(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Raj Thackeray : अजित पवार पळून कुणासोबत गेले? लग्न कुणासोबत केले? - राज ठाकरेंचं टीकास्त्र
Raj Thackeray : निवडणूकीच्या निकालानंतर पहाटे जोडा वेगळाच पाहायला मिळाला. पळून कुणाबरोबर गेले अन् लग्न कुणाबरोबर केले, काही कळेनाच, असे म्हणत राज ठाकरे यांनी अजित पावर यांच्यावर टीकास्त्र सोडले.
Raj Thackeray on Ajit Pawar : विधानसभा निवडणूकीच्या निकालानंतर पहाटे जोडा वेगळाच पाहायला मिळाला. पळून कुणाबरोबर गेले अन् लग्न कुणाबरोबर केले, काही कळेनाच, असे म्हणत राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीकास्त्र सोडले. मनसेचा गुढीपाढवा मेळावा शनिवारी मुंबईच्या शिवाजी पार्क येथे पार पडला. तब्बल दोन वर्षानंतर हा मेळावा होत आहे. त्यामुळे या मेळाव्यासाठी मनसेनं जोरदार तयारी केली आहे.
पहाटेचा शपथविधी झाल्यानंतर तेवढ्यात आवाज आला हे लग्न नाही होणार... अन् फिस्कटलं. दोघेही हिरमसून घरी...हे सगळं सुरु असताना वेगळेच सुरु होते. कुणीतरी मला कडेवर घ्या ना... असे म्हणतेय. तीन नंबरचा पक्ष एक नंबरला आणि दोन नंबरला फिरवतोय... महाराष्ट्राच्या काय देशाच्या राजकारणामध्ये असा प्रकार पाहिला नाही. महाराष्ट्राच्या जनतेला काय सांगता? एकमेंकाना शिव्या घालता अन् पुन्हा मांडीला मांडी लावून बसता? असे म्हणत अजित पवार यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडलं.
219 मध्ये झालेली विधानसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेना आणि विरोधात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस होते. पण निकाल लागल्यानंतर मुख्यमंत्रीपद वाटून घेण्याचा उद्धव ठाकरेंना साक्षात्कार झाला. पण हे आमच्याशी कधी बोलला नाहीत. महाराष्ट्रभर सभा झाल्या त्यामध्येही तुम्ही बोलला नाहीत. नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या सभेतही तुम्ही काही बोलला नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभेत भाजपचा मुख्यमंत्री होईल, असे सांगितलं, तेव्हाही तुम्ही काहीही बोलला नाहीत. जसा निकाल लागला की, लक्षात आले की आपल्यामुळे यांचं सरकार अडतेय. त्यावेळी अडीच वर्षाचा विषय काढला. कोणती अडीच वर्ष? कोणाशी बोलला होतात? अमित शाह यांच्याशी एकांतात बोललो होतो म्हणे... बाहेर का नाहीत बोललात? मुख्यमंत्रीपद महाराष्ट्रातील जनतेचं आहे... लोकांसमोर येणार आहे... मग तुम्ही एकांतात का बोललात? असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला.
मराठी लाईव्ह न्यूज सुपरफास्ट पाहा ABP Majha वर, मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, मनोरंजन, क्रिकेट, देश-विदेशातील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर Live