एक्स्प्लोर

Assembly Election Result : मोदींचा 'फ्लॉप शो', 'या' दिग्गज नेत्यांसाठी सभा घेऊनही पदरी पराभव

विधानसभा निवडणुंकापूर्वी पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी दोन्ही मतदारसंघात जाऊन जाहीर सभा घेतल्या होत्या. सभा घेऊनही राज्यातील विद्यमान आमदार पंकजा मुंडे आणि उदयनराजे भोसले यांना पराभव स्वीकारावा लागला आहे.

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा एखाद्या मतदारसंघात आयोजित करण्यापूर्वीही भाजपकडून त्याची खूप तयारी आणि अभ्यास केला जातो. नरेंद्र मोदी ज्या ठिकाणी सभा घेतात त्या ठिकाणी उमदेवार सहज जिंकूनही येतात. पण यावेळी मात्र नरेंद्र मोदी यांनी सभा घेऊनही राज्यातील विद्यमान आमदार पंकजा मुंडे आणि उदयनराजे भोसले यांना पराभव स्वीकारावा लागला आहे. त्यामुळे भाजपची निवडणूक रणनितीही इथे अपयशी ठरल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. विधानसभा निवडणुंकापूर्वी पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी दोन्ही मतदारसंघात जाऊन जाहीर सभा घेतल्या होत्या. परळीमध्ये त्यांनी पंकजा मुंडे आणि बीडमधील इतर उमेदवारांच्या प्रचारासाठी सभा घेतली आणि नंतर साताऱ्यामध्ये उदयनराजे भोसले आणि विधानसभेच्या इतर उमेदवारांसाठी प्रचार सभा घेतली होती. या सभेमध्ये त्यांनी उदयनराजे भोसले यांना निवडून देण्याचे आवाहनही साताऱ्याच्या जनतेला केले होते. पण या दोन्ही ठिकाणी भाजपचे उमेदवार धक्कादायकपणे पराभूत झाले आहेत. परळीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रचारसभा आणि दसरा मेळाव्यानिमित्त झालेली गृहमंत्री अमित शाह यांची प्रचारसभा यांचाही विशेष परिणाम मतदारांवर झाला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. विद्यमान ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. परंतु, धनंजय मुंडेंनी विजय मिळवत देत पंकजा मुंडेंना जोरदार धक्का दिला आहे. परळी विधानसभा मतदारसंघातून पंकजा मुंडे पराभूत झाल्या. त्यांना त्यांचे बंधू आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार धनंजय मुंडे यांनी पराभूत केले. ३० हजारांच्या मताधिक्याने धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांना हरविले. धनंजय मुंडे यांचा हा विजय जिल्ह्याच्या राजकारणावर मोठा परिणाम करणारा आहे. तर दुसरीकडे सातारा लोकसभेच्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार श्रीनिवास पाटील यांनी उदयनराजे भोसले यांचा पराभव केला. एक लाखापेक्षा जास्त मताधिक्याने साताऱ्यातील जनतेने उदयनराजे भोसले यांचा पराभव केला. साताऱ्यात उदयनराजेंची लोकप्रियता तुफान आहे. ते कोणत्याही पक्षाकडून निवडणूक लढले तरी त्यांचा विजय निश्चित असतोच, असं कायम म्हटलं जातं. परंतु हा समज पोटनिवडणुकीत चुकीचा ठरला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ramtek Bungalow : रामटेक बंगल्याचं 'ट्रॅक रेकॉर्ड' अपशकुनी? बावनकुळे की पंकजा मुंडे, मुक्कामासाठी कोण सज्ज होणार?
रामटेक बंगल्याचं 'ट्रॅक रेकॉर्ड' अपशकुनी? बावनकुळे की पंकजा मुंडे, मुक्कामासाठी कोण सज्ज होणार?
Kokan Refinary : कोकणात रिफायनरी होणार, पण बारसूत की नाणारमध्ये? मुख्यमंत्र्यांचा कौल कोणत्या ठिकाणाला? 
कोकणात रिफायनरी होणार, पण बारसूत की नाणारमध्ये? मुख्यमंत्र्यांचा कौल कोणत्या ठिकाणाला? 
शिर्डीत दर्शन घेऊन परतताना समृद्धी महामार्गावर पुन्हा अपघात, कारचा चेंदामेंदा; तीन ठार 3 जखमी
शिर्डीत दर्शन घेऊन परतताना समृद्धी महामार्गावर पुन्हा अपघात, कारचा चेंदामेंदा; तीन ठार 3 जखमी
बीडमध्ये पोलिसांची ॲक्शन सुरू... हवेत गोळीबार करणाऱ्या धनुभाऊंच्या कार्यकर्त्यावर गुन्हा; व्हिडिओ व्हायरल
बीडमध्ये पोलिसांची ॲक्शन सुरू... हवेत गोळीबार करणाऱ्या धनुभाऊंच्या कार्यकर्त्यावर गुन्हा; व्हिडिओ व्हायरल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Navi Mumbai Accident Car Airbag Death : कारमध्ये मुलांना पुढं बसवताय? हा व्हिडीओ पाहा Special ReportTOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर : 24 December 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 11 PM : 24 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Cabinet Minister : मंत्रिपदी बढती, सुरु झाली झाडाझडती Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ramtek Bungalow : रामटेक बंगल्याचं 'ट्रॅक रेकॉर्ड' अपशकुनी? बावनकुळे की पंकजा मुंडे, मुक्कामासाठी कोण सज्ज होणार?
रामटेक बंगल्याचं 'ट्रॅक रेकॉर्ड' अपशकुनी? बावनकुळे की पंकजा मुंडे, मुक्कामासाठी कोण सज्ज होणार?
Kokan Refinary : कोकणात रिफायनरी होणार, पण बारसूत की नाणारमध्ये? मुख्यमंत्र्यांचा कौल कोणत्या ठिकाणाला? 
कोकणात रिफायनरी होणार, पण बारसूत की नाणारमध्ये? मुख्यमंत्र्यांचा कौल कोणत्या ठिकाणाला? 
शिर्डीत दर्शन घेऊन परतताना समृद्धी महामार्गावर पुन्हा अपघात, कारचा चेंदामेंदा; तीन ठार 3 जखमी
शिर्डीत दर्शन घेऊन परतताना समृद्धी महामार्गावर पुन्हा अपघात, कारचा चेंदामेंदा; तीन ठार 3 जखमी
बीडमध्ये पोलिसांची ॲक्शन सुरू... हवेत गोळीबार करणाऱ्या धनुभाऊंच्या कार्यकर्त्यावर गुन्हा; व्हिडिओ व्हायरल
बीडमध्ये पोलिसांची ॲक्शन सुरू... हवेत गोळीबार करणाऱ्या धनुभाऊंच्या कार्यकर्त्यावर गुन्हा; व्हिडिओ व्हायरल
मंत्रिपदाची शपथ घेतली, पदभार स्वीकारला; संजय सावकारेंनी दालनात येताच अगोदर पूजा घातली
मंत्रिपदाची शपथ घेतली, पदभार स्वीकारला; संजय सावकारेंनी दालनात येताच अगोदर पूजा घातली
IAS Transfer List : फडणवीस सरकारकडून राज्यातील वरिष्ठ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या जाहीर, मुंबई बेस्टमध्ये खांदेपालट
फडणवीस सरकारकडून राज्यातील वरिष्ठ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या जाहीर, मुंबई बेस्टमध्ये खांदेपालट
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स; 24 डिसेंबर 2024  मंगळवार; एका क्लिकवर सर्वच घडामोडी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स; 24 डिसेंबर 2024 मंगळवार; एका क्लिकवर सर्वच घडामोडी
दादर-पोरबंदर सौराष्ट्र एक्सप्रेसला अपघात, पटरीवरुन घसरला डब्बा; सुदैवाने मोठा अनर्थ टळला
दादर-पोरबंदर सौराष्ट्र एक्सप्रेसला अपघात, पटरीवरुन घसरला डब्बा; सुदैवाने मोठा अनर्थ टळला
Embed widget