एक्स्प्लोर
Advertisement
एअर स्ट्राईकचे पुरावे हवेत, तर कोल्हापुरात या, चपलेचा प्रसाद देतो, हिंदू एकता आंदोलनाचा इशारा
कोल्हापुरातील शिवाजी चौकात कोल्हापुरी स्टाईलने हे अनोखं आंदोलन करण्यात आलं. देशात काही जण भारताने पाकिस्तान वर केलेल्या एअर स्ट्राईकचे पुरावे मागत आहेत. त्यानां सडेतोड उत्तर देण्यासाठी कोल्हापुरी स्टाईलने हे आंदोलन आज करण्यात आलं.
कोल्हापूर : पाकिस्तानवर केलेल्या एअर स्ट्राईकचा पुरावे पाहिजेत तर कोल्हापुरात या, त्यांना थेट कोल्हापूरी स्टाईलने अस्सल कोल्हापूरी चपलेचा प्रसाद मिळेल असा थेट इशारा हिंदू एकता आंदोलनाच्या वतीनं करण्यात आला.
कोल्हापुरातील शिवाजी चौकात कोल्हापुरी स्टाईलने हे अनोखं आंदोलन करण्यात आलं. देशात काही जण भारताने पाकिस्तान वर केलेल्या एअर स्ट्राईकचे पुरावे मागत आहेत. त्यानां सडेतोड उत्तर देण्यासाठी कोल्हापुरी स्टाईलने हे आंदोलन आज करण्यात आलं.
या आंदोलनात 150 किलो वजनाची 11 फूटी उंच कोल्हापूरी चप्पल खास आकर्षण होतं. यावेळी पाकिस्तान विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आल्या. तसेच कोल्हापुरी चप्पल दाखवत निषेधही नोंदवण्यात आला.
पाकिस्तानवर केलेल्या एअर स्ट्राईकचा जर कोण पुरवा मागत असेल तर त्यांनी कोल्हापुरातल्या शिवाजी चौकात केव्हाही यावं असा थेट इशारा देण्यात आला.
पुलवामा हल्ल्यातील शहीदाच्या पत्नीने मागितले 'एअर स्ट्राईक'चे पुरावे
जम्मू काश्मीरच्या पुलवामा येथे दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले. या हल्ल्यानंतर भारतीय वायुसेनेने पाकाव्याप्त काश्मीरसह पाकिस्तानमध्ये घुसून जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या तळांवर हल्ला केला. या हल्ल्यात 'जैश..'चे 350 दहशतवादी ठार झाल्याचा दावा केंद्र सरकारने केला आहे. परंतु सरकारने अद्याप याचे पुरावे सादर केलेले नाहीत. विरोधी पक्षाने याबाबतच्या पुराव्यांची मागणी केली आहे. त्यातच आता पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानाच्या वीरपत्नीनेदेखील बालाकोट येथील हवाई हल्ल्याचे पुरावे मागितले आहेत.
काँग्रेसच्या नेत्यांकडून 'एअर स्ट्राईक'च्या पुराव्यांचा मागणी
काही दिवसांपूर्वी काँग्रेसच्या नेत्यांनी एअर स्ट्राईकमध्ये किती दहशतवादी मारले गेले याची माहिती सरकारने द्यावी अशी मागणी केली होती. काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी म्हटले की, "काही वर्षांपूर्वी अमेरिकेने पाकिस्तानमध्ये घुसून अमेरिकेचा नंबर एकचा शत्रू असलेल्या ओसामा बिन लादेनवर कारवाई केली. त्याचा अड्डा उध्वस्त करुन त्याला ठार केले. कारवाई पूर्ण झाल्यानंतर अमेरिकेने लादेनला ठार केल्याचे पुरावे जगासमोर ठेवले होते. त्याचप्रमाणे आपणही दहशतवाद्यांवर केलेल्या कारवाईबाबत करायला हवे."
संबंधित बातम्या
आमचं काम लक्ष्य भेदणं, मृतदेह मोजण्याचं नाही : वायू दल प्रमुख
मसूद अजहर जिंदा है : पाकिस्तानी मीडियाचा दावा
भारताच्या हवाई हल्ल्यात 'जैश'चं मोठं नुकसान, मसूदच्या भावाची कबुली, मात्र पाकिस्तानी लष्कराला अमान्य
भारतीय समजून पाकिस्तानी लोकांनी त्यांच्याच पायलटला मारले
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
महाराष्ट्र
निवडणूक
निवडणूक
Advertisement