आधी अमित ठाकरेंना हनुमान चालिसा म्हणायला लावा ; सुजात आंबेडकरांचे आव्हान
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे ( Raj Thackeray ) यांचे पुत्र अमित ठाकरे यांना आधी हनुमान चालिसा म्हणायला लावा, दंगली झाल्या तर कोणाला पकडायचं हे पोलिसांना माहित आहे, असा टोला सुजात आंबेडकर यांनी लगावला आहे.
Sujat Ambedkar : "महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे ( Raj Thackeray ) यांनी काल घोषणा केली की, ज्या मशिदींवर भोंगे लागतील, त्यासमोर स्पीकरवर हनुमान चालिसा लावू. परंतु, हे स्पीकर लावण्यासाठी एकही बहुजन जाता कामा नये. घोषणा तूम्ही करणार आणि बहुजन कार्यकर्ता त्यात भरडला जाणार. माझी राज ठाकरे यांना विनंती आहे, ते स्पीकर लावण्यासाठी अमित ठाकरे यांना पाठवा आणि आधी अमित ठाकरे यांना हनुमान चालिसा म्हणायला लावा. राज ठाकरे यांच्या वक्तव्यामुळे दंगल झाली तर पोलिसांना माहित आहे की पकडायचं कुणाला आहे, असा टोला वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांचे पुत्र सुजात आंबेडकर (Sujat Ambedkar ) यांनी लगावला आहे.
राज ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्यावर सुजात आंबेडकर यांनी कडाडून टीका केली आहे. सुजात आंबेडकर यांनी यावेळी मनसे आणि राष्ट्रवादीसह महाविकास आघाडी सरकारवरही टीका केली. ते म्हणाले, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आरेमध्ये कारशेड होऊ देणार नाही, असे म्हटले आहे. परंतु, त्याठिकणी कार शेड बांधण्याचे नियोजन शिवसेनेचेच होते. याशिवाय कारशेड येथे आंदोलन करणाऱ्या मुलांवरील गुन्हे मागे घेऊ असेही आदित्य ठाकरे यांनी म्हटले होते. परंतु, अद्याप तसे झाले नाही. या मुलांवर गुन्हे दाखल असल्यामुळे परदेशात शिक्षणासाठी जाणाऱ्यांना पासपोर्ट मिळत नाही."
वंचित बहुजन आघाडी ही भाजपचे बी टीम असल्याच्या आरोपावरही सुजात आंबेडकर यांनी राष्ट्रवादीला खोचक टोला लगावला. "ज्यांनी आमच्यावर बी टीमचा आरोप केला, ते सरकार स्थापन करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर गेले होते, असा टोला सुजात आंबेडकर यांनी लगावला.
सुजात आंबेडकर म्हणाले, "बऱ्याच दिवसानंतर आज मी बोलत आहे. आपली ताकद काल होती तशीच आजही आहे. आपली ताकद कमी होणार नाही. मागच्या निवडणुकांपासून परिस्थिती बदलली आहे. आपलं स्वप्न पूर्ण करायचं असेल आणि वंचितांची सत्ता आणायची असेल तर घरोघरी जाणं गरजेचं आहे. लाटेवर जायचं नाही, कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा लाटेवर पंतप्रधान झाले आहेत. मागच्या दोन निवडणुका लढताना लक्षात आलं आहे की आपण स्वबळावर निवडणूक लढू शकत नाही. त्यामुळे आता आपण आपला समाज सोडून इतर समाजच्या लोकांना आपल्या पक्षाशी जोडायचं आहे."
महत्वाच्या बातम्या
- Raj Thackeray On Mosque: 'ज्या मशिदींवर भोंगे लागतील, त्याच्या समोर हनुमान चालिसा लावू', राज ठाकरे यांचा इशारा
- Raj Thackeray: जातीपातीच्या राजकारणाला शरद पवार जबाबदार - राज ठाकरे
Raj Thackeray : अजित पवार पळून कुणासोबत गेले? लग्न कुणासोबत केले? - राज ठाकरेंचं टीकास्त्र - Nagpur News : पोलीस दलातील बदल्यांचा 'नागपुरी पॅटर्न'! पोलीस आयुक्तांची अभिनव योजना आहे तरी काय?