एक्स्प्लोर

रत्नागिरीत पोस्ट मास्तर महिलेची कार्यालयात आत्महत्या; आत्महत्येचं कारण अस्पष्ट

रत्नागिरीत पोस्ट मास्तर महिलने आत्महत्या केली आहे. पूर्वी तुरे असं या 30 वर्षीय महिला पोस्ट मास्तरचं नाव आहे.

रत्नागिरी : अमरावती येथील व्याघ्र प्रकल्पातील रेंज ऑफिसर दिपाली चव्हाण यांनी काही दिवसांपूर्वी आत्महत्या केली. ही घटना ताजी असतानाच 30 वर्षीय महिला पोस्टमास्तरने कार्यालयातच आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. पूर्वी तुरे असं या 30 वर्षीय महिला पोस्ट मास्तरचं नाव आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील मुरूड येथे ही धक्कादायक घटना घडली आहे. 

शनिवारी अर्थात 27 मार्च रोजी रात्री उशिरानं ही घटना समोर आली. त्यानंतर सर्वांनाच धक्का बसला. दरम्यान, पूर्वी यांनी आत्महत्या का केली? यामागचं कोणतंही कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. धक्कादायक बाब म्हणजे पूर्वी तुरे यांनी आपल्या कार्यालयातच गळफास घेत आपलं जीवन संपवलं. पूर्वी तुरे या मुळच्या दापोली तालुक्यातील हर्णे येथील मोठी गोडीबाव येथील रहिवासी. त्या विवाहित होत्या. त्यांच्या आत्महत्येमागे नेमकं काय कारण असावं? याचा सध्या पोलिस तपास सुरू आहे. 

मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील डॅशिंग महिला अधिकाऱ्याची स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या

काय घडलं त्या रात्री?

शनिवारी दुपारी दोन वाजता पूर्वी आपल्या पतीला पोस्टाच्या कामानिमित्त जाते असं सांगून बाहेर पडल्या. पण, सायंकाळी उशिरापर्यंत त्या घरी आल्याच नाहीत. त्यानंतर सर्वत्र चौकशी आणि शोधाशोध सुरू झाली. यावेळी मुरूड येथील पोस्ट ऑफिसचा दरवाजा आतून बंद असल्याचं निदर्शनास आले. त्यानंतर त्या ठिकाणच्या ग्रामस्थांना बोलावले गेले. खिडकीतून डोकावून पाहिले असता पूर्वी यांनी दोरीनं गळफास घेतल्याचं समोर दिसलं. 

घडलेल्या घटनेची ग्रामस्थांनी पोलिसांना माहिती दिली. या साऱ्या प्रकरणात आता पोलिसांनी तपासाला सुरूवात केली आहे. पूर्वी या मुरूड येथे येण्यापूर्वी कर्दे येथे होत्या. दरम्यान, पूर्वी यांनी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल का उचललं? याचा सध्या पोलीस तपास सुरू आहे. पूर्वी यांनी आत्महत्या करण्यापूर्वी कोणतीही चिठ्ठी देखील लिहून ठेवलेली नाही. त्यामुळे पोलिसांना देखील आत्महत्येच्या कारणाचा शोध घेणं कठीण बनलं आहे.

दीपाली चव्हाण आणि डीएफओ शिवकुमार यांच्या संभाषणाची ऑडिओ क्लिप व्हायरल

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 नोव्हेंबर 2026 | रविवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 नोव्हेंबर 2026 | रविवार
निसर्गाचा दणका, बळीराजाला मोठा फटका, अकवान चक्रवादळामुळं भात उत्पादक संकटात, हातातोंडाशी आलेला घास वाया जाण्याच्या मार्गावर
निसर्गाचा दणका, बळीराजाला मोठा फटका, अकवान चक्रवादळामुळं भात उत्पादक संकटात, हातातोंडाशी आलेला घास वाया जाण्याच्या मार्गावर
आधीच दुष्काळ, त्यात शेतातील विद्युत तारांच्या स्पर्शाने भीषण आग, शेतकऱ्याचा पाच एकरावरील ऊस जळून खाक
आधीच दुष्काळ, त्यात शेतातील विद्युत तारांच्या स्पर्शाने भीषण आग, शेतकऱ्याचा पाच एकरावरील ऊस जळून खाक
आत्तापर्यंत झोपा काढत होतात का? विमान दुर्घटनेच्या तपासावरुन हर्षवर्धन सपकाळांचा सुनील तटकरेंना सवाल
आत्तापर्यंत झोपा काढत होतात का? विमान दुर्घटनेच्या तपासावरुन हर्षवर्धन सपकाळांचा सुनील तटकरेंना सवाल

व्हिडीओ

Solapur Drought Farmer Special Report : सोलापुरातील दुष्काळाची दाहकता, शेतकऱ्यांचा जीवघेणा संघर्ष
Shruti Sadolikar Katkar Majha Katta : शास्त्रीय संगीताचं चालतं बोलतं विद्यापीठ, श्रृती सडोलीकरांशी गप्पा | ABP Majha
Ratnagiri Water Shortage : कोकणातील पाणीटंचाईवर श्रमदानातून मात! Special Report
Kolhapur Milk Price Hike : गोकुळ आणि वारणा दूध संघाकडून दुधाच्या विक्री दरात वाढ Special Report
Kurla Phoenix Mall Mumbai Crime News: पैसे मागितले, काही उर्दुमध्ये बोलत होते; कुर्ला तरुण-तरुणी मारहाण प्रकरणावर प्रत्यक्षदर्शी महिलेची धक्कादायक माहिती, VIDEO

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
निसर्गाचा दणका, बळीराजाला मोठा फटका, अकवान चक्रवादळामुळं भात उत्पादक संकटात, हातातोंडाशी आलेला घास वाया जाण्याच्या मार्गावर
निसर्गाचा दणका, बळीराजाला मोठा फटका, अकवान चक्रवादळामुळं भात उत्पादक संकटात, हातातोंडाशी आलेला घास वाया जाण्याच्या मार्गावर
Ashish Shelar on Shiv Sen Sonia Gandhi Book : शिवसेना प्रवक्त्यांनी सोनिया गांधींचं पुस्तक फाडलं; अशिष शेलार थेट म्हणाले, 'पुस्तक फाडणं मला मान्य नाही; मी कधीच पुस्तक फाडलं नाही...'
शिवसेना प्रवक्त्यांनी सोनिया गांधींचं पुस्तक फाडलं; अशिष शेलार थेट म्हणाले, 'पुस्तक फाडणं मला मान्य नाही; मी कधीच पुस्तक फाडलं नाही...'
भाजपा आमदार रेखा पात्रांची प्रकृती चिंताजनक, विषबाधा झाल्याची प्राथमिक माहिती; आरोग्यमंत्र्यांनी घेतली भेट
भाजपा आमदार रेखा पात्रांची प्रकृती चिंताजनक, विषबाधा झाल्याची प्राथमिक माहिती; आरोग्यमंत्र्यांनी घेतली भेट
आधीच दुष्काळ, त्यात शेतातील विद्युत तारांच्या स्पर्शाने भीषण आग, शेतकऱ्याचा पाच एकरावरील ऊस जळून खाक
आधीच दुष्काळ, त्यात शेतातील विद्युत तारांच्या स्पर्शाने भीषण आग, शेतकऱ्याचा पाच एकरावरील ऊस जळून खाक
आत्तापर्यंत झोपा काढत होतात का? विमान दुर्घटनेच्या तपासावरुन हर्षवर्धन सपकाळांचा सुनील तटकरेंना सवाल
आत्तापर्यंत झोपा काढत होतात का? विमान दुर्घटनेच्या तपासावरुन हर्षवर्धन सपकाळांचा सुनील तटकरेंना सवाल
Hemant Nimbalkar : अपुन के एरिया में लफड़ा नहीं! सुधारायचे असेल तर ठीक, नाहीतर पोलिसांची बंदूक फक्त 'शो'साठी नाही; बेंगळुरुच्या सुरक्षेची जबाबदारी मिळताच हेमंत निंबाळकरांचा गुंडांना इशारा 
अपुन के एरिया में लफड़ा नहीं! सुधारायचे असेल तर ठीक, नाहीतर पोलिसांची बंदूक फक्त 'शो'साठी नाही; बेंगळुरुच्या सुरक्षेची जबाबदारी मिळताच हेमंत निंबाळकरांचा गुंडांना इशारा 
Pune Crime News: कारच्या वादातून तरुणाचं अपहरण; हॉटेलमधून जबरदस्तीने नेलं, रिव्हॉल्वरचा धाक दाखवला, बेदम मारहाण अन्..., पुण्यातील थरारक घटना
कारच्या वादातून तरुणाचं अपहरण; हॉटेलमधून जबरदस्तीने नेलं, रिव्हॉल्वरचा धाक दाखवला, बेदम मारहाण अन्..., पुण्यातील थरारक घटना
गोरक्षकाच्या पोस्टमुळे अस्वस्थ महापौरांकडून विषप्राशनचा प्रयत्न, आमदाराचा खळबळजनक दावा; धुळ्यात भाजपचा मोर्चा
गोरक्षकाच्या पोस्टमुळे अस्वस्थ महापौरांकडून विषप्राशनचा प्रयत्न, आमदाराचा खळबळजनक दावा; धुळ्यात भाजपचा मोर्चा
Embed widget