Prakash Ambedkar : तुमच्या डोक्यात केमिकल लोचा झालाय, माईंडगेम खेळू नका, मविआचं पत्र पोहोचताच प्रकाश आंबेडकरांचा नाना पटोलेंवर हल्ला
Prakash Ambedkar Reply To Nana Patole : महाराष्ट्रात कुणाशी युती करायची याचा निर्णय घेण्याचा अधिकार काँग्रेसने नाना पटोले यांना दिला आहे का? असा प्रश्न वंचितचे प्रमुख डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी विचारला आहे.
मुंबई : लोकसभेच्या जागावाटपावरून मविआने (MVA) दिलेल्या आमंत्रणावरून वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी नाराजी व्यक्त केली आहे. नाना पटोले (Nana Patole) यांना इंडिया आघाडी किंवा महाविकास आघाडीसंबंधी निर्णय प्रक्रियेमध्ये कोणतेही अधिकार नसताना त्यांच्या सहीने वंचितला बैठकीसाठी कसे काय आमंत्रण दिलं गेलं असा प्रश्न प्रकाश आंबेडकरांनी विचारला आहे. नाना पटोले यांना महाराष्ट्रात कुणाशी आघाडी करायचे याचा निर्णय घेण्याचा अधिकार आहेत का असा प्रश्नही त्यांनी विचारला. नाना पटोले हे महाराष्ट्राच्या जनतेसोबत माईंड गेम खेळतात किंवा त्यांच्या डोक्यामध्ये काहीतरी लोचा झाल्याची टीका त्यांनी केली.
राज्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांची लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागावाटपाची चर्चा 25 जानेवारी रोजी होणार होती. त्या बैठकीसाठी वंचित बहुजन आघाडीलाही निमंत्रण देण्यात आलं आहे. तशा आशयाचं महाविकास आघाडीकडून एक पत्रक जारी करण्यात आलं असून त्यावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्या नावाच्या सह्या आहेत. त्यावर प्रकाश आंबेडकरांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.
प्रकाश आंबेडकर काय म्हणाले?
काँग्रेस हायकमांडकडून तुम्हाला आघाडी करण्याचे किंवा युती करण्याचे महाराष्ट्रात अधिकार दिले आहेत का? असा प्रश्न प्रकाश आंबेडकरांनी नाना पटोले यांना विचारला. एकीकडे काँग्रेस महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला यांनी 23 जानेवारीला झालेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केले होत की निवडणुकांची घोषणा झाल्यावर वंचितला आघाडीत समाविष्ट होण्यासाठी चर्चा करू. तर दुसरीकडं महाराष्ट्रातील लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न नाना पटोले करत आहेत. मविआ आणि इंडिया आघाडीमध्ये वंचितला समाविष्ठ करण्याचा निर्णय घेण्याचे सर्वोत्तपरी अधिकार तुम्हाला नाहीत.
वंचित आघाडीचे मुख्य प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी आधीच सांगितले होते की महाविकास आघाडीत सहभागी होण्यासाठी उद्धव ठाकरे, शरद पवार, मल्लिकार्जुन खर्गे यांच्याकडून निमंत्रण येत नाही तोपर्यंत आम्ही सहभागी होणार नाही.
जर तुम्हाला वाटत असेल आम्ही सहभागी व्हावं तर शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या अध्यक्षांकडून आम्हाला आमंत्रण मिळाले पाहिजे किंवा रमेश चेन्निथला, राहुल गांधी, सोनिया गांधी आणि मल्लिकार्जुन खर्गे यांच्यापैकी कोणीही निमंत्रण दिल्यास आम्ही बैठकीला उपस्थित राहू.
My reply — pic.twitter.com/c0gBi6I96C
— Prakash Ambedkar (@Prksh_Ambedkar) January 25, 2024
ही बातमी वाचा :