Pratap Sarnaik : मराठीला अभिजात दर्जा मिळवून दिला, सुनांना सांगितलंय घरात मराठीच बोलायचं; हिंदी मुंबईची बोलीभाषा म्हणणाऱ्या प्रताप सरनाईकांचा घुमजाव
Marathi Vs Hindi : मी मराठीचा सर्वाधिक सन्मान केला, घरात नातवांशी मराठीतच बोलायचं अशा सूचना सुनांना केल्याचं राज्याचे मंत्री प्रताप सरनाईकांनी सांगितलं.

मुंबई : मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून मी किती प्रयत्न केलेत हे सगळ्यांनाच माहिती आहे. मराठीचा मी सर्वाधिक सन्मान केला असल्याचं स्पष्टीकरण शिवसेनेचे मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलं. हिंदी ही मुंबईची बोलीभाषा झाली आहे, ती आमची लाडकी बहीण आहे असं प्रताप सरनाईक म्हणाले होते. त्यावरुन वाद निर्माण झाल्यानतंर सरनाईकांनी हे स्पष्टीकरण दिलं. तसेच पत्रकारांना नको त्या बातम्या पेरल्या असं म्हणत आपल्या वादग्रस्त वक्तव्याचं खापर त्यांनी माध्यमांवरच फोडल्याचं दिसून आलं.
Pratap Sarnaik On Marathi Language : मी मराठीचा सर्वाधिक सन्मान केला
प्रताप सरनाईक म्हणाले की, "मिरा भाईंदरमध्ये हिंदी पत्रकार दिनाचा कार्यक्रम होता, हिंदी बद्दल कार्यक्रम होता. त्यामध्ये हिंदी पत्रकारांचा सन्मान केला जात होता. त्यामुळे त्यात कृपाशंकर सिंह काय म्हणाले त्यावर मी पुढे बोललो. माझ्या मतदारसंघात ठाण्यात मी मराठी बोलतो. पण मीरा भाईंदर मध्ये 82 टक्के हिंदी भाषिक आहेत. त्यामुळे तिथे हिंदी बोलावे लागते. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून मी किती प्रयत्न केले आहेत सर्वांना माहीत आहे. माझ्या मतदारसंघात विंदा करंदीकर, पु. ल. देशपांडे यांच्यापासून नामदेव ढसाळ यांच्यापर्यंत मी रस्त्यांना नावे दिली आहेत. मराठीचा सन्मान मी सर्वाधिक केला आहे."
माझ्या नातवांशी मराठीतच बोलायचं, हिंदी-इंग्रजीमध्ये नको अशा सूचना आपण घरातील सूनांना केल्या असल्याचं यावेळी प्रताप सरनाईकांनी सांगितलं.
हे सर्व सांगत असताना प्रताप सरनाईकांनी मात्र पत्रकार आणि माध्यमांवरच खापर फोडल्याचं दिसून आलं. पत्रकारांनी नको त्या बातम्या पेरू नये, शनिवारी काही बातमी नाही म्हणून प्रताप सरनाईक ची बातमी चालवली असेल, पण ते चुकीचे आहे असं गजब वक्तव्य त्यांनी केलं.
Pratap Sarnaik On Hindi Mumbai : काय म्हणाले होते प्रताप सरनाईक?
संघाचे भैय्याजी जोशींनी काही दिवसांपूर्वी मुंबईत मराठी शिकणे गरजेचे नसल्याचं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांचंही हिंदी प्रेम ओसंडून वाहू लागलं. मिरा रोड भागातील एका कार्यक्रमात बोलताना, हिंदी ही मुंबईची बोलीभाषा झाली आहे असं वक्तव्य प्रताप सरनाईक यांनी काल केलं. केवळ एवढ्यावरच सरनाईक थांबले नाहीत, तर त्यांनी हिंदीला लाडक्या बहिणीचाही दर्जा देऊन टाकला.
आधीच राज्यात पहिलीपासून हिंदीच्या निर्णयाचा वाद आता कुठे थांबतोय तोवर प्रताप सरनाईकांच्या वक्तव्याने तो पुन्हा सुरू झाल्याचं दिसून आलं. प्रताप सरनाईकांनी हिंदीवर केलेल्या वक्तव्याचा समाचार विरोधा पक्षांनी घेतला. तर सत्ताधाऱ्यांना त्यावर सारवासारव करण्याची वेळ आल्याचं दिसून आलं.
ही बातमी वाचा:


















