चंद्रपुरात बाप-लेकीचे प्राण वाचवण्यासाठी पोलिसाची 40 फूट खोल विहिरीत उडी
चंद्रपूर जिल्ह्यात एका पोलीस शिपायाने विहिरीत बुडणाऱ्या बाप-लेकीचे प्राण वाचवले. चिमुर तालुक्यातील शंकरपूर येथे ही घटना घडली.
चंद्रपूर : जिल्ह्यात बाप-लेकीचे प्राण वाचविण्यासाठी एका पोलिसाने 40 फूट खोल विहिरीत उडी घेतली. परमेश्वर नागरगोजे असे या घाडसी पोलीस शिपायाचे नाव आहे. चिमुर तालुक्यातील शंकरपूर येथे शुक्रवारी रात्री घराबाहेर असलेल्या विहिरीपाशी अडीच वर्षांची मुलगी आणि तिचे वडील हे दोघे खेळत होते. अचानक मुलगी विहिरीत पडली आणि तिला वाचविण्यासाठी तिच्या वडिलांनी देखील उडी घेतली. मात्र, वडिलांना पोहता येत नसल्यामुळे दोघे ही बुडू लागले. याच सुमारास पेट्रोलिंगवर असलेल्या परमेश्वर नागरगोजे यांना हे चित्र दिसलं आणि त्यांनी क्षणाचाही विचार न करता रात्रीच्या अंधारात तातडीने विहिरीत उडी घेत दोघांनाही सुखरूप बाहेर काढले.
येथील वार्ड नंबर 5 मध्ये शुक्रवारी रात्री साडेआठच्या सुमारास घराजवळील सार्वजनिक विहिरीजवळ प्रभाकर बारेकर (वय 27) व त्याची अडीच वर्षाची मुलगी शिवन्या बारेकर हे दोघे खेळत होते. अचानक शिवन्याचा पाय घसरून ती विहिरीत पडली. तिला वाचवण्यासाठी प्रभाकर बारेकर यांनीही विहिरीत उडी मारली. मात्र, त्याला पोहता येत नसल्याने दोघेही बुडू लागले.
चंद्रपुरात कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे रास्ता रोको करत उग्र आंदोलन
या दरम्यान, शंकरपूर पोलीस चौकीचे कर्मचारी रात्री गस्त घालत होते. वॉर्ड न 5 च्या सार्वजनिक विहिरी वर गर्दी जमली होती. त्यामुळे त्यांनी तात्काळ चौकशी केली असता दोघे जण विहिरीत पडल्याची माहिती मिळाली. त्यामुळे तेथे उपस्थित पोलीस शिपाई परमेश्वर नागरगोजे यांनी 40 फूट विहिरीत उडी मारून बाप लेकिला सुखरूप बाहेर काढले. नंतर या दोघांना आधी शंकरपूरच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात व नंतर सामाजिक कार्यकर्ते अशोक चौधरी यांच्या मदतीने नागभीड येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सध्या दोघांचीही प्रकृती उत्तम आहे.
पोलीसाच्या धाडसामुळे ते दोघे जीवंत दोघेही पाण्यात बुडत असल्याचं समजताच पोलीस शिपाई परमेश्वर नागरगोजे यांनी क्षणाचाही विचार न करता रात्रीच्या अंधारात तातडीने विहिरीत उडी घेत दोघांनाही सुखरूप बाहेर काढले. पोलीस शिपाई परमेश्वर यांना विहिरीत उडी मारण्यास थोडाजरी उशीर झाला असता तर मोठा अनर्थ घडला असता. मात्र, परमेश्वर यांच्या धाडसामुळे आज दोघांनाही जीवनदान मिळाले असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
Corona Ground Report | कोरोनाचा ग्रामीण भागातील ग्राऊंड रिपोर्ट! पाहा तुमच्या जिल्ह्यातील कोरोना अपडेट