एक्स्प्लोर
आगीत सापडलेला मदत मागत होता, लोक व्हिडीओ शूट करत होते
पुणे: माणूस किती निर्दयी होत चाललाय, हे नुकतंच पिंपरी चिंचवडमध्ये पाहायला मिळालं. एक व्यक्ती जीवन आणि मृत्यूच्या उंबरठ्यात होता .तो मदत मागत राहिला. पण कुणाच्याही काळजाला पाझर फुटला नाही.
पिंपरी चिचवडमध्ये एका ट्रान्सफार्मरला आग लागली आणि आगीनंतर माणुसकी कशी हरवत चाललीय याचं दर्शनंही झालं.
कारण ट्रान्सफार्मरनं भडका घेतल्यानंतर आजूबाजूच्या गाड्यांनी पेट घेतला..आणि या आगीच्या फेऱ्यात फुटपाथवर बुटपॉलिशच काम करणारे पोपट बनसोडे आले.
जिवाच्या आकांतानं बनसोडे मदतीची याचना करु लागले. पण लोक मोबाईलमध्ये व्हिडीओ शूट करण्यात मग्न होते. मदतीचा एकही हात पुढं आला नाही आणि बनसोडे यांचा मृत्यू झाला.
घरचा कर्ता पुरुष गेल्यानं बनसोडे यांच्या कुटुंबियांची चिंता वाढली आहे. त्यातच वीज कंपनीकडून कुठलीही मदत मिळाली नाही.
वेळीच जर कोणी त्यांना मदत केली असती तर कदाचित बनसोडे आज आपल्यात असते.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement