एक्स्प्लोर

बिहार निवडणूक निकाल 2025

(Source:  ECI | ABP NEWS)

Phaltan Doctor Case: फलटणमधील डॉक्टर तरुणीने जीवन संपवण्याआधी फोटो काढला; लटकवलेल्या ओढणीचा सेल्फी प्रशांत बनकरला पाठवला, नेमकं काय घडलं?

फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर तरुणीच्या मृत्युमुळे राज्यभरात एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणी महत्वाची अपडेट समोर आली आहे.

Phaltan Doctor Death : फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर तरुणीच्या मृत्युमुळे राज्यभरात एकच खळबळ उडाली होती. पोलीस अधिकारी गोपाळ बदने (Gopal Badne) आणि स्थानिक खासदाराच्या पीएने दबाव आणल्यामुळे आत्महत्येचे पाऊल उचलल्याचे तरुणीने हातावरील सुसाईड नोटमध्ये (Suicide News) लिहून ठेवले होते. या तरुणीने फलटण येथील हॉटेल मधुदीपमधील (Hotel Madhudeep) एका खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या प्रकरणातील महत्वाची अपडेट समोर आली आहे. 
मृत डॉक्टरने आत्महत्या करण्याआधी लटकवलेल्या ओढणीचा सेल्फी संशयित आरोपी प्रशांत बनकरच्या मोबाईलवर पाठवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 

प्रशांत बनकरच्या मोबाईल मधून फोटो पोलिसांना मिळाले

महिला डॉक्टरने आत्महत्या करण्याआधी लटकवलेल्या ओढणीचा सेल्फी संशयित आरोपी प्रशांत बनकरच्या मोबाईलवर पाठवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. प्रशांत बनकरच्या मोबाईल मधून हे फोटो पोलिसांना मिळाले आहेत. महिला डॉक्टरने मृत्यू होण्याआधी प्रशांत बनकरसोबत व्हाट्सअप चॅटिंग केले होते. त्यावेळी तिने लटकवलेल्या ओढणीचा सेल्फी पाठवला होता. प्रशांत बनकरचा मोबाईल पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर डिजिटल तपासणी करण्यात आली यावेळी हा फोटो पोलिसांच्या समोर आला आहे अशी विश्वसनीय सूत्रांनी माहिती दिली आहे.

डॉक्टरचे व्हाट्सअप चॅट डिलीट झाल्याचा नातेवाईकांचा आरोप 

फलटण येथील डॉक्टर आत्महत्या प्रकरणात डॉक्टरचे व्हाट्सअप चॅट डिलीट झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला होता. याबाबत पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांनी मिळालेले सर्व डिजिटल पुराव्याची सायबर टीममार्फत तपासणी सुरू केली आहे. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांनी केले आहे. गेल्या काही दिवसांपासून सातारा जिल्ह्यातील फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयात काम करणाऱ्या महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरु आहे. या प्रकरणामुळे संपूर्ण देशात संतापाची लाट पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी महिला डॉक्टरला न्याय मिळवून देण्यासाठी आंदोलन करण्यात आले. आता या प्रकरणातील महत्त्वाची माहिती समोर आली आहे. 

साताऱ्याच्या फलटणमध्ये एका महिला डॉक्टरच्या आत्महत्येची धक्कादायक घटना समोर आली आहे. या डॉक्टरच्या तळहातावर एक सुसाईड नोट लिहिलेली आढळली ज्यात तिने एका पोलीस अधिकाऱ्यासह आणखी एका व्यक्तीवर लैंगिक आणि मानसिक छळाचे गंभीर आरोप केलेत. या घटनेनंतर राज्यात महिला सुरक्षेबाबत पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. सातारा पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. ही महिला डॉक्टर गुरुवारी फलटणमधल्या हॉटेलमध्ये गेली आणि तिथेच तिने आत्महत्या केली. तिने आपल्या हातावर सुसाईड नोट लिहिली होती ज्यात एका पोलीस अधिकाऱ्याने तिच्यावर चार वेळा बलात्कार केल्याचा, तर दुसऱ्या व्यक्तीने शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचा उल्लेख आहे.

महत्वाच्या बातम्या:

Satara Doctor Suicide : तुमच्या 50 कोटीच्या धमकीला भीक घालत नाही, रणजितसिंह निंबाळकरांविरोधात सगळे पुरावे; सुषमा अंधारेंनी सगळ्यांची नावे घेतली

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bihar Election Result 2025: बिहार निवडणुकीत राजदच्या दारुण पराभवानंतर लालू यादवांच्या कुटुंबात वादळ! बापासाठी किडनी दिलेल्या लेकीचा तडकाफडकी निर्णय
बिहार निवडणुकीत राजदच्या दारुण पराभवानंतर लालू यादवांच्या कुटुंबात वादळ! बापासाठी किडनी दिलेल्या लेकीचा तडकाफडकी निर्णय
Raj Thackeray: क्रिकेटसाठी शक्य ती मदत करणार, राज ठाकरेंचा MCA ला शब्द; 20 वर्षानंतर प्रत्यक्ष भेटले मिलिंद नार्वेकर
Raj Thackeray: क्रिकेटसाठी शक्य ती मदत करणार, राज ठाकरेंचा MCA ला शब्द; 20 वर्षानंतर प्रत्यक्ष भेटले मिलिंद नार्वेकर
Bihar Election Result 2025 Rahul Gandhi: राहुल गांधींनी तलावात उडी मारली, मच्छीमारी केली; बिहारच्या बेगुसराय मतदारसंघात निकाल काय लागला?
राहुल गांधींनी तलावात उडी मारली, मच्छीमारी केली; बिहारच्या बेगुसराय मतदारसंघात निकाल काय लागला?
Video: अशोक सराफांसमोरच अभिनेत्री निवेदिता सराफ म्हणाल्या मी कट्टर बीजेपी; आमदार संजय केळकर म्हणाले...
Video: अशोक सराफांसमोरच अभिनेत्री निवेदिता सराफ म्हणाल्या मी कट्टर बीजेपी; आमदार संजय केळकर म्हणाले...
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Kothrud Girl Case : मुलींना शिवीगाळ करणाऱ्या मुलींना सस्पेंड करा, प्रकाश आंबेडकरांचा आरोप
Ahilyanagar Leopard : आता गळ्यात पट्टे घालून फिरावं का? बिबट्याच्या हल्ल्यात वाढ, गावकऱ्यांचा संताप
Faridabad Big Breaking : फरीदाबादमधून जप्त केलेल्या स्फोटकांचा नौगाममध्ये स्फोट, 9 जणांचा मृत्यू
Devendra Fadnavis on Sharad Pawar : पराभवाचं विरोधकांनी आत्मचिंतन करावं, फडणवीसांची पवारांवर टीका
Devendra Fadnavis on Sharad Pawar : जो जीता वही सिकंदर, पराभव स्वीकारा! फडणवीसांचे पवारांना प्रत्युत्तर; मुंबईचा महापौर महायुतीचाच होणार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bihar Election Result 2025: बिहार निवडणुकीत राजदच्या दारुण पराभवानंतर लालू यादवांच्या कुटुंबात वादळ! बापासाठी किडनी दिलेल्या लेकीचा तडकाफडकी निर्णय
बिहार निवडणुकीत राजदच्या दारुण पराभवानंतर लालू यादवांच्या कुटुंबात वादळ! बापासाठी किडनी दिलेल्या लेकीचा तडकाफडकी निर्णय
Raj Thackeray: क्रिकेटसाठी शक्य ती मदत करणार, राज ठाकरेंचा MCA ला शब्द; 20 वर्षानंतर प्रत्यक्ष भेटले मिलिंद नार्वेकर
Raj Thackeray: क्रिकेटसाठी शक्य ती मदत करणार, राज ठाकरेंचा MCA ला शब्द; 20 वर्षानंतर प्रत्यक्ष भेटले मिलिंद नार्वेकर
Bihar Election Result 2025 Rahul Gandhi: राहुल गांधींनी तलावात उडी मारली, मच्छीमारी केली; बिहारच्या बेगुसराय मतदारसंघात निकाल काय लागला?
राहुल गांधींनी तलावात उडी मारली, मच्छीमारी केली; बिहारच्या बेगुसराय मतदारसंघात निकाल काय लागला?
Video: अशोक सराफांसमोरच अभिनेत्री निवेदिता सराफ म्हणाल्या मी कट्टर बीजेपी; आमदार संजय केळकर म्हणाले...
Video: अशोक सराफांसमोरच अभिनेत्री निवेदिता सराफ म्हणाल्या मी कट्टर बीजेपी; आमदार संजय केळकर म्हणाले...
Bihar Election Result 2025: पवार म्हणाले, सत्ताधाऱ्यांनी महिलांना पैसे वाटले, फडणवीस म्हणतात, चांगल्या योजना आणायला तुम्हाला कोणी रोखलं, जो जीता वही सिकंदर!
पवार म्हणाले, सत्ताधाऱ्यांनी महिलांना पैसे वाटले, फडणवीस म्हणतात, चांगल्या योजना आणायला तुम्हाला कोणी रोखलं, जो जीता वही सिकंदर!
Train Ticket Booking Rules: लोअर बर्थ मिळण्यासाठी धडपडताय? रेल्वने तिकीट बुकिंगचे नियम बदलले, कुणाला होणार फायदा? जाणून घ्या A टू Z माहिती
लोअर बर्थ मिळण्यासाठी धडपडताय? रेल्वने तिकीट बुकिंगचे नियम बदलले, कुणाला होणार फायदा? जाणून घ्या A टू Z माहिती
Local Body Election: निवडणुकीत ओबीसींना कमी आरक्षण मिळालं, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा दावा; म्हणाले, निवडणूक आयोगाने फेरविचार करावा, अन्यथा...
निवडणुकीत ओबीसींना कमी आरक्षण मिळालं, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा दावा; म्हणाले, निवडणूक आयोगाने फेरविचार करावा, अन्यथा...
Nashik Leopard Attack: एका बिबट्याने सात जणांना जखमी केलं, तोपर्यंत दुसरा बिबट्या आला पळा पळा अफवा पसरली; नेमकं काय घडलं?
एका बिबट्याने सात जणांना जखमी केलं, तोपर्यंत दुसरा बिबट्या आला पळा पळा अफवा पसरली; नेमकं काय घडलं?
Embed widget