राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा लातुरचा पहिलाच दौरा, प्रशासन सज्ज, आज तयारीच्या अनुषंगाने प्रशासनाची बैठक पडली पार
भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 3 दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावर येणार असून या कालावधीत कोल्हापूरच्या अंबाबाईचे दर्शन घेत त्यानंतर पुणे व मराठवाड्यातील दोन जिल्ह्यांमध्येही येणार आहेत
President Draupadi Murmu In Latur: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मराठवाड्यातील उद्गीरमध्ये बौद्ध विहाराच्या उद्धाटन समारंभास उपस्थित राहणार असून आज लातूर जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशासनाची यासंदर्भात बैठक पार पडली. राष्ट्रपतींच्या जिल्हा दौऱ्याच्या तयारीसाठी प्रशासनाची तयारी सुरु आहे.राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू येत्या २८ ते ३० तारखेपर्यंत तीन दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. यावेळी कोल्हापूर, पुणे-मुंबईसह मराठवाड्यात लातूर आणि नांदेड शहरातील कार्यक्रमांमध्ये त्या उपस्थिती लावणार आहेत.
राष्ट्रपती पहिल्यांदाच येणार लातुरात, प्रशासन सज्ज
देशाचे राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू 30 जुलैला लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असणार आहेत. लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे उभारण्यात आलेल्या बुद्ध विहाराचे उद्घाटन त्यांच्या हस्ते पार पडणार आहे. यानंतर या ठिकाणी एका सभेचे ही आयोजन करण्यात आला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ह्या पहिल्यांदाच लातूर जिल्ह्यात येत आहेत.
प्रशासनाची बैठक पार पडली, तयारीला सुरुवात
राष्ट्रपतींच्या कार्यक्रमासाठी राज्याचे राज्यपाल, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी हजर राहणार आहेत. त्या अनुषंगाने प्रशासनाने कार्यक्रमासाठीची तयारी सुरू केली आहे. याबाबतची बैठक आज लातूर जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. यावेळी उदगीरचे आमदार आणि कॅबिनेट मंत्री संजय बनसोडे भाजपाचे आमदार संभाजी पाटील निलंगेकर आणि लातूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांच्या उपस्थितीत प्रशासनाची बैठक पार पडली.
भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ( Presedent Draupadi Murmu) तीन दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावर (Maharashtra Visit) येणार असून या कालावधीत कोल्हापूरच्या अंबाबाईचे दर्शन घेत त्यानंतर पुणे व मराठवाड्यातील दोन जिल्ह्यांमध्येही येणार असल्याची माहिती समोर आली आहे. २८ ते ३० जुलै दरम्यान महाराष्ट्रातील विविध ठिकाणी राष्ट्रपती भेट देणार असून या कार्यक्रमांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजीत पवारांचीही उपस्थिती राहणार आहे.
कोल्हापूरच्या महालक्ष्मीचं घेणार दर्शन
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू तीन दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावर येणार असून २८ ते ३० जुलैदरम्यान राज्यातील विविध ठिकाणांना त्या भेटी देणार असल्याचं समजतंय. २८ जुलैला कोल्हापूरातील महालक्ष्मीच्या मंदिरात त्या दर्शनासाठी जाणार असून त्यानंतर लिज्जत पापड कंपनीच्या गोल्डन जुबिली वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमाला वारणानगर येथे उपस्थित राहणार आहेत. विशाळगड प्रकरणानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची कोल्हापूरातील उपस्थिती महत्वपूर्ण मानण्यात येत आहे.
या कार्यक्रमाचे नियोजन यावेळी करण्यात आलं. मराठवाडा आणि उदगीरकरांसाठी निश्चितच ही बाब भूषणवाह असल्याचे सांगत. त्यासाठी संपूर्ण तयारी सुरू असल्याची माहिती संजय बनसोडे यांनी दिली.
हेही वाचा: