एक्स्प्लोर

Presidential Election : राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत महाराष्ट्रात किती क्रॉस व्होटिंग? मुख्यमंत्र्यांचे मिशन 200 फेल?

Eknath Shinde : राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीमध्ये एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना राज्यातून 200 मतं देणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं होतं. 

मुंबई: राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत काल एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू प्रचंड बहुमतानं विजयी झाल्या. त्यांच्या विजयानंतर आता चर्चा सुरु आहे ती मतदानातल्या आकडेवारीची. या निवडणुकीत अनेक राज्यांत क्रॉस व्होटिंगचे प्रकार पाहायला मिळाले. शिवाय महाराष्ट्रात मुख्यमंत्र्यांनी केलेले दावे किती प्रभावी ठरले त्यावर एक नजर टाकुयात. 

देशाच्या 15 व्या राष्ट्रपती म्हणून गुरवारी द्रौपदी मुर्मू यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं. निवडणुकीत 6 लाख 76 हजार 803 मतं मिळवून त्यांनी बाजी मारली. या निवडणुकीत देशभरात जवळपास 124 आमदारांनी क्रॉस व्होटिंग केलं. पण अर्थात सगळ्यांचं लक्ष होतं महाराष्ट्रात. कारण इथे नुकतंच सत्तांतर झालं होतं आणि स्वत: मुख्यमंत्र्यांनीही 200 च्या पेक्षा जास्त मिळवून देऊ असा दावा केला होता. 

राष्ट्रपती निवडणुकीत खरंतर कुठल्याही पक्षाला व्हिप काढता येत नाही. आमदार, खासदारांना स्वत:च्या विवेकबुद्धीचा वापर करुन मतदान करायचं असतं. एक आदिवासी महिला राष्ट्रपती भवनात पोहचली याबद्दल देशात सर्वांनाच आनंद आहे. पण स्वत: मुख्यमंत्र्यांनीच याबाबत काही मतं फोडण्याचे दावे केल्यानं त्याचं नंतर काय झालं याचं विश्लेषण करण्याची वेळ आली आहे. 

राष्ट्रपती निवडणुकीत मिशन 200 फेल झालं?

  • महाराष्ट्रात भाजपची आणि मित्रपक्षांची संख्या- 113 
  • त्यापैकी मुक्ता टिळक, लक्ष्मण जगताप यांनी मतदान केलं नाही- 111
  • शिंदे गटाचे आमदार आहेत- 52
  • शिवसेनेच्या मातोश्री गटाचे आमदार- 15
  • ही संख्या होते- 178
  • द्रौपदी मुर्मू यांना मतं मिळाली- 181 

म्हणजे ठरलेल्या मतांपेक्षा अधिकची मतं मिळाली ती तीन, पण 200 पर्यंत काही आकडा पोहचू शकला नाही

राष्ट्रपती निवडणुकीवरुन शिवसेनेच्या खासदारांचीही नाराजी समोर आली होती. खासदार राहुल शेवाळे यांनी उघडपणे द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा दिला पाहिजे अशी भूमिका घेतली. त्यानंतर दबावापोटी शिवसेनेला हा निर्णय जाहीर करावा लागला होता. पण तेव्हा हा पाठिंबा एनडीएला नसून एका आदिवासी महिलेला आहे ही भूमिका उद्धव ठाकरेंनी घेतली. पण त्यानंतरही खासदारांचं बंड काही शमलं नाही. 12 खासदारांनी शिंदे गटाची सोबत करायचं ठरवलं. 

द्रौपदी मुर्मू यांच्या विजयाची वैशिष्ट्ये-

  • द्रौपदी मुर्मू यांना देशातल्या सर्व राज्यांमधून मतं मिळाली.
  • केरळमध्ये एनडीएचा एकही आमदार नाही, पण तिथेही एक मत मुर्मूंना मिळालं
  • याउलट विरोधकांचे उमेदवार यशवंत सिन्हा यांना आंध्र प्रदेश, सिक्कीम, नागालँड या तीन राज्यांमध्ये एकही मत मिळालं नाही.
  • यशवंत सिन्हा मूळचे झारखंडचे, तिथं त्यांना 81 पैकी 9 आमदारांनी मत दिलं
  • मुर्मू या मूळच्या ओडिशाच्या, तिथं 147 पैकी 137 आमदारांनी त्यांना मत दिलं

राष्ट्रपती निवडणुकीनंतर आता उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत काय होतं याचीही उत्सुकता असेल. कालच ममता बॅनर्जी यांनी या निवडणुकीत तटस्थ राहण्याची भूमिका जाहीर केली आहे. पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड, ज्यांच्याशी इतके दिवस त्यांचं विळ्याभोपळ्याचं नातं होतं, तेच आता उपराष्ट्रपती म्हणून दिल्लीला चाललेत. काही दिवसांपूर्वी ममता बॅनर्जी, जगदीप धनखड, आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिश्व शर्मा यांची एक मुलाखतही झाली होती. त्यानंतरच धनखड यांची उमेदवारी जाहीर झाली होती. 

राज्यसभा, विधानपरिषद आणि त्यानंतर सत्तांतर अशी मतफुटीची तिहेरी मालिका महाराष्ट्रात भाजपनं जून महिन्यात घडवून आणली होती. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रपती निवडणूक होत होती. 200 पेक्षा अधिक मतं मिळवून देऊ हा दावा मुख्यमंत्री शिंदे यांनी केला होता. तो यशस्वी झाला नसला तरी भविष्याच्या राजकारणात सरकारच्या मदतीला येणारे अदृश्य हात उघड होणार का हे पाहावं लागेल. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सDubai Sheikh Wife Bikini Special Report : पत्नीला बिकिनीत पाहण्यासाठी केला 400 कोटींचा चुराडाPune Metro Inauguration Special Report :दौरा रद्द झाला, मेट्रोचं लोकार्पण रखडलं; पुणकरांना जाम खटकलंChhatrapati Shivaji Maharaj Statue Special Report : पुतळा कुणामुळे कोसळला? आरोपी ठरले! कारवाई कधी?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
Embed widget