एक्स्प्लोर
राज्यभरात प्लास्टिकबंदी, पर्यावरण मंत्र्यांची विधानसभेत घोषणा!
पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी प्लास्टिकबंदीची घोषणा विधानसभेत केली.
मुंबई: राज्यात अखेर प्लास्टिक बंदी करण्यात येणार आहे. पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी त्याबाबतची घोषणा विधानसभेत केली.
टप्प्याटप्प्याने राजभरात प्लास्टिक बंदी करण्यात येईल. प्लास्टिक विक्री करण्यांऱ्यासोबत वापरणाऱ्यांवरही दंडात्मक कारवाई करण्यात येईल.
काल मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्लास्टिक बंदीच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली होती. त्याची अखेर आज घोषणा करण्यात आली.
प्लास्टिक बंदीच्या अंमलबजावणीसाठी एक्सपर्ट कमिटी आणि एमपॉवर्ड कमिटीची स्थापना करण्यात येणार आहे. प्लास्टिक पिशव्या, ताटं, चमचे, टोप्या यावर तूर्तास बंदी घालण्यात आली आहे.
दरम्यान, पाण्याच्या बाटल्यांवर तूर्तास बंदी घालण्यात आलेली नाही. पण मिनरल वॉटप कंपन्यांच्या लॉबीचा सरकारवर दबाव असल्याने तूर्तास PET बॉटल्सवरचा बंदीचा निर्णय पुढे ढकलल्याची सध्या चर्चा आहे.
प्लास्टिक नैसगिक आणि जैविकदृष्ट्या विघटनशील नसतो. प्लास्टिक पिशव्या आणि प्लास्टिकच्या इतर उत्पादनांच्या वापरामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडतो. पावसाळ्यात पाण्याचा निचरा होण्यात अडथळे निर्माण होऊन पाणी तुंबते. त्यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. प्लास्टिक पिशव्या जनावरांच्या पोटात जाऊन त्यांचा मृत्यू होत असल्याने त्यावर बंदी घालण्याचा निर्णय पर्यावरण विभागातर्फे घेण्यात आला आहे. त्यामुळे यापुढे प्लास्टिक विक्री करणाऱ्या आणि वापरणाऱ्या अशा दोघांवरही दंडात्मक कारवाईची तरतूद असेल.
संबंधित बातम्या
राज्यात संपूर्ण प्लास्टिक बंदीचा गुढीपाडव्याचा मुहूर्त हुकणार
राज्यात लवकरच प्लास्टिक बंदी!
शौचालयाच्या बांधकामात बाटल्यांचा वापर, किंमत अवघी...
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
भारत
राजकारण
राजकारण
Advertisement