एक्स्प्लोर
'भाजप आ. अनिल गोटेंनी मोपलवारांच्या 26 ऑडिओ क्लीप दिल्या'
सनदी अधिकारी राधेश्याम मोपलवारांच्या वादग्रस्त संवादाच्या 26 ऑडिओ क्लीप माझ्याकडे आहेत. यातून मोठा भ्रष्टाचार समोर येणार असल्याचा दावा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. ते आज अकोल्यामध्ये एबीपी माझाशी बोलत होते.
अकोला : सनदी अधिकारी राधेश्याम मोपलवारांच्या वादग्रस्त संवादाच्या 26 ऑडिओ क्लीप माझ्याकडे आहेत. यातून मोठा भ्रष्टाचार समोर येणार असल्याचा दावा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. ते आज अकोल्यामध्ये एबीपी माझाशी बोलत होते.
विशेष म्हणजे, भाजप आमदार अनिल गोटेंनी या क्लीप आपल्याला पुरविल्याची माहितीही चव्हाणांनी दिली.
याबाबत अधिक बोलताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, "तेलगी प्रकरणात जामीनावर बाहेर असलेल्या मोपलवाराना मुख्यमंत्र्यांनी समृद्धी महामार्गाची जबाबदारी दिली. त्यांची घरगुती वादावरुनची एक ऑडिओ क्लीप व्हायरल झाली. पण भाजपचे विद्यमान आमदार अनिल गोटेंनी मोपलवारांच्या 26 ऑडिओ क्लीप मला दिल्या. भाजप सरकार मोपलवारांवर कारवाई करत नसल्याने, त्यांनी माझ्याकडे या क्लीप सोपवल्या असल्याचा,'' दावाही चव्हाण यांनी यावेळी केला.
काय आहे नेमकं प्रकरण?
सुरुवातीपासून वादग्रस्त ठरलेला समृद्धी महामार्ग प्रकल्प आता एका नव्या वादात सापडण्याची शक्यता आहे. या प्रकल्पाचे प्रमुख अधिकारी राधेश्याम मोपलवार यांचे वादग्रस्त फोन संभाषणं समृद्धी महामार्गाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपवर व्हायरल झाले आहेत. या ऑडिओ क्लीपची सत्यता एबीपी माझाने तपासलेली नाही.
ज्या समृद्धी महामार्गावरून सरकार आणि शेतकऱ्यांमध्ये रण सुरु आहे, त्याच महामार्गाची जबाबदारी असलेल्या एमएसआरडीसीचे उपाध्यक्ष आणि संस्थापकीय संचालक मोपलवार यांच्यावर एक गंभीर आरोप झाला आहे. धक्कादायक म्हणजे हा आरोप सेटलमेंटचा आहे. शेतकऱ्यांच्या मते या ऑडिओ क्लिपमध्ये मोपलवार आणि एक मध्यस्थ यांच्यात एका इमारतीच्या बांधकामावरून सेटलमेंट सुरु आहे.
दरम्यान, राधेश्याम मोपलवार यांची कथित ऑडिओ क्लिप आली होती. त्यानंतर त्यांच्या चौकशी सुरु आहे. आता पृथ्वीराज चव्हाणांनी आणखी आरोप केल्यानं मोपलवारांची अडचण वाढू शकते.
दुसरीकडे नारायण राणेंच्या कथित भाजपप्रवेशावरुनही पृथ्वीराज चव्हाणांनी त्यांना चिमटा काढला. राणेंना काँग्रेस समजलीच नाही, त्यांना आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे, असं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे.
नारायण राणेंबद्दल बोलताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, राणेंचा अंतिम निर्णय माहित नाही. त्याबाबत त्यांच्याशी चर्चाही केलेली नाही. पण राणेंनी कुठेतरी आत्मपरीक्षण केलं पाहिजे. कारण, त्यांना काँग्रेसची संस्कृतीच समजली नाही.
संबंधित बातम्या
राधेश्याम मोपलवार ईडी आणि सीबीआयच्या रडारवर
राणेंना काँग्रेस समजली नाही, त्यांनी आत्मपरीक्षण करावं : पृथ्वीराज चव्हाण
‘मोपलवारांसोबतची ‘ती’ ऑडिओ क्लीप खरी, तो आवाज माझाच’
एबीपी माझाचा गौप्यस्फोट, महामार्गात दलालांची ‘समृद्धी’?
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
Advertisement