सोलापुरात दरोडेखोरांच्या हल्ल्यात पोलीस अधिकारी गंभीर जखमी
दरोडेखोरांच्या हल्ल्यानंतर स्वरक्षणासाठी पोलीस अधिकारी विजय पाटील यांनी गोळीबार केला. या गोळीबारात एक दरोडेखोर जखमी झाला. त्याला जखमी अवस्थेत सिव्हिलमध्ये उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

सोलापूर : सोलापुरात शनिवारी पोलीस आणि दरोडेखोरांमध्ये झालेल्या चकमकीत एक दरोडेखोर ठार झाला आहे, तर तीन पोलीस जखमी झाले आहेत. जखमी पोलिसांवर अश्विनी रुग्णालयात उपाचार सुरु आहेत. सोलापूरच्या उळे गावाजवळ हा प्रकार घडला.
मिळालेल्या माहितीनुसार, पहाटेच्या सुमारास उळे गावाजवळ गस्त घालताना तालुका पोलीस स्टेशनच्या पोलिसांना पाच ते सहा दरोडेखोर दिसले. पोलिसांनी त्यांना हटकले. एकाला पकडून गाडीत घालत असताना तो दरोडेखोर पोलिसांना 'साहेब.. चुकले चुकले,' म्हणत असताना त्याच्यासह इतर सहकाऱ्यांनी हातातील तलवारीने पोलीस निरीक्षक विजय पाटील यांच्या हातावर आणि मांडीवर तलवारीने हल्ला केला. तसेच दगडफेकही केली. या हल्ल्यात विजय पाटील गंभीर जखमी झाले.
त्यावेळी दरोडेखोरांच्या हल्ल्यानंतर स्वरक्षणासाठी पोलीस अधिकारी विजय पाटील यांनी गोळीबार केला. या गोळीबारात एक दरोडेखोर जखमी झाला. त्याला जखमी अवस्थेत सिव्हिलमध्ये उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
दरम्यान, या हल्ल्यात दोन पोलीस कर्मचारीही जखमी झाले आहेत. घटनास्थळी सकाळी दोन कार आढळल्या आहेत. एका गाडीच्या काचा फुटलेल्या दिसत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
