एक्स्प्लोर

पंतप्रधान मोदींना अंबानींच्या लग्नाचा मुहूर्त साधता येणार नाही, पण 'या' दिवशी अनंत-राधिकाला शुभाशीर्वाद देणार

सध्या अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या विवाह सोहळ्याची जगभरात चर्चा आहे. या विवाह सोहळ्याला देशातील वेगवेगळ्या क्षेत्रातील दिग्गज उपस्थिती दर्शवणार आहेत.

मुंबई : सध्या देशातच नव्हे तर जगभरात अब्जाधीस मुकेश अंबानी यांचे पुत्र अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या शाही विवाह सोहळ्याची चर्चा होत आहे. या विवाह सोहळ्यानिमित्त आयोजित करण्यात आलेले विविध कार्यक्रम तसेच या कार्यक्रमांना हजेरी लावणारे पाहुणे सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत. दरम्यान, या विवाह सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहण्याची शक्यता नाही. मात्र ते विवाहाच्या दुसऱ्या दिवशी मोदी वधू-वराला शुभाशीर्वाद देण्याची शक्यता आहे. 

अनंत-राधिका यांना मोदी देणार शुभाशीर्वाद

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा विवाह येत्या 12 जुलै रोजी होणार आहे. या विवाह सोहळ्याला वेगवेगळ्या क्षेत्रातील दिग्गज उपस्थित राहणार आहेत. दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 13 जुलै रोजी मुंबईच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यामुळे ते 12 जुलै रोजीच्या विवाह सोहळ्यात मोदी उपस्थित राहण्याची शक्यता कमी आहे. पण मोदी 13 तारखेला वेगवेगळ्या कार्यक्रमांसाठी मुंबईत येतील तेव्हाच ते अनंत आणि राधिका यांना शुभाशीर्वाद देतील, असे सांगण्यात येत आहे. 

दिग्गज नेतेमंडळी लग्नाला राहणार उपस्थित 

या विवाहसोहळ्याला देशभरातील सर्वच प्रमुख पक्षांचे मुख्य नेते उपस्थित राहणार आहेत. यामध्ये उपराष्ट्रपती जगदीप धनखड हेही या विवाह सोहळ्याला उपस्थित राहतील. यासह उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, आरजेडी पक्षाचे नेते लालू प्रसाद यादव, राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा आदी नेते या विवाह सोहळ्यास उपस्थित राहतील. विशेष म्हणजे बहुसंख्या मंत्री, परराष्ट्र राजनैतिक अधिकारीही या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. 

सिनेसृष्टीतील अनेकांची हजेरी 

दरम्यान, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कुटुंबाने अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या हळदी समारंभाला हजेरी लावली होती. ठाकरे परिवाराचे काही व्हिडीओ समोर आले होते. इतरही अनेक नेतेमंडळींनी या हळदी समारंभ तसेच इतर कार्यक्रमांना हजेरी लावली. चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज अभिनेते-अभिनेत्रींनीही या कार्यक्रमांना हजेरी लावली. यामध्ये यामध्ये जुन्याजाणत्या तसेच नवख्या कलाकारांचाही समावेश आहे. 

हेही वाचा :

Radhika Merchant : राधिकाच्या ओढणीवर तब्बल एवढ्या किंमतीचा 'मोगरा फुलला'; अंबानींच्या सुनेचा थाटच न्यारा

Mukesh Ambani Childrens Net Worth :  आकाश-अनंत-ईशाचे शिक्षण किती? मुकेश अंबानींच्या मुलांकडे किती संपत्ती?

Anant-Radhika Wedding : अनंत-राधिकासाठीच्या पूजेत वरमाई नीता अंबानींची हवा, सोन्याच्या ब्लाऊजने वेधले लक्ष

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

भुमरेंच्या होमग्राऊंडमध्ये आदित्य ठाकरेंची तिरकस टोलेबाजी म्हणाले,
भुमरेंच्या होमग्राऊंडमध्ये आदित्य ठाकरेंची तिरकस टोलेबाजी म्हणाले, "गद्दारी केली,किती खोके धोके! वाईनची दुकानं.."
जिगरबाज... सर लवकर बरं व्हायचंय, त्यांना पकडायचंय; पुण्यातील जखमी पोलीस अधिकाऱ्याचा कर्तव्यबाणा
जिगरबाज... सर लवकर बरं व्हायचंय, त्यांना पकडायचंय; पुण्यातील जखमी पोलीस अधिकाऱ्याचा कर्तव्यबाणा
महिला सरपंचाकडून आत्मदहनाचा प्रयत्न,बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अंगावर ओतलं पेट्रोल
महिला सरपंचाकडून आत्मदहनाचा प्रयत्न,बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अंगावर ओतलं पेट्रोल
VIP Treatment In Jail : एका हातात ड्रिंक, दुसऱ्या हातात सिगारेट... हत्या प्रकरणातील आरोपी अभिनेत्याला व्हिआयपी ट्रिटमेंट
एका हातात ड्रिंक, दुसऱ्या हातात सिगारेट... हत्या प्रकरणातील आरोपी अभिनेत्याला व्हिआयपी ट्रिटमेंट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vasant Chavan Death : नांदेडचे खासदार वसंत चव्हाण यांचं निधन; अशोक चव्हाणांची प्रतिक्रियाABP Majha Headlines : 02 PM : 26 August 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सDeepak Kesarkar PC : शाळेत पॅनिक बटन देणार; कुणालाही वचवलं जाणार नाही, दीपक केसरकरांची ग्वाहीTOP 50 Headlines : टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा : 26 August 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
भुमरेंच्या होमग्राऊंडमध्ये आदित्य ठाकरेंची तिरकस टोलेबाजी म्हणाले,
भुमरेंच्या होमग्राऊंडमध्ये आदित्य ठाकरेंची तिरकस टोलेबाजी म्हणाले, "गद्दारी केली,किती खोके धोके! वाईनची दुकानं.."
जिगरबाज... सर लवकर बरं व्हायचंय, त्यांना पकडायचंय; पुण्यातील जखमी पोलीस अधिकाऱ्याचा कर्तव्यबाणा
जिगरबाज... सर लवकर बरं व्हायचंय, त्यांना पकडायचंय; पुण्यातील जखमी पोलीस अधिकाऱ्याचा कर्तव्यबाणा
महिला सरपंचाकडून आत्मदहनाचा प्रयत्न,बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अंगावर ओतलं पेट्रोल
महिला सरपंचाकडून आत्मदहनाचा प्रयत्न,बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अंगावर ओतलं पेट्रोल
VIP Treatment In Jail : एका हातात ड्रिंक, दुसऱ्या हातात सिगारेट... हत्या प्रकरणातील आरोपी अभिनेत्याला व्हिआयपी ट्रिटमेंट
एका हातात ड्रिंक, दुसऱ्या हातात सिगारेट... हत्या प्रकरणातील आरोपी अभिनेत्याला व्हिआयपी ट्रिटमेंट
Vidhansabha Election 2024: रणजीतसिंह ते हर्षवर्धन, बापू पठारे ते मदन भोसले, 9 बडे नेते शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करण्याच्या तयारीत!
रणजीतसिंह ते हर्षवर्धन, बापू पठारे ते मदन भोसले, 9 बडे नेते शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करण्याच्या तयारीत!
Prakash Ambedkar : लाडकी बहीण योजनेला पैसा कुठून आला? आदिवासींचे बजेट वर्ग केले का? प्रकाश आंबेडकरांचा आरोप
लाडकी बहीण योजनेला पैसा कुठून आला? आदिवासींचे बजेट वर्ग केले का? प्रकाश आंबेडकरांचा आरोप
चक्क पोलीस शिपाई पदाची नोकरी लावून देण्याच्या नावाखाली अनेकांना गंडा; वर्दीसह आरोपी पोलिसांच्या हाती
चक्क पोलीस शिपाई पदाची नोकरी लावून देण्याच्या नावाखाली अनेकांना गंडा; वर्दीसह आरोपी पोलिसांच्या हाती
आदित्य ठाकरेंचा ताफा अडवला, मराठा आंदोलकांची घोषणाबाजी, छत्रपती संभाजीनगरच्या राड्यानंतर पैठणमध्येही गोंधळ
आदित्य ठाकरेंचा ताफा अडवला, मराठा आंदोलकांची घोषणाबाजी, छत्रपती संभाजीनगरच्या राड्यानंतर पैठणमध्येही गोंधळ
Embed widget