एक्स्प्लोर

सोलापुरात जामिनावर सोडलेल्या कैद्याला कोरोनाची लागण, कारागृहातील 45 जणांचे स्वॅब घेतले

जवळपास अडीच महिने हा आरोपी जेलमध्येच होता. 22 मे रोजी अचानक ताप आल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यामुळे त्याला कोरोनाची लागण कुठे झाली? हा मोठा प्रश्न आता उपस्थित होतोय.

सोलापूर : जवळपास अडीच महिने तुरुंगात असलेल्या कैद्याचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह असल्याने सोलापुरतील कारागृहातील 45 जणांचे स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. 22 मे रोजी आजारी असल्याने सोलापुरातील कारागृहातून एका कैद्याला छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या कैद्याला न्यायालयाकडून 23 मे रोजी जामीन मंजूर करण्यात आला. मात्र 24 मे रोजी रात्री या जामिनावर मुक्त करण्यात आलेल्या आरोपीचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आल्याचे निष्पन्न झाले आहे.
11 मार्च रोजी जबरी चोरीच्या आरोपात या आरोपीला जिल्हा मध्यवर्ती कारगृहात रवाना करण्यात आले होते. जवळपास अडीच महिने हा आरोपी जेलमध्येच होता. मात्र 22 मे रोजी अचानक ताप आल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यामुळे त्याला कोरोनाची लागण कुठे झाली? हा मोठा प्रश्न आता उपस्थित होतोय. दरम्यान या प्रकरणी सदर कैद्याला कोरोनाची लागण कुठून झाली याचा शोध सुरु असून त्याच्या संपर्कातील 45 जणांचे स्वॅब घेण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली.
कैद्याचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे कळताच कारागृह प्रशासनाने तात्काळ खबरदारी घेतली आहे. कारागृहातील सर्व अधिकारी, कर्मचारी तसेच कैद्यांचे स्क्रिनिंग करण्यात आलं आहे. महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातर्फे कारागृह परिसरात निर्जंतुकीकरण देखील करण्यात आले आहे. सोलापूर जिल्हा मध्यवर्ती कारागृहात 141 कैद्यांना ठेवण्याची क्षमता आहे. मात्र सद्यस्थितीत कारागृहात 317 कैदी कारागृहात आहेत. या आधी जिल्हा कारागृहात 401 कैदी होते. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनेनुसार जवळपास 84 कैद्यांना पॅरोलवर सोडण्यात आलं आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कारागृह प्रशासन वरिष्ठ प्रशासनाने दिलेल्या सूचना आणि नियमांनुसार नियमितपणे कैद्यांची देखरेख करत होतं. कारागृहातील कैद्यांच्या आहारात बदल देखील करण्यात आला होता. कारागृहात येणाऱ्या प्रत्येकास हाताची स्वच्छता करण्यास सांगितले जात होते. तसेच सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचे ही प्रयत्न कारागृहात केले जात आहेत. याशिवाय नवीन येणाऱ्या कैद्यांसाठी नियमित बॅरेकमध्ये न ठेवता तात्पुरत्या जेलची व्यवस्था देखील करण्यात आली आहे. इतकी खबरदारी घेतल्यानंतर देखील या बंदीस कोरोनाची लागण कुठे झाली याचा उलगडा होणे आवश्यक आहे.

मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे शिक्षण घेतलेलं असून एबीपी माझामध्ये मागील 9 वर्षांपासून कार्यरत आहे. मुंबईत assistant प्रोड्यूसर म्हणून काम केल्यानंतर मागील 7 वर्षांपासून सोलापूर जिल्हा प्रतिनिधी पदावर कार्यरत.

Read More

महत्त्वाच्या बातम्या

MPSC Paper Leak Case: एमपीएससी पेपरफुटी प्रकरणात नाव आलं, आता नरहरी झिरवाळांच्या OSD ची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, 'माझी बदनामी...'
एमपीएससी पेपरफुटी प्रकरणात नाव आलं, आता नरहरी झिरवाळांच्या OSD ची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, 'माझी बदनामी...'
Dahihandi Live Updates : महाराष्ट्रात यंदाचे पहिले नऊ थर ठाण्यात; मुंबईसह राज्यात आज दहीहंडीचा थरथराट, गोविंदांसाठी लाखोंंची बक्षिसं
Dahihandi Live Updates Maharashtra : महाराष्ट्रात यंदाचे पहिले नऊ थर ठाण्यात; मुंबईसह राज्यात आज दहीहंडीचा थरथराट, गोविंदांसाठी लाखोंंची बक्षिसं
Dr. Babanrao Taywade: छगन भुजबळ रस्त्यावर उतरले तर तन-मन-धनाने आम्ही त्यांच्या सोबत; राष्ट्रीय ओबीसी महासंघाकडून समर्थन, तर सरकारच्या भूमिकेत दूजाभाव असल्याही केला आरोप
छगन भुजबळ रस्त्यावर उतरले तर तन-मन-धनाने आम्ही त्यांच्या सोबत; राष्ट्रीय ओबीसी महासंघाकडून समर्थन, तर सरकारच्या भूमिकेत दूजाभाव असल्याही केला आरोप
Nashik News: मुंबईहून 40 जणांचा ग्रुप नाशिकमध्ये आला, रामकुंड परिसरात स्नान करताना चार मुलं बुडाली, एकाचा दुर्दैवी अंत
मुंबईहून 40 जणांचा ग्रुप नाशिकमध्ये आला, रामकुंड परिसरात स्नान करताना चार मुलं बुडाली, एकाचा दुर्दैवी अंत

व्हिडीओ

Dahihandi 2026 Aryans Govinda Pathak 10 Thar: 10 थर बसले, 10 वा उठण्याच्या आधी कोसळले; आर्यन्स गोविंदा पथकाचा 10 थरांचा थरारक VIDEO
Dahihandi 2026: मनसेच्या दहीहंडीत 9 व्या थरावरुन गोविंदा कोसळला; थरारक VIDEO
Dahihandi 2026 Jai Jawan: 1..2..3..4..5..6..7..8..9..10..11...; जय जवानच्या संदीप ढवळेंची मोठी घोषणा
Special Report on El Nino : एल निनोचं सावट, पुढच्या वर्षीही संकट? Rain Update
Manoj Jarange Special Report : पुन्हा आरोपांचं वळ, जरांगे विरुद्ध भुजबळ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
iPhone 18 Pro Camera : iPhone 18 Pro घेण्याचा विचार करताय, कॅमेरा किती दमदार असेल? जाणून घ्या A टू Z माहिती
iPhone 18 Pro घेण्याचा विचार करताय, कॅमेरा किती दमदार असेल? जाणून घ्या A टू Z माहिती
Belgium PM Bart De Wever in India: बेल्जियमच्या पंतप्रधानांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी एक खास भेट आणली, पण दिली नाही? बार्ट डी वेव्हर यांनी सांगितलं कारण, म्हणाले...
बेल्जियमच्या पंतप्रधानांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी एक खास भेट आणली, पण दिली नाही? बार्ट डी वेव्हर यांनी सांगितलं कारण, म्हणाले...
Rooftop Solar: भाडेकरूही रूफटॉप सोलरचा फायदा घेऊ शकतात का, काय आहेत नियम? जाणून घ्या सविस्तर
भाडेकरूही रूफटॉप सोलरचा फायदा घेऊ शकतात का, काय आहेत नियम? जाणून घ्या सविस्तर
Accident News: काम करताना किरकोळ वाद; थट्टामस्करीत म्हणाला, मी स्वतःलाच सुरी भोसकून घेतो अन्... ; किरकोळ वादातून पुण्याच्या तरुणाचा गोव्यात दुर्दैवी अंत
काम करताना किरकोळ वाद; थट्टामस्करीत म्हणाला, मी स्वतःलाच सुरी भोसकून घेतो अन्... ; किरकोळ वादातून पुण्याच्या तरुणाचा गोव्यात दुर्दैवी अंत
Divija Fadanvis Video: देवाकडे या मोह-मायेच्या गोष्टी मागू नका.....; देवेंद्र फडणवीस यांच्या मुलीने श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने शेअर केला खास व्हिडीओ, दिविजाने सांगितलं देवाला काय आहे प्रिय
देवाकडे या मोह-मायेच्या गोष्टी मागू नका.....; देवेंद्र फडणवीस यांच्या मुलीने श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने शेअर केला खास व्हिडीओ, दिविजाने सांगितलं देवाला काय आहे प्रिय
Eknath Shinde Thane: ठाण्यात एकनाथ शिंदेंचं भाषण सुरू असतानाच समईनं घेतला पेट; प्रताप सरनाईकांनी प्रसंगावधान राखत विझवली आग, स्टेजवर नेमकं काय घडलं?
ठाण्यात एकनाथ शिंदेंचं भाषण सुरू असतानाच समईनं घेतला पेट; प्रताप सरनाईकांनी प्रसंगावधान राखत विझवली आग, स्टेजवर नेमकं काय घडलं?
Beed Well News: निसर्गाचा अनोखा चमत्कार! बीडमध्ये कोरडी ठाक विहीर अचानक पाण्याने तुडूंब भरली; भगवान गडाच्या पायथ्याशी नागरिकांची मोठी गर्दी
निसर्गाचा अनोखा चमत्कार! बीडमध्ये कोरडीठाक विहीर अचानक पाण्याने तुडूंब भरली; भगवान गडाच्या पायथ्याशी नागरिकांची मोठी गर्दी
Gold Rate: सोने दरात सलग दुसऱ्या दिवशी वाढ, चांदी 2 लाख 40 हजारांवर, सोने चांदीचे लेटेस्ट दर जाणून घ्या
सोने दरात सलग दुसऱ्या दिवशी वाढ, चांदी 2 लाख 40 हजारांवर, सोने चांदीचे लेटेस्ट दर जाणून घ्या
Embed widget