(Source: ECI/ABP News/ABP Majha)
संजय राऊत म्हणतात आमच्यात कुठलेही भांडण नाही, तर भाजपसोडून इतर कोणत्याही पक्षासोबत जाण्याची प्रकाश आंबेडकरांची तयारी!
Prakash Ambedkar : आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने भाजपसोडून इतर कोणत्याही पक्षासोबत आम्ही आघाडी करायला आमची दारे अजून बंद केलेली नसल्याचे मोठे विधान वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे.
Maharashtra Politics नागपूर : लोकसभा निवडणुकीनंतर आता साऱ्यांना विधानसभा निवडणुकांचे (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) वेध लागले आहे. त्या अनुषंगाने प्रत्येक पक्ष आता जोमाने कामाला लागला असून स्थानिक स्थरापासून ते अगदी उच्चपदस्थ नेत्यांपर्यंत सारेच आपल्या पक्षाची मोर्चे बांधणी करण्यात व्यस्त असल्याचे चित्र आहे. तर अनेक ठिकाणी जागा वाटपाच्या मुद्यावरून दावे-प्रतिदावे केले जात आहे. दरम्यान, वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा आणि राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी युतीसंबंधित मोठे वक्तव्य केलं आहे.
आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने भाजपसोडून इतर कोणत्याही पक्षासोबत आम्ही आघाडी करायला आमची दारे अजून बंद केलेली नसल्याचे प्रकाश आंबेडकर म्हणाले आहे. तर त्यांच्या या वक्तव्यावर भाष्य करत शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी देखील सुरात सुर मिळवत आमच्यात कुठलेही भांडण नसल्याचे सांगत महाविकास आघाडी सोबत येण्याचे अप्रत्यक्षरित्या आवाहन केलं आहे.
आदिवासी समाजाबाबत प्रकाश आंबेडकरांचा मेगा प्लॅन
दरम्यान, महाराष्ट्रातील आदिवासी समाजाला सोबत घेऊन प्रकाश आंबेडकर यांनी मेगा प्लॅन तयार केला आहे. आरक्षण आणि नॉनक्रिमेलियर या विषयाला घेऊन वेगवेगळ्या आदिवासी संघटना सोबत घेत निवडणुकीत उतरण्यात असल्याची माहिती प्रकाश आंबेडकर यांची दिली आहे. अनुसूचित जमातीच्या राखीव मतदारसंघा व्यतिरिक्त इतर मतदारसंघात आदिवासी उमेदवार मैदानात उतरवणार असल्याचेही प्रकाश आंबेडकर म्हणाले. आज पासून आदिवासी समाजाच्या वेगवेगळ्या संघटनांनसोबत बैठकांच्या सत्राला सुरवात झाली असून येत्या 6 आक्टोबरला वंचित बहुजन आघाडीचा आदिवासी अजेंडा जाहीर केला जाणार असल्याचेही ते म्हणाले.
प्रकाश आंबेडकर आमचे प्रिय मित्र, आमच्यात कुठलेही भांडण नाही: संजय राऊत
प्रकाश आंबेडकर आणि आमच्या मध्ये काहीही भांडण नाही. किंबहुना लोकसभेचे निकाल बाळासाहेब आंबेडकर यांनी पाहिले असतील तर आम्ही आमची वज्र मूठ मजबूत होती म्हणून आम्ही या महाराष्ट्रात नरेंद्र मोदी यांचा पराभव करू शकलो. जर बाळासाहेब आंबेडकर आमच्याबरोबर असते तर नक्कीच ही लढाई अधिक रंगतदार झाली असती आणि या महाराष्ट्रातून भारतीय जनता पक्ष शंभर टक्के नेस्तनाबूत झाला असता. आम्ही त्यांना वारंवार विनंती करत होतो की, आपण हट्ट बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र आला पाहिजे.
प्रकाश आंबेडकर हे आमचे कायम प्रिय मित्र राहतील, आमचे सहकारी राहतील, संविधान वाचवण्याच्या कामांमध्ये संविधानावरचा धोका अद्यापही टळला नाही. हे आम्ही बाळासाहेब आंबेडकर यांना सांगायची गरज नाही, त्यांना ही माहिती आहे. कधीही संविधानाला डंख मारला जाईल, अशा प्रकारचं वातावरण आहे आणि म्हणून माननीय बाळासाहेब आंबेडकर अत्यंत सावधपणे भूमिका घेणे गरजेचे आहे. भारतीय जनता पक्षाला अप्रत्यक्षपणे मदत होईल अशी पावला टाकणं म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला नख लावण्यासारखा आहे, असे मोठे वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI