एक्स्प्लोर

Pune Accident : देव तारी त्याला कोण मारी! डंपरखाली येऊनही महिला वाचली, नेमकं काय घडलं?

देव तारी त्याला कोण मारी याचा प्रत्यय पुण्यातील सिंहगड रोडवर आला आहे. भर रस्त्यात डंपरखाली येऊनही महिला बचावली आहे.

Pune Accident : पुणे शहरात सिंहगड रस्त्यावर (Pune Accident News) एक अपघात घडला. या अपघाताचे सीसीटीव्ही समोर आला असून हा अपघात थरारक होता. सिंहगड रोडवर असणाऱ्या रोहन कृतिका सोसायटीच्या समोर एक सिग्नल आहे. हे सिग्नल ओलांडताना डंपरने एका महिलेला धडक दिली. सिग्नल सुटण्याच्या वेळेस महिला झेब्रा क्रॉसिंगवरून जात होती. यावेळी महिला थेट डंपर खाली आली. तरीही डंपर चालकाला महिला दिसली नाही. डंपर पुढे गेल्यानंतर ही महिला जागेवर उठून बसली आणि जाणाऱ्या लोकांनी महिलेला रस्त्याच्या बाजूला आणलं. 

ठोंबरे असे या महिलेचा आडनाव असून तिच्या पायाला दुखापत झाली आहे. अपघात झाल्यानंतर बाजूच्या लोकांनी महिलेला दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केला आहे. ठोंबरे यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. या संदर्भात दत्तवाडी पोलीस स्टेशन मध्ये गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. 

तेव्हा डंपरनच जीव घेतला होता...

पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील किरकिटवाडी फाट्याजवळ  अपघात झाला होता. भरधाव डंपरने ओव्हरटेक करण्याच्या नादात दुचाकीला धडक दिली होती. त्यानंतर दुचाकीवरील नवविवाहित तरुणीचा समोरुन येणाऱ्या टँकरखाली पडून जागीच मृत्यू झाला होता. अपघातात तरुणीचा जागीच मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली गेली. शिवानी शैलेश पाटील असे या अपघातात मृत्यू झालेल्या विवाहितेचे नाव होतं. या घटनेचे सीसीटीव्ही फूटेज समोर आले होतं. शिवानी हिचा काही दिवसांपूर्वीच विवाह झाला होता. ती आपल्या पतीसोबत गाडीवरुन कामाला जात होती. किरकटवाडी फाट्याजवळील रामेश्वर पतसंस्थेच्या समोर वाहनांची वर्दळ असताना मागून भरधाव वेगात आलेल्या अवजड डंपरने दुचाकीला जोरात धडक दिली. या धडकेत शिवानी आणि तिचा पती दोघेही रस्त्यावर पडले होते. 

भरधाव डंपर घेतायेत अनेकांचे जीव

पुणे आणि पुणे जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून अपघाताच्या संख्येत चांगलीच वाढ झाल्याचं बघायला मिळालं आहे. त्यात डंपरची धडक लागून झालेल्या अपघातांचं प्रमाण जास्त आहे. त्यामुळे हा डंपरचा वेग अनेकांच्या मृत्यूचं कारण बनत आहे. कालच भरधाव डंपरच्या धडकेत एका सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्यासह त्यांच्या पत्नीचा मृत्यू झाला. पुण्यातील वाघोली परिसरात हा अपघात झाला होता. अपघात झाल्यानंतर या परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. दुपारी एक वाजता केसनंद फाट्याजवळ डंपरने धडक दिली. यात दोघांचाीही मृत्यू झाला. यानंतर डंपर चालकाने पळ काढला. त्यानंतर आता पोलीस या डंपर चालकाचा शोध घेत आहेत. 

हेही वाचा-

Pune NIA News : पुण्यातील कोंढव्यात नेमकं चाललंय काय? तरुणांना डॉक्टर लावत होता इसिसच्या नादाला, नेमकं काय आहे प्रकरण?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

स्मशानभूमीवर अनेकांनी संसार थाटले, अतिक्रमण त्वरित हटवा; DCDC बैठकीत भाजप खासदार आक्रमक
स्मशानभूमीवर अनेकांनी संसार थाटले, अतिक्रमण त्वरित हटवा; DCDC बैठकीत भाजप खासदार आक्रमक
ठाकरे गटाला खिंडार, शिंदेंचं ऑपरेशन टायगर; रविंद्र धंगेकरांसह पुण्यातील 3 माजी आमदार अन् 6 नेते संपर्कात?
ठाकरे गटाला खिंडार, शिंदेंचं ऑपरेशन टायगर; रविंद्र धंगेकरांसह पुण्यातील 3 माजी आमदार अन् 6 नेते संपर्कात?
कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 
कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 
भूमिका बदलाच्या टीकेवर भाजपकडून राज ठाकरेंवर पलटवार; आशिष शेलारांचा मैत्रीपूर्ण सल्ला
भूमिका बदलाच्या टीकेवर भाजपकडून राज ठाकरेंवर पलटवार; आशिष शेलारांचा मैत्रीपूर्ण सल्ला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Jalgaon Old Couple Home : 80 वर्षांच्या आजी-आजोबांच्या घरावर महापालिकेचा हातोडाRajkiya Shole : उद्धव ठाकरे-चंद्रकांत पाटलांची भेट, लग्नातील भेट युतीच्या गाठीपर्यंत घेऊन जाणार?Zero Hour Raj Thackeray: मनसे पदाधिकारी मेळव्यात टीकेची राज ठाकरेंकडून चिरफाड, राज ठाकरेंकडून चिरफाडZero Hour on Raj Thackeray :विधानसभेच्या निकालावर शंका, राज ठाकरेंना नेमकं काय म्हणायचंय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
स्मशानभूमीवर अनेकांनी संसार थाटले, अतिक्रमण त्वरित हटवा; DCDC बैठकीत भाजप खासदार आक्रमक
स्मशानभूमीवर अनेकांनी संसार थाटले, अतिक्रमण त्वरित हटवा; DCDC बैठकीत भाजप खासदार आक्रमक
ठाकरे गटाला खिंडार, शिंदेंचं ऑपरेशन टायगर; रविंद्र धंगेकरांसह पुण्यातील 3 माजी आमदार अन् 6 नेते संपर्कात?
ठाकरे गटाला खिंडार, शिंदेंचं ऑपरेशन टायगर; रविंद्र धंगेकरांसह पुण्यातील 3 माजी आमदार अन् 6 नेते संपर्कात?
कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 
कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 
भूमिका बदलाच्या टीकेवर भाजपकडून राज ठाकरेंवर पलटवार; आशिष शेलारांचा मैत्रीपूर्ण सल्ला
भूमिका बदलाच्या टीकेवर भाजपकडून राज ठाकरेंवर पलटवार; आशिष शेलारांचा मैत्रीपूर्ण सल्ला
40 लाख रुपयांत MPSC चा पेपर, परीक्षेच्या दोन दिवस आधी हाती; पुण्यात कॉल रेकॉर्डींग व्हायरल, बोर्डाचं स्पष्टीकरण
40 लाख रुपयांत MPSC चा पेपर, परीक्षेच्या दोन दिवस आधी हाती; पुण्यात कॉल रेकॉर्डींग व्हायरल, बोर्डाचं स्पष्टीकरण
माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे 4066 नवे आधार किट जिल्हाधिकाऱ्यांना देणार; तुमच्या जिल्ह्यात किती?
माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे 4066 नवे आधार किट जिल्हाधिकाऱ्यांना देणार; तुमच्या जिल्ह्यात किती?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 जानेवारी 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 जानेवारी 2025 | गुरुवार
'सैराट'मधील लंगड्याची फुल्ल हवा, तानाजीचा लूक नवा; गळ्यात सोनं, हाती घड्याळ, सोबतीला मोनालिसा
'सैराट'मधील लंगड्याची फुल्ल हवा, तानाजीचा लूक नवा; गळ्यात सोनं, हाती घड्याळ, सोबतीला मोनालिसा
Embed widget