एक्स्प्लोर

अपहरण झालेल्या ऊसतोड मजुराची सुखरुप सुटका, अपहरणाचा थरार सीसीटीव्हीत कैद

जालना जिल्ह्यातील एका ऊसतोड मजुराने ठेकेदाराकडून आगाऊ पैसे घेतले होते. परंतु ऊसतोड ठेकेदाराकडून मारहाण झाल्यामुळे त्याचे पैसे न देताच तो भिवंडीत येऊन राहत होता. त्यामुळे ठेकेदारांनी भिंवडीत येऊन त्याचे अपहरण केले होते.

भिवंडी/जालना : जालना जिल्ह्यातील एका ऊसतोड मजुराने ठेकेदाराकडून आगाऊ पैसे घेतले होते. परंतु ऊसतोड ठेकेदाराकडून मारहाण झाल्यामुळे त्याचे पैसे न देताच तो भिवंडीत येऊन राहत होता. त्यामुळे ठेकेदारांनी भिंवडीत येऊन त्याचे अपहरण केले. या अपहरणाचा सीसीटीव्ही व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली होती. याबाबतची तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी अपहरण झालेल्या मजुराची सुटका केली असून ठेकेदाराला अटक केली आहे. मंगेश बाळू थोरात (20) असे या अपहरण झालेल्या ऊसतोड मजुराचे नाव आहे. जालन्यातील ऊसतोड मजूर मुकादम विनोद रांक्षे ( 28, मानतोडी, जि. जालना ) आणि भीमा राठोड ( 35, झातखेडा, जालना ) या दोन मुकादमांनी मंगेश थोरात याला सहा महिन्यांपूर्वी उसतोडीच्या कामासाठी बयाना (आगाऊ पैसे) म्हणून 15 हजार रुपये दिले होते. परंतु पत्नीच्या प्रसुतीसाठी अधिक पैशांची गरज असल्याने मंगेशने मालकाकडे अधिक पैसे मागितले. परंतु पैसे न देता मंगेशला बेदम मारहाण करण्यात आली. मुकादमांनी मारहाण केल्यामुळे मंगेशने उसतोडीच्या कामावर जाणे बंद केले. परंतु मंगेश कामावर यावे असा तगादा मुकादम विनोद रांक्षे व भीमा राठोड यांनी लावला होता. तरिही मंगेश ऊसतोडीच्या कामासाठी गेला नाही. त्यानंतर मंगेश कामासाठी जालन्यातून थेट भिवंडीत आला. मंगेशने भिवंडीत एका दूध डेअरीत काम करायला सुरुवात केली. परंतु आपले पैसे घेऊन कामावर न आल्याने चिडलेल्या विनोद व भीमा या दोघा मुकादमांनी मंगेशच्या नातेवाईकांकडून भिवंडीत राहत असलेल्या मंगेशचा पत्ता घेतला. 12 जून रोजी दोन्ही मुकादम काही सहकाऱ्यांसह इनोव्हा कार घेऊन भिवंडीत दाखल झाले. मुकादमांनी भिवंडीतल्या रांजणोली नाका येथून मंगेशचे अपहरण केले. त्याला कारमध्ये जबर मारहाणही केली. त्यानंतर त्याला जालना येथे पळवून नेऊन जालन्यातील एका ऊसाच्या शेतात बांधून पुन्हा एकदा बेदम मारले. मारहाणीनंतर त्याला तिथेच बांधून ठेवले. भिवंडीतील रांजनोली नाका येथून अपहरण करतानाचा थरार सीसीटीव्हीत कैद झाला होता. या व्हिडीओमुळे परिसरात खळबळ उडाली होती. मंगेशचे अपहरण झाल्याचे समजताच त्याच्या मेहुण्याने कोनगांव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करताच पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला. पोलिसांनी एका पथकासह जालन्यातील मंठा येथे जाऊन विनोद आणि भीमा या दोघांच्या मुसक्या आवळल्या, तसेच मंगेश थोरातची सुखरूप सुटकादेखील केली. तर विनोद आणि भीमा या दोघा अपहरकर्त्यांना अटक करून भिवंडी न्यायालयात हजर केले असता त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. ऊसतोडीचे आगाऊ पैसे घेऊनही कामावर न आल्यामुळे एका मजुराचे दोन मुकादमांनी अपहरण केले. अपहरणानंतर त्याला जालना येथे पळवून नेल्याची घटना समोर आली आहे. अपहरणाचा थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. या अपहरणप्रकरणी कोनगांव पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

महत्त्वाच्या बातम्या

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार

व्हिडीओ

Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
Embed widget