एक्स्प्लोर
चौकीदार झोपत नाही, चोरांना पकडतो : मोदी
सोलापुरात अनेक विकासकामांचं मोदींच्या हस्ते उद्घाटन आणि भूमिपूजन करण्यात आलं. यानंतर झालेल्या भाषणात मोदींनी राफेल, ऑगस्टा वेस्टलँड, आर्थिक दुर्बल सवर्णांना 10 टक्के आरक्षण अशा मुद्द्यांना हात घातला.
सोलापूर : देशाची जनता चौकीदाराच्या पाठीशी उभी आहे म्हणून अनेक बड्या-बड्या लोकांचं आव्हान मी समर्थपणे पेलत आहे, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर निशाणा साधला. सोलापुरात अनेक विकासकामांचं मोदींच्या हस्ते उद्घाटन आणि भूमिपूजन करण्यात आलं. यानंतर झालेल्या भाषणात मोदींनी राफेल, ऑगस्टा वेस्टलँड, आर्थिक दुर्बल सवर्णांना 10 टक्के आरक्षण अशा मुद्द्यांना हात घातला.
चौकीदार सोता नहीं, अंधेरे में चोरों को पकड़ता है : मोदी
ख्रिश्चन मिशेलचा उल्लेख करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, ''हेलिकॉप्टर घोटाळ्यात सामील दलाला पकडून भारतात आणलं. जेलमध्ये बंद असलेल्या दलालाने धक्कादायक खुलासा केला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, तो केवळ हेलिकॉप्टरच्या डीलमध्ये सहभागी नव्हता, तर आधीच्या सरकारच्या काळात फ्रान्ससोबत लढाऊ विमानांचा जो सौदा केला जात होता, त्यातही त्याची भूमिका होती. मिशेल मामाचा काँग्रेसशी काय संबंध आहे? चौकीदाराने जागं राहावं की झोपावं? तुमचा आशीर्वाद आहे, त्यामुळे चौकीदार लढत आहे. चौकीदार झोपत नाही, अंधार झाल्यावर चोरांना पकडतो. (चौकीदार सोता नहीं है, अंधेरा होने पर चोरों को पकड़ता है)''
खोटं बोलणाऱ्यांना दिल्लीत उत्तर : पंतप्रधान
विरोधकांवर हल्लाबोल करताना पंतप्रधान म्हणाले की, "काल लोकसभेत एक ऐतिहासिक विधेयक मंजूर झालं. आर्थिकदृष्ट्या गरीब सवर्णांना 10% आरक्षणावर शिक्कामोर्तब झाल्याने सबका साथ-सबका विकास हा मंत्र अधिक मजबूत झाला. प्रत्येक समाजाला विकासाची संधी मिळावी आणि अन्यायाची भावना नष्ट व्हावी या उद्देशाने आम्ही जनतेच्या उज्ज्वल भविष्यासाठी आम्ही समर्पित आहोत."
"देशात आरक्षणाच्या नावावर दलित, आदिवासी, ओबीसी यांचं आरक्षण कमी केलं जाणार असल्याचा खोटा प्रचार काही जण करत आहेत. परंतु आम्ही काहीच कमी न करता, अतिरिक्त 10 टक्के आरक्षण देऊन सर्वांना न्याय देण्याचं काम केलं.
चौकीदाराने दलालांना हटवण्याची मोहीम छेडली
"आता दलालांचं मलाई खाणं बंद झालं आहे. चोरी आणि लूट करणाऱ्यांच्या दुकानांना टाळं लागलं आणि गरिबांच्या हक्काचा पैसा आता थेट त्यांच्यापर्यंत पोहोचत आहे. चौकीदाराने दिल्लीच्या सत्तेतून दलालांना हटवण्याची मोहीम छेडली आहे. ते कितीही खोटं बोलले, सातत्याने खोटं बोलत राहिले, कुठेही जाऊन खोटं बोलले तरीही हा चौकीदार ही स्वच्छता मोहीम बंद करणार नाही," असं मोदींनी ठणकावून सांगितलं.
कोणकोणत्या विकासकामांचं भूमिपूजन आणि लोकार्पण?
उजनी ते सोलापूर या 360 कोटी रुपये खर्चून साकारण्यात येणाऱ्या समांतर जलवाहिनीचं भूमिपूजन
स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत एबीडी एरियातील 190 कोटीच्या पाणीपुरवठा ड्रेनेज लाईन सुविधा कामाचं भूमिपूजन
हद्दवाढ भागात महापालिकेच्या वतीने करण्यात येणाऱ्या अमृत योजनेअंतर्गत 180 कोटींच्या भुयारी गटार योजनेचे भूमिपूजन
महापालिकेच्या वतीने सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी उभारण्यात आलेल्या तीन एसटीपी प्रकल्पाचे लोकार्पण
पंतप्रधान आवास योजनेतून रे नगर फेडरेशन या नियोजित 30 हजार गृहनिर्माण प्रकल्पाचे भूमिपूजन
सोलापूर-उस्मानाबाद या चौपदरी राष्ट्रीय महामार्गाचे लोकार्पण
मोदींचा सोलापूर दौरा, 85 मिनिटांत सहा विकासकार्यांचा शुभारंभ
मोदींच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे
हेलिकॉप्टर घोटाळ्यात ज्या दलालाला परदेशातून आणलं, तो केवळ हेलिकॉप्टरच्या डीलमध्ये सहभागी नव्हता, तर आधीच्या सरकारच्या काळात फ्रान्ससोबत लढाऊ विमानांचा जो सौदा केला जात होता, त्यातही त्याची भूमिका होती : मोदी
शहरांच्या स्वच्छतेप्रमाणेच मी सरकारमध्येही स्वच्छता केली आहे : मोदी
30 हजार घरांची योजना लवकरात लवकर पूर्ण करणार, विडी कामगार, रिक्षाचालकांचा लाभार्थ्यांमध्ये समावेश : मोदी
सोलापुरातूनही लवकरच 'उडान' झेपावेल : पंतप्रधान नरेंद्र मोदी
राष्ट्रहिताचे मोठमोठे निर्णय घेण्याची गरज, सबका साथ सबका विकास हाच आमचा नारा : पंतप्रधान नरेंद्र मोदी
52 हजार किमी लांबीच्या राष्ट्रीय महामार्गांवर काम सुरु : पंतप्रधान नरेंद्र मोदी
विकासकामांतून स्थानिकांना रोजगाराच्या संधी, भाजपने कधीच दिखाऊपणा केला नाही : पंतप्रधान नरेंद्र मोदी
ज्या प्रकल्पाचं भूमिपूजन करतो, त्याचं उद्घाटनही आम्हीच करतो : पंतप्रधान नरेंद्र मोदी
दलित, आदिवासी, ओबीसी यांच्या आरक्षणातून कोणी काही घेऊ शकत नाही. आम्ही 10 टक्के आरक्षण देऊन सगळ्यांना न्याय दिला आहे : मोदी
आर्थिकदृष्ट्या गरीब मागासांना 10 टक्के आरक्षण देऊन सबका साथ सबका विकासाच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकलं आहे : मोदी
10 टक्के आरक्षणातून सवर्ण गरिबांना विकासाची संधी मिळेल : पंतप्रधान नरेंद्र मोदी
सोलापूर-उस्मानाबाद रेल्वे मार्गाला मंजुरी, तुळजाभवानीच्या दर्शनाला येणाऱ्या भक्तांना फायदा : पंतप्रधान नरेंद्र मोदी
सोलापूरचे ग्रामदैवत श्रीसिद्धेश्वर, अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ आणि मंगळवेढ्याचे संत दामाजी पंत यांना साष्टांग नमस्कार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सोलापुरात मराठीतून भाषणाला सुरुवात
पंतप्रधान नरेंद्र मोदींची मराठीतून भाषणाची सुरुवात
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement