एक्स्प्लोर

ज्यांना शेंदूर लावला, ते शिवसेना गिळायला निघालेत - उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल 

Uddhav Thackeray : ज्यांना शेंदूर लावला, ते शिवसेना गिळायला निघाले आहेत. त्यांना भाजपची साथ आहे, भाजपला अंदाज नाही, कोणत्या शक्तीसोबत पंगा घेतलाय, असा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी केला.

Uddhav Thackeray : ज्यांना शेंदूर लावला, ते शिवसेना गिळायला निघाले आहेत. त्यांना भाजपची साथ आहे, भाजपला अंदाज नाही, कोणत्या शक्तीसोबत पंगा घेतलाय, असा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी केला. भाजपला ठाकरे आणि शिवसेना हे नातं संपवाचं आहे. याआधी अनेकदा शिवसेना फोडण्याचा प्रयत्न झाला पण आता शिवसेना संपवण्याचा डाव आखलाय, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.  

गद्दारांना कुठल्या ना कुठल्या पक्षात जाण्याशिवाय पर्याय नाही, असे अनेक तज्ज्ञ सांगतात. काल त्यांना एका पक्षाने ऑफर दिली आहे, असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी लगावलाय. 

किती वादळ आली तरी शिवसेनेची पाळं मुळं घट्ट आहे आहेत.  जे गेले त्यांचं कोणत्या भाषेत वर्णन करायचं. अन् काल त्यांनी आम्हाला गद्दार बोलू नका अशी विनंती केली. हे आम्ही नाही, त्यांनी त्यांच्या कपाळावर टिक्का लावून घेतलया. जे गेले आहेत, त्यांच्या बरोबर एकही शिवसैनिक गेला नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले. अजय चौधरी यांना विधइमंडळाचे गटनेता केले आहे, असेही यावेळी उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.
 
2019 मध्ये सर्व समसमान ठरले होते. पण त्यानंतर जागा तर कमी दिल्याच. पण जे ठरले होते, त्याबाबात नाही म्हणाले.  त्यावेळी त्यांनी अपक्ष आमदारांना साथ देत शिवसेनेच्या जागा पाडल्या. अडीच अडीच वर्ष सत्ता द्या म्हटले होते. तेव्हा नाही म्हणाले मग आता कसं जमलं. हे आधीच झालं असते, तर सन्मानं झाले असते. मनावर दगड ठेवून करायची गरज नव्हती, असा टोमणा उद्धव ठाकरे यांनी लगावला.

गेले बरेच दिवस अरविंद सावंत कार्यलायचं उद्घघाटन करण्यासाठी बोलवत होते. पण मी दुर्लक्ष करत होतो. पण आता दुर्लक्ष करुन चालणार नाही. आमदार-खासदार म्हणतात ते ऐकावं लागतेच, असे हल्ली दिवस आहेत, असा खोचक टोमणा उद्धव ठाकरे यांनी लगावला.

मुंबईतील शिवडी येथील शिवसेना शाखेचं उद्घघाटन करण्यासाठी उद्धव ठाकरे उपस्थित होते. यावेळी शिवसेनेच्या दिग्गज नेत्यांची उपस्थिती होती. यावेळी शिवसेनेकडून जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आले. अरविंद सावंत, सुभाष देसाई, सचिन अहिर, किशोरी पेडणेकर यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांनी उपस्थिती दर्शवली आहे. यावेळी उद्धव ठाकरे यांचा शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.   

शिवसेना शिवडी विधानसभा येथे शिवसेना खासदारअरविंद सावंत ह्यांच्या शिवसेना शाखा क्रमांक २०५ ह्याच नुतीकरण झाले आहे. त्याचे लोकार्पण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले. शाखेमध्ये उद्धव ठाकरे यांचा शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.  पुढील काही दिवसांमध्ये मुंबईमध्ये निवडणुका होणार आहेत. त्याआधी पक्षातील बंडखोरीमुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा पक्षाची बांधणी करण्यात येत आहे. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे शिवसेनेची बांधणी करण्यासाठी मुंबईसह महाराष्ट्र पिंजणार आहेत. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Priyanka Gandhi In Kohapur : महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
येवल्यात येऊन जरांगे पाटील म्हणाले इथं पाडा, छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया; लगावला खोचक टोला
येवल्यात येऊन जरांगे पाटील म्हणाले इथं पाडा, छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया; लगावला खोचक टोला
VBA ने पाठिंबा दिलेला अपक्ष उमेदवार भाजपसोबत गेला, वंचितच्या कार्यकर्त्यांनी काळं फासलं, चाबकाने फटके दिले
VBA ने पाठिंबा दिलेला अपक्ष उमेदवार भाजपसोबत गेला, वंचितच्या कार्यकर्त्यांनी काळं फासलं, चाबकाने फटके दिले
Priyanka Gandhi In Kolhapur : बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेतात आणि त्यांच्याच मुलाच्या पाठीत खंजीर खुपसला; प्रियांका गांधींचा पीएम मोदींवर घणाघाती प्रहार
बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेतात आणि त्यांच्याच मुलाच्या पाठीत खंजीर खुपसला; प्रियांका गांधींचा पीएम मोदींवर घणाघाती प्रहार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Priyanka Gandhi SpeechKolhapur|बाळासाहेबांच्या मुलाच्या पाठीत खंजीर खुपसला,कोल्हापुरातील आक्रमक भाषणDilip Walse Patil On Sharad Pawar : शरद पवारांचा मानसपुत्र असं मी नाही तर लोक म्हणातात-वळसेPriyanka Gandhi : बाळासाहेब ठाकरेंचा भर सभेत उल्लेख, प्रियंका गांधी यांचं मोदी, शाहांना आव्हानPriyanka Gandhi Shirdi Speech : प्रियांका गांधींची शिर्डीत भव्य सभा; मोदींवर निशाणा #abpमाझा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Priyanka Gandhi In Kohapur : महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
येवल्यात येऊन जरांगे पाटील म्हणाले इथं पाडा, छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया; लगावला खोचक टोला
येवल्यात येऊन जरांगे पाटील म्हणाले इथं पाडा, छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया; लगावला खोचक टोला
VBA ने पाठिंबा दिलेला अपक्ष उमेदवार भाजपसोबत गेला, वंचितच्या कार्यकर्त्यांनी काळं फासलं, चाबकाने फटके दिले
VBA ने पाठिंबा दिलेला अपक्ष उमेदवार भाजपसोबत गेला, वंचितच्या कार्यकर्त्यांनी काळं फासलं, चाबकाने फटके दिले
Priyanka Gandhi In Kolhapur : बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेतात आणि त्यांच्याच मुलाच्या पाठीत खंजीर खुपसला; प्रियांका गांधींचा पीएम मोदींवर घणाघाती प्रहार
बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेतात आणि त्यांच्याच मुलाच्या पाठीत खंजीर खुपसला; प्रियांका गांधींचा पीएम मोदींवर घणाघाती प्रहार
सिंगापूर, मलेशियासारखं पर्यटन सिंधुदुर्गात करायचंय; नारायण राणेंकडून विकासाचा मुद्दा, पण ठाकरेंवर टीका
सिंगापूर, मलेशियासारखं पर्यटन सिंधुदुर्गात करायचंय; नारायण राणेंकडून विकासाचा मुद्दा, पण ठाकरेंवर टीका
टपरीवर चहा, हॉटेलात पुरीभाजी, सलूनमध्ये कटींग; युगेंद्र पवारांचं बारामतीत 'मिशन विधानसभा'
टपरीवर चहा, हॉटेलात पुरीभाजी, सलूनमध्ये कटींग; युगेंद्र पवारांचं बारामतीत 'मिशन विधानसभा'
Satej Patil : शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या पापाचे धनी शिंदे फडणवीस अजित पवार; सतेज पाटलांचा जोरदार हल्लाबोल
शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या पापाचे धनी शिंदे फडणवीस अजित पवार; सतेज पाटलांचा जोरदार हल्लाबोल
Bajrang Punia In Kolhapur : भाजपकडून एमएसपीचा जुमला, धोरण फसल्याने शेतकऱ्यांच्या आत्महत्या, जिथं भाजप सरकार तिथं नोकऱ्या नाहीत; बजरंग पुनियांचा हल्लाबोल
भाजपकडून एमएसपीचा जुमला, धोरण फसल्याने शेतकऱ्यांच्या आत्महत्या, जिथं भाजप सरकार तिथं नोकऱ्या नाहीत; बजरंग पुनियांचा हल्लाबोल
×
Embed widget