Pune : दादागिरी संपेना! मी कोण आहे माहित आहे का? म्हणत तरुणाकडून PMPMLच्या चालकाला बेदम मारहाण
पिंपरी-चिंचवडमध्ये तरुणांची दादागिरी काही संपायचं नाव घेत नाही आहे. पुण्यातील एका तरुणाने चक्क पीएमपीएमएलच्या चालकाला बेदम मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे.
PCMC PMPML : पिंपरी-चिंचवडमध्ये (PMPML) तरुणांची दादागिरी काही संपायचं नाव घेत नाही आहे. पुण्यातील एका तरुणाने चक्क पीएमपीएमएलच्या चालकाला बेदम मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये हा प्रकार घडला आहे. बसला एक दुचाकी आडवी येत होती ती काढायला लावली या कारणावरुन त्याने शिवीगाळ केली आणि बेदम मारहाण केली आहे.
पिंपरी चिंचवडमधील नेहरूनगर परिसरातील संतोषी माता चौकामध्ये भर दिवसा हा प्रकार घडला आहे. पीएमपीएमएल बसचं संचलन सुरु होतं. यावेळी रस्त्यात संतोषी माता चौकात एक दुचाकी आडवी येत होती. त्यावेळी चालकाने तरुणाला गाडी बाजूला करण्यासाठी सांगितलं होतं. मात्र याचा तरुणाला राग आला आणि तुला माहित आहे का, मी कोण आहे ? असं म्हटलं. यावरुन दोघांंमध्ये किरकोळ वाद झाला. त्यानंतर मुलाने थेट बसमध्ये प्रवेश केला आणि चालकाला मारहाण केली. ऋषिकेश घोडेकर असं या तरुणाचं नाव आहे.
चालकच असुरक्षित...
पिंपरी-चिंचवडमध्ये तरुणांनी दादागिरी केल्याच्या घटना रोज समोर येतात. किरकोळ वादातून मारहाण, प्रेमसंबंधातून खून अशा घटनांची संख्या सातत्याने वाढत आहे. PMPMLच्या कंडक्टरला लुटल्याचा प्रकार देखील काही दिवसांपूर्वी घडला होता. पिंपरी-चिंचवडमधील (PCMC) कासारवाडी येथील पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (PMPML) बस कंडक्टरकडून 3 हजार 355 रुपये लुटल्याप्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली होती. फुगेवाडी येथील 26 वर्षीय कुणाल कालेकर आणि 20 वर्षीय ओंकार चव्हाण अशी या दोघांची नावे होती. पीएमपीएमएल बसमधील दरोड्याच्या घटनेने सर्वांनाच धक्का बसला होता.
ड्युटीवर असताना लुटलं...
पीएमपीएमएल बसचे कंडक्टर हेमंत पेठे आणि चालक गौतम भालेराव हे निगडी-शेवळवाडी मार्गावर ड्युटीवर होते. तीन जण बसमध्ये चढले होते आणि रात्री 12.30 च्या सुमारास कासारवाडी येथे थांबल्यावर त्यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. ड्रायव्हर आणि कंडक्टरने त्यांना शांत राहण्याची विनंती केली असता तिघांनी दोघांनाही शिवीगाळ करून मारहाण केली होती. त्यापैकी एकाने कंडक्टर पेठे यांच्याकडून 3,355 रुपये आणि एक मोबाईल फोन हिसकावून घेतला आणि पळून जाण्याचा प्रयत्न केला. पेठे यांनी आरोपीकडून त्याचा मोबाईल हिसकावून घेतला. त्यानंतर दोघांच वादावादी झाली. एकमेकांच्या अंगावर धावून आले. हा सगळा प्रकार रात्री घघडत असल्याने मदत मागणं शक्य नव्हतं. त्यामुळे आपल्या जबाबदारीवर अनेक प्रवाशांना प्रवास करायला लावणारे चालक आणि वाहकच असुरक्षित आहेत का? असा प्रश्न सध्या निर्माण होत आहे.
PCMC PMPML : तरुणांची दादागिरी संपेना! मी कोण आहे माहित आहे का? म्हणत तरुणाने केली PMPMLच्या चालकाला बेदम मारहाण#pune pic.twitter.com/4r6iqHFVkQ
— Shivani Pandhare (@shivanipandhar1) November 11, 2022