PM Modi Pune Tour Live : आज पंतप्रधान मोदी पुण्यात; मेट्रोसह विविध विकासकामांचे उद्घाटन, पाहा प्रत्येक अपडेट
Pune PM Narendra Modi Tour : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे दौऱ्यावर आहेत.पंतप्रधान मोदी पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन शहरातील दोन मेट्रो मार्गिकांचे उद्घाटन करणार आहेत.
LIVE
Background
Pune PM Narendra Modi Tour : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे दौऱ्यावर आहेत.पंतप्रधान मोदी पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन शहरातील दोन मेट्रो मार्गिकांचे उद्घाटन करणार आहेत. सकाळी 11 वाजता पंतप्रधान पुणे महानगरपालिकेच्या आवारात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करतील. हा पुतळा 1850 किलोग्रॅम गन मेटलचा बनवलेला असून त्याची उंची सुमारे 9.5 फूट आहे.
सकाळी साडेअकरा वाजता पंतप्रधानांच्या हस्ते पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे उद्घाटन होणार आहे. 24 डिसेंबर 2016 रोजी पंतप्रधानांच्या हस्ते या प्रकल्पाची पायाभरणी करण्यात आली होती. एकूण 32.2 किमी लांबीच्या पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या 12 किमी लांब मार्गाचे उद्घाटन पंतप्रधान करणार आहेत. हा संपूर्ण प्रकल्प 11,400 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च करून बांधला जात आहे. ते गरवारे मेट्रो स्थानकात प्रदर्शनाचे उद्घाटन आणि पाहणी करतील आणि तिथून आनंदनगर मेट्रो स्थानकापर्यंत मेट्रोने प्रवास करतील.
दुपारी 12 वाजता पंतप्रधान अनेक विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन करतील. मुळा-मुठा नदी प्रकल्पांच्या पुनरुज्जीवन आणि प्रदूषण निवारणाची पायाभरणीही ते करणार आहेत. नदीच्या 9 किमी पट्ट्यात 1080 कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्च करून पुनरुज्जीवन केले जाईल.
यामध्ये नदीकाठचे संरक्षण, सांडपाणी व्यवस्थापन (इंटरसेप्टर सीवेज नेटवर्क), सार्वजनिक सुविधा, नौकाविहार सुविधा इत्यादी कामांचा समावेश असेल. मुळा-मुठा नदीचे प्रदूषण कमी करणारा प्रकल्प 1470 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चासह “एक शहर एक ऑपरेटर” या संकल्पनेवर राबविण्यात येणार आहे. या प्रकल्पांतर्गत एकूण 11 सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प बांधले जातील, त्यांची एकत्रित क्षमता सुमारे 400 एमएलडी असेल. बाणेर येथे 100 ई-बस आणि ई-बस डेपोचेही पंतप्रधान लोकार्पण करतील.
पुण्यात बालेवाडी येथे बांधण्यात आलेल्या आरके लक्ष्मण आर्ट गॅलरी-संग्रहालयाचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. या संग्रहालयाचे मुख्य आकर्षण म्हणजे मालगुडी गावावर आधारित छोटेखानी प्रतिकृती (मॉडेल) आहे जी ऑडिओ-व्हिज्युअल इफेक्ट्सच्या माध्यमातून जिवंत केली जाणार आहे. व्यंगचित्रकार आर के लक्ष्मण यांनी काढलेली व्यंगचित्रे संग्रहालयात प्रदर्शित करण्यात येणार आहेत. यानंतर, दुपारी 1:45 वाजता, पंतप्रधान मोदी सिम्बायोसिस विद्यापीठाच्या सुवर्ण महोत्सवी सोहळ्याचा प्रारंभ करतील.
इतर महत्वाच्या बातम्या
Pune Metro: पंतप्रधान मोदी उद्या पुणे दौऱ्यावर; 'या' दोन मेट्रो मार्गिकांचं उद्घाटन करणार
Sharad Pawar : आक्षेप नाही, मात्र अर्धवट कामाचे उद्घाटन करण्यासाठी पंतप्रधान मोदी येतायत : शरद पवार
रविवारची सुट्टी असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत विद्यार्थ्यांनी प्रवास कसा केला - राष्ट्रवादी काँग्रेसचा आक्षेप
रविवारची सुट्टी असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत विद्यार्थ्यांनी प्रवास केल्याचं कसं काय दाखवलं. असा आक्षेप राष्ट्रवादी काँग्रेसने घेतलाय. त्यासोबत पंतप्रधानांना काळ्या रंगाचं इतकं वावडं का आहे. असा सवाल ही राष्ट्रवादी काँग्रेसने विचारला
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनावरण केलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे तरी कसा?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते पुणे महापालिकेच्या प्रांगणात उभारण्यात आलेल्या सिंहासनाधीश पुतळ्याचे अनावरण करण्यात आलं. मेघडबरी मधील साडेनऊ फूट उंचीचा ब्राँझ धातुमध्ये 2 टन वजनाचा पुतळा उभारण्यात आलाय. विवेक खटावकर आणि त्यांच्या कुटुंबियांनी 6 महिन्यात पुतळा उभारला आहे, जमिनी पासून 22 फूट उंचीची मेघडंबरी आहे. यात साडे दहा फूट उंचीच्या सिंहासनावर बसलेली साडे नऊ फूट उंचीचा पुतळा आहे, सिंहासनाच्या दोन्ही बाजूला मांगल्याचे प्रतीक असलेलं हत्ती , मोर आहेत, सिंहासनाच्या वरच्या बाजूला लक्ष्मीचे प्रतीक असणारे कमळाचे फुल आहे, सिंहासनाच्या पुढच्या बाजूस शौर्याचे प्रतीक असणारे सिंह आहेत,, महाराजांच्या चेहऱ्यावर करारीपणा आहे हातात धोप, तलवार आहे तर पायात पायतान नाहीत, रायगड, दिल्लीच्या महाराष्ट्र सदनमध्ये उभारण्यात आलेल्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा अभ्यास करून हा पुतळा उभारण्यात आलाय
PM Modi Pune Tour Live : पंतप्रधान मोदी लाईव्ह, मराठीत केली भाषणाला सुरुवात, महामानवांना केलं अभिवादन
अजित पवार म्हणाले, गेल्या काही दिवसांपासून संवैधानिक पदावर बसलेल्या व्यक्तींकडून अनावश्यक वक्तव्य
अजित पवार म्हणाले, मला पंतप्रधान नरेंद्र मोंदीना एक लक्ष आणून द्यायचे आहे. गेल्या काही दिवसांपासून संवैधानिक पदावर बसलेल्या व्यक्तींकडून अनावश्यक वक्तव्य केली जात आहेत. शिवछत्रपतींनी राजमाता जिजाऊ मां साहेबांच्या संकल्पनेतून स्वराज्य उभारले. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी सत्यशोधक विचारांच्या सहायायाने समाजकार्य केले. या कोणाबद्दल देखील असुया किंवा द्वेष न ठेवता आपल्याला विकासाचे काम पुढे न्यायचे आहे.
नागपूर मेट्रोप्रमाणं इतर शहरातील मेट्रोही वेगानं सुरु करा, मेट्रोच्या कामात राजकारण नको- अजित पवार
नागपूर मेट्रोप्रमाणं इतर शहरातील मेट्रोही वेगानं सुरु करा, मेट्रोच्या कामात राजकारण नको- अजित पवार