66 रुपयांचा शेअर पाच वर्षात पोहोचला 2301 रुपयांवर,'या' मल्टी बॅगर शेअरनं 1 लाखांचे केले 35 लाख,गुंतवणूकदार मालामाल
66 रुपयांचा शेअर पाच वर्षात पोहोचला 2301 रुपयांवर,'या' मल्टी बॅगर शेअरनं 1 लाखांचे केले 35 लाख
Mumbai Crime Anant Garje: अनंत गर्जेंच्या घरी फॉरेन्सिक टीमची झाडाझडती, गौरी पालवेंनी फास घेतलेल्या पंख्याची उंची अन् वजन मोजलं, नेमकं काय घडलं?
अनंत गर्जेंच्या घरी फॉरेन्सिक टीमची झाडाझडती, गौरी पालवेंनी फास घेतलेल्या पंख्याची उंची अन् वजन मोजलं, नेमकं काय घडलं?
एका दिवसात सरकार पडू शकतं मग, नाशिकमध्ये संतप्त युवकाने एकनाथ शिंदेंचा ताफा अडवला; उपमुख्यमंत्र्यांकडून आश्वासन
एका दिवसात सरकार पडू शकतं मग, नाशिकमध्ये संतप्त युवकाने एकनाथ शिंदेंचा ताफा अडवला; उपमुख्यमंत्र्यांकडून आश्वासन
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Dharmendra Passes Away:धर्मेंद्र यांच्या पार्थिवार विले पार्लेच्या स्मशानभूमीत पार पडले अंत्यसंस्कार
Dharmendra Death News : धर्मेंद्र यांचं निधन,थोड्याच वेळात अंत्यसंस्कार : IANS वृत्त संस्था
Raj Thackeray Full Speech Parel : मतदार याद्यांवर लक्ष ठेवा, मराठी माणसांसाठी ही शेवटची निवडणूक
Hasan Mushrif : वॉर्डात कमी मतदान झालं तर खैर नाही, मतदारांना जेव्हा तंबी मिळते Special Report
Letter to CM Devendra Fadnavis:माओवाद्यांकडून सामूहिक आत्मसमर्पण,झोनल कमिटीचं मुख्यमंंत्र्यांना पत्र

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
संतापजनक! बीडमध्ये 5 वर्षीय चिमुरडीवर अत्याचार, आईवर ग्रामस्थांचा दबाव; अखेर गुन्हा दाखल
संतापजनक! बीडमध्ये 5 वर्षीय चिमुरडीवर अत्याचार, आईवर ग्रामस्थांचा दबाव; अखेर गुन्हा दाखल
Multibagger Share : 66 रुपयांचा शेअर पाच वर्षात पोहोचला 2301 रुपयांवर,'या' मल्टी बॅगर शेअरनं 1 लाखांचे केले 35 लाख,गुंतवणूकदार मालामाल
66 रुपयांचा शेअर पाच वर्षात पोहोचला 2301 रुपयांवर,'या' मल्टी बॅगर शेअरनं 1 लाखांचे केले 35 लाख
Mumbai Crime Anant Garje: अनंत गर्जेंच्या घरी फॉरेन्सिक टीमची झाडाझडती, गौरी पालवेंनी फास घेतलेल्या पंख्याची उंची अन् वजन मोजलं, नेमकं काय घडलं?
अनंत गर्जेंच्या घरी फॉरेन्सिक टीमची झाडाझडती, गौरी पालवेंनी फास घेतलेल्या पंख्याची उंची अन् वजन मोजलं, नेमकं काय घडलं?
एका दिवसात सरकार पडू शकतं मग, नाशिकमध्ये संतप्त युवकाने एकनाथ शिंदेंचा ताफा अडवला; उपमुख्यमंत्र्यांकडून आश्वासन
एका दिवसात सरकार पडू शकतं मग, नाशिकमध्ये संतप्त युवकाने एकनाथ शिंदेंचा ताफा अडवला; उपमुख्यमंत्र्यांकडून आश्वासन
Pakistan Army Video: पाकिस्तानी लष्करावर एकाचवेळी दोन आत्मघाती हल्ले; हल्लेखोर थेट मुख्यालयात घुसले, 3 कमांडो ठार
Video: पाकिस्तानी लष्करावर एकाचवेळी दोन आत्मघाती हल्ले; हल्लेखोर थेट मुख्यालयात घुसले, 3 कमांडो ठार
'तर भिंत फोडणार साहेब' कोल्हापूर विमानतळाला लागून रस्ता बंद झाल्याने तामगावकरांचा आक्रोश; गावकऱ्यांना 20-25 किमी वळसा घालायची पाळी
'तर भिंत फोडणार साहेब' कोल्हापूर विमानतळाला लागून रस्ता बंद झाल्याने तामगावकरांचा आक्रोश; गावकऱ्यांना 20-25 किमी वळसा घालायची पाळी
Gold Rate : सोन्याच्या दरात 1448 रुपयांची घसरण, आठवड्याच्या पहिल्याच दिवशी चांदी स्वस्त, जाणून घ्या नवे दर
सोन्याच्या दरात 1448 रुपयांची घसरण,आठवड्याच्या पहिल्याच दिवशी चांदी स्वस्त, जाणून घ्या नवे दर
Solapur News : दोन मित्रांनी गळ्याला दोरी लावली, आधी गोरख गेला, मग दु:ख सहन न झाल्याने सुरेशनेही जीवन संपवलं, सोलापूर हादरलं
मोठी बातमी : दोन मित्रांनी गळ्याला दोरी लावली, आधी गोरख गेला, मग दु:ख सहन न झाल्याने सुरेशनेही जीवन संपवलं, सोलापूर हादरलं
Embed widget