Rapper Badshah : अल्लू अर्जुननंतर आता रॅपर बादशाह सुद्धा पोलिस कारवाईत अडकला! नेमकं प्रकरण काय?
लोकप्रिय गायक करण औजलाच्या कॉन्सर्टमध्ये सहभागी होण्यासाठी बादशाह नुकताच गुरुग्रामला पोहोचला होता. बादशाह स्वतः काळ्या थारमध्ये बसला होता आणि त्याच्या ताफ्यात इतर गाड्या होत्या.
Rapper Badshah : पुष्पा 2 चा सुपरस्टार अल्लू अर्जुन संध्या थिएटरमधील चेंगराचेंगरी प्रकरणी एक दिवस जेलची हवा खाऊन आल्यानंतर जामीनावर सूटका झाली. हे प्रकरण ताजे असतानाच आता रॅपर बादशाहला सुद्धा पोलिस कारवाईला सामोरे जावं लागलं आहे. गुरुग्राम पोलिसांनी प्रसिद्ध गायक आणि रॅपर बादशाहच्या ताफ्यातील वाहनांना चालान जारी केले आहे. नुकताच बादशाह एका कार्यक्रमासाठी गुरुग्रामला पोहोचला होता. त्यांच्या ताफ्यातील ज्या वाहनांला चलन जारी करण्यात आले आहे, त्या थारमध्ये स्वत: आला होता. मिळालेल्या माहितीनुसार, हे वाहन रस्त्याच्या चुकीच्या बाजूने चालले होते. हे बादशाहच्या नावावर नाही, पण रॅपर त्यात बसून कार्यक्रमाला पोहोचला होता.
Srijan ne "Pehle Bhi Main" apna banake gaaya, aur uski vibe next level thi! 🎤🔥
— sonytv (@SonyTV) December 17, 2024
Dekhiye #IndianIdol Sat-Sun 9 baje, sirf #SonyEntertainmentTelevision pe. @shreyaghoshal @Its_Badshah @VishalDadlani @fremantle_india#SonyTV #IndianIdol15 #IdolSrijan pic.twitter.com/XoIf3VpmYz
बादशाह ताफ्यासाठी चालान जारी केले
लोकप्रिय गायक करण औजलाच्या कॉन्सर्टमध्ये सहभागी होण्यासाठी बादशाह नुकताच गुरुग्रामला पोहोचला होता. बादशाह स्वतः काळ्या थारमध्ये बसला होता आणि त्याच्या ताफ्यात इतर गाड्या होत्या. गुरुग्राम ट्रॅफिक पोलिसांनी बादशाह बसलेल्या कारवर 15,500 रुपयांचे चालान जारी केले आहे. ताफ्यातील इतर वाहनांचीही ओळख पटवली जात असल्याचे सांगण्यात आले.
View this post on Instagram
या प्रकरणी डीसीपी ट्रॅफिक वीरेंद्र विज यांनी सांगितले की, 'अर्थातच आम्ही बादशाहच्या कारला चुकीच्या बाजूने चालवल्याबद्दल चलन बजावले आहे, कार बादशाहच्या नावावर नसली तरी बादशाह स्वतः कारमध्ये उपस्थित होता.' बादशाह ज्या थारमधून प्रवास करत होता त्या थारची चालान स्लिपही समोर आली असून चुकीच्या बाजूने वाहन चालवण्याबरोबरच त्यात वायू प्रदूषण नियमांचे उल्लंघन आणि धोकादायक वाहन चालवण्याचाही समावेश आहे.
Srijan ne "Pehle Bhi Main" apna banake gaaya, aur uski vibe next level thi! 🎤🔥
— sonytv (@SonyTV) December 17, 2024
Dekhiye #IndianIdol Sat-Sun 9 baje, sirf #SonyEntertainmentTelevision pe. @shreyaghoshal @Its_Badshah @VishalDadlani @fremantle_india#SonyTV #IndianIdol15 #IdolSrijan pic.twitter.com/XoIf3VpmYz
इतर महत्वाच्या बातम्या