Mukesh Ambani Childrens Net Worth : आकाश-अनंत-ईशाचे शिक्षण किती? मुकेश अंबानींच्या मुलांकडे किती संपत्ती?
Mukesh Ambani Childrens Net Worth : मुकेश अंबानी यांनी काही महिन्यांपूर्वीच आपल्या तिन्ही मुलांना रिलायन्सची जबाबदारी सोपवण्यासाठी पावले उचलले आहेत.
Mukesh Ambani Childrens Net Worth : मुकेश अंबानी (Mukesh Ambani) हे आपल्या श्रीमंतीसोबत नव्या व्यवसायासाठीदेखील ओळखले जातात. आपल्या उद्योग-व्यवसायात त्यांनी कायम नाविन्यपूर्ण कल्पना राबवल्या आहेत. आशियातील सगळ्यात श्रीमंत व्यक्ती असलेल्या मुकेश अंबानी यांची गणना ही जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्तींपैकी एक होते. मुकेश अंबानी यांनी काही महिन्यांपूर्वीच आपल्या तिन्ही मुलांना रिलायन्सची जबाबदारी सोपवण्यासाठी पावले उचलले आहेत.
मुकेश अंबानी यांची तिन्ही मुले आकाश, ईशा आणि अनंत हे उच्च शिक्षित असून श्रीमंत आहेत. या तिन्ही मुलांचे शिक्षण आणि त्यांची संपत्ती किती, याची माहिती करून घेण्यासो अनेकांना उत्सुकता असते.
आकाश अंबानींचे शिक्षण किती?
मुकेश अंबानी यांचा मुलगा आकाश अंबानी हा 32 वर्षांचा आहे. आकाशचे शिक्षण हे धीरुभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये झाले. त्यानंतर आकाशने अमेरिकेतील ब्राउन विद्यापीठातून बिझनेस-कॉमर्समध्ये पदवी शिक्षण पूर्ण केले.
View this post on Instagram
आकाश अंबानीची संपत्ती किती?
आकाश अंबानी हा 2022 पासून रिलायन्स जिओचा अध्यक्ष आहे. त्याशिवाय, जिओ प्लॅटफॉर्म आणि रिलायन्स रिटेलमध्ये महत्त्वाची भूमिका सांभाळत आहेत. आकाश अंबानीचा वार्षिक पगार 5.4 कोटी रुपये आहे. स्टारसनफोल्डिडच्या रिपोर्टनुसार, आकाश अंबानीची संपत्ती ही 41 अब्ज डॉलरच्या (सुमारे 3 लाख 33 हजार 313 कोटी) घरात आहे.
ईशा अंबानीचे शिक्षण किती?
ईशा अंबानी ही 2018 मध्ये व्यावसायिक आनंद पिरामलसोबत विवाहबद्ध झाली होती. ईशाचे शालेय शिक्षण हे धीरुभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमधून झाले. ईशा अंबानीने स्टॅनफोर्ड विद्यापीठातून एमबीएचे शिक्षण घेतले. त्याआधी ईशा अंबानीने अमेरिकेतील येल विद्यापीठातून सायकोलॉजीमधून पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले.
ईशा अंबानीची संपत्ती किती?
ईशा अंबानी ही तिच्या वडिलांना त्यांच्या व्यवसायात मदत करते. ईशा रिलायन्स ग्रुप्सचा रिटेल व्यवसाय सांभाळत आहे. याशिवाय ती रिलायन्स बोर्डात नॉन-एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर देखील आहे. रिलायन्स रिटेल, रिलायन्स जिओ, रिलायन्स फाऊंडेशनचीही ईशा अंबानीकडे जबाबदारी आहे. 'इंडिया टाइम्स'च्या रिपोर्टनुसार, ईशा अंबानीचा वार्षिक पगार 4.2 कोटी रुपये आहे. तर ईशाची एकूण संपत्ती सुमारे 831 कोटी रुपयांच्या घरात आहे.
अनंत अंबानीचे शिक्षण किती?
अनंत अंबानी हा तिन्ही भावांमध्ये सगळ्यात धाकटा भाऊ आहे. धीरूभाई इंटरनॅशनल स्कूलमधून शिक्षण घेतल्यानंतर अनंतने अमेरिकेच्या ब्राउन युनिव्हर्सिटीमधून पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले.
View this post on Instagram
अनंत अंबानीची संपत्ती किती?
अनंत अंबानी हा रिलायन्स आणि जिओमधील महत्त्वाच्या पदावर आहे. 2022 मध्ये रिलायन्स रिटेलच्या संचालक पदावर अनंत अंबानीची नियुक्ती झाली होती. अनंत अंबानींकडे रिलायन्सच्या ग्रीन आणि रिन्यूएबल एनर्जीची जबाबदारी आहे. 'इंडिया टाइम्स'च्या वृत्तानुसार, अनंत अंबानींचा वार्षिक पगार 4.2 कोटी आहे. तर एकूण संपत्ती ही 3 लाख 44 हजार कोटींच्या घरात आहे.