एक्स्प्लोर

उस्मानाबादच्या नाराज शिवसैनिकांना पोलिसांनी वाशी टोलनाक्यावरुन परत पाठवले

उस्मानाबाद लोकसभा मतदार संघाचे शिवसेनेचे विद्यमान खासदार रवींद्र गायकवाड यांचे तिकीट पक्षाने कापल्यामुळे त्यांचे समर्थक कार्यकर्ते नाराज झाले आहेत. हे कार्यकर्ते आंदोलन करण्यासाठी मुंबईत दाखल झाले होते. परंतु पोलिसांनी त्यांना परत पाठवले आहे.

मुंबई : उस्मानाबाद लोकसभा मतदार संघाचे शिवसेनेचे विद्यमान खासदार रवींद्र गायकवाड यांचे तिकीट पक्षाने कापल्यामुळे त्यांचे समर्थक कार्यकर्ते नाराज झाले आहेत. 5 वर्षात खासदारांनी केलेल्या कामांचा लेखाजोखा मुंबईत 'मातोश्री'वर जाऊन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमोर मांडण्यासाठी उस्मानाबादवरून शेकडो कार्यकर्ते मुंबईत दाखल झाले होते. परंतु या सर्व कार्यकर्त्यांच्या गाड्या पोलिसांनी वाशी टोल नाक्यावर अडवून या कार्यकर्त्यांना माघारी पाठवले आहे. 'परत जा अन्यथा गुन्हे दाखल करु', असा दबावतंत्र पोलिसांनी अवलंबल्याने कार्यकर्त्यांनी अखेर माघारी जाण्याचा निर्णय घेतला. खासदारांनी केलेल्या कामामुळे त्यांनाच पुन्हा उमेदवारी देण्यात यावी, अशी मागणी कार्यकर्ते करत होते. परंतु अशा प्रकारे दबाव टाकण्यात आल्याने गायकवाड यांच्या कार्यकर्त्यांनी प्रशासनाचा निषेध व्यक्त केला. शिवसेनेने नुकत्याच जाहीर केलेल्या उमेदवारांच्या यादीनुसार सर्वच विद्यमान खासदारांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. परंतु उस्मानाबादचे खासदार रवींद्र गायकवाड यांची उमेदवारी मात्र रद्द करण्यात आली. एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला विमानात चपलेने मारहाण केल्याने गायकवाड वादात सापडले होते. या वादामुळेच उस्मानाबादमधून शिवसेनेने गायकवाड यांच्याऐवजी पवनराजे निंबाळकर यांचे चिरंजीव ओमराजे निंबाळकर यांना तिकीट दिले आहे. त्यामुळेच रवींद्र गायकवाडांचे समर्थक असलेले उस्मानाबादमधील शिवसैनिक पक्षावर नाराज आहेत. या नाराजीमुळेच हे शिवसैनिक आंदोलन करण्यासाठी मुंबईत आले होते.

महत्त्वाच्या बातम्या

डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
अखेर 3 तासानंतर सांगलीचा धर्मेंद्र खाली उतरला; माझ्या प्रेयसीला घेऊन या म्हणत मोबाईल टॉवरवर चढला प्रेमवीर
अखेर 3 तासानंतर सांगलीचा धर्मेंद्र खाली उतरला; माझ्या प्रेयसीला घेऊन या म्हणत मोबाईल टॉवरवर चढला प्रेमवीर

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
EPFO : ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
Tukaram Mundhe: हॉटेलमधील वेटरने बिअर आणू का म्हणताच तुकाराम मुंढे संतापले; FDA आयुक्तांनी सांगितला भन्नाट किस्सा
हॉटेलमधील वेटरने बिअर आणू का म्हणताच तुकाराम मुंढे संतापले; FDA आयुक्तांनी सांगितला भन्नाट किस्सा
अखेर 3 तासानंतर सांगलीचा धर्मेंद्र खाली उतरला; माझ्या प्रेयसीला घेऊन या म्हणत मोबाईल टॉवरवर चढला प्रेमवीर
अखेर 3 तासानंतर सांगलीचा धर्मेंद्र खाली उतरला; माझ्या प्रेयसीला घेऊन या म्हणत मोबाईल टॉवरवर चढला प्रेमवीर
Rahul Gandhi Fitness Mantra: राहुल गांधींनी रिलमधून Gen Z ला फिटनेस मंत्रा सांगितला, बाॅलिवूड फिटनेस मॅन ऋतिक रोशनकडून सुद्धा व्हिडिओ लाईक
Video: राहुल गांधींनी रिलमधून Gen Z ला फिटनेस मंत्रा सांगितला, बाॅलिवूड फिटनेस मॅन ऋतिक रोशनकडून सुद्धा व्हिडिओ लाईक
Embed widget