एक्स्प्लोर

Satara Doctor Suicide : तुमच्या 50 कोटीच्या धमकीला भीक घालत नाही, रणजितसिंह निंबाळकरांविरोधात सगळे पुरावे; सुषमा अंधारेंनी सगळ्यांची नावे घेतली

Phaltan Doctor Suicide : रणजितसिंह निंबाळकरांच्या धमक्यांना मी घाबरत नाही. तुम्ही मला धमक्या द्या, मी तुमचा रोज एक एपीसोड बाहेर काढते असं जाहीर आव्हान ठाकरेंच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी दिलं.

मुंबई : फलटणमध्ये झालेल्या महिला डॉक्टरच्या आत्महत्येमागे कोण-कोण सहभागी आहे याचे सर्व पुरावे आमच्याकडे आहेत. रणजितसिंह निंबाळकरांनी (Ranjitsingh Nimbalkar) 50 कोटींच्या बदनामीच्या खटल्याला भीक घालणार नाही, तुम्हाला काय करायचं ते करा असं जाहीर आव्हान शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी दिलं. फलटणमधील पोलीस ठाणे म्हणजे छळछावणी झाले आहे, या आधीही आगवणे बहिणींनी त्यांच्या पत्रात माजी खासदार निंबाळकरांचे नाव अनेकदा घेतलं आहे, त्यावर महिला आयोग आणि सरकारने काय कारवाई केली? असा सवालही सुषमा अंधारे यांनी केला.

साताऱ्यातील महिला डॉक्टरने आत्महत्या केल्यानंतर तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवण्याचा प्रयत्न केला जात आहे. महिला आयोगाने मृत मुलीचे दोन तीन मुलांशी केलेले चॅट दाखवले. मग चॅट केले म्हणून तिला मारण्याचा अधिकार तुम्हाला कुणी दिला? असा प्रश्नही सुषमा अंधारे यांनी विचारला.

Sushma Andhare PC : काय करायचं ते करा, अंधारेंचे आव्हान

सुषमा अंधारे यांनी या आधीही साताऱ्यातील महिला डॉक्टरच्या आत्महत्येवर प्रश्न उपस्थित करत माजी खासदार रणजितसिंह निंबाळकरांचे नाव घेतलं होतं. त्यानंतर निंबाळकरांच्या वकिलांनी सुषमा अंधारे यांच्याविरोधात 50 कोटी रुपयांचा अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचं सांगितलं होतं. त्यावर सुषमा अंधारे म्हणाल्या की, तुमच्या 50 कोटीच्या धमकीला भीक घालत नाही. तुम्हाला काय करायचं ते करा.

या प्रकरणात रणजितसिंह निंबाळकरांचा संबंध आहे असं आपण कुठेही म्हटलं नाही. पण त्यामध्ये ज्यांची नावं आली आहेत त्यांना चौकशीच्या कक्षेत घ्या अशी मागणी आपण केल्याचं सुषमा अंधारे म्हणाल्या. तसेच रणजितसिंह निंबाळकरांचे दोन पीए, सहायक पोलीस निरीक्षक जायपात्रे, पीएसाय पाटील, बँक ऑफ इंडिया शाखेचे किरण डुकरे या सगळ्यांची चौकशी करा अशी मागणी अंधारे यांनी केली.

Sushma Andhare On Ranjitsingh Nimbalkar : दबाव टाकून खोटे गुन्हे दाखल केले

दिगंबर आवगणे यांच्यावर निंबाळकरांनी फसवण्याचा प्रयत्न केला असा आरोप आगवणेंच्या दोन्ही मुलींनी केला आणि त्यांनी आत्महत्याही करण्याचा प्रयत्न केला असा आरोप सुषमा अंधारे म्हणाल्या. त्या म्हणाल्या की, "अनेक गुन्हे हे रणजितसिंह निंबाळकर यांच्या प्रभावाने दाखल होतात असा आरोप मी केला होता. या प्रकरणी दोन मुलींनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. त्यांनी त्यावेळी सुसाईड नोट लिहली होती. त्यामध्ये त्यांनी रणजितसिंह निंबाळकर यांचे नाव घेतले होते. त्या बहिणींनी लिहिलेल्या पत्रात संतोष नावाच्या निंबाळकरांच्या कार्यकर्त्याने केस टाकली. त्यावर बाळ मी काही करू शकत नाही, आमच्यावर खासदार रणजितदादांचा दबाव असल्याचं त्यांनी सांगितलं.

Sushma Andhare On Rupali Chakankar : रुपाली चाकणकरांनी निशाणा

सुषमा अंधारे यांनी यावेळी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांवर टीका केली. त्या म्हणाल्या की, "महिला आयोगाच्या कामावर काही बोलण्यासारखं उरलंच नाही. कुणाचं तरी राजकीय पुनर्वसन करण्यासाठी त्या ठिकाणी नियुक्ती केली जाते. त्या आयोगाने साताऱ्यातील महिला डॉक्टरला न्याय देण्याऐवजी तिच्या चारित्र्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. रुपाली चाकणकरांनी रणजितसिंह निंबाळकरांच्या बाजूने पत्रकार परिषद घेतल्याचं दिसतंय."

वर्षा आगवणे आणि हर्षा आगवणे यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्याच्या आधी त्यांनी 8 नोव्हेंबर 2022 रोजी सुसाईड नोट लिहिली. खासदार रणजित निंबाळकरांच्या दबावामुळे, खोटे गु्न्हे दाखल केल्यामुळे आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. हे सगळं समोर असताना महिला आयोगाने त्यावर काहीच कारवाई का केली नाही असा प्रश्न सुषमा अंधारे यांनी विचारला.

संबंधित मुलीने कुणाशीतरी चॅट केलं याची माहिती तुम्ही देत आहात. मग तिने चॅट केलं म्हणून तिला मारायचा अधिकार तुम्हाला कुणी दिला? असे अनेक चॅट पोलीस अधिकाऱ्यांनीही केले आहेत, त्याचे अनेक पुरावे आहेत. त्यावर तुम्ही काय केलं असा प्रश्न अंधारे यांनी महिला आयोगाला विचारला.

मुख्यमंत्र्यांनी रणजित निंबाळकरांना क्लिन चिट दिल्यानंतर त्यांची मर्जी राखण्यासाठी महिला आयोगाने पत्रकार परिषद घेतली. सुनील तटकरेंना मला सांगायचं आहे, यांना जरा आवरा. महिला आयोगाच्या अध्यक्षपदी चुकीची माणसं नेमून पक्षाची वाट लावू नका.

Sushma Andhare On Phaltan Doctor Suicide : पोलीस ठाणे छळछावणी

परळीनंतर आता फलटणचे पोलीस स्टेशन हे छळछावणी झाल्याचा आरोप सुषमा अंधारे यांनी केला. त्यामुळे लोकांचा कायदा आणि सुव्यवस्थेवरचा विश्वास उडण्याचा धोका आहे असंही त्या म्हणाल्या. तुम्ही मला धमक्या द्या, मी तुमचा आणखी एक एपीसोड दाखवतो. मी तुमची एकेक सिरीज बाहेर काढणार. मला पैसा आणि सत्तेची हाव असती तर मी सत्ताधाऱ्यांसोबत असते. पण मला सत्यासोबत राहायचं आहे असं म्हणत सुषमा अंधारे यांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर आव्हान दिलं.

ही बातमी वाचा:

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Palghar : मॅरेथॉनमध्ये तृतीय क्रमांक पटकावला, पण धाप लागल्याने दहावीच्या विद्यार्थिनीला मृत्यूने कवटाळले, पालघरमधील घटना
मॅरेथॉनमध्ये तृतीय क्रमांक पटकावला, पण धाप लागल्याने दहावीच्या विद्यार्थिनीला मृत्यूने कवटाळले, पालघरमधील घटना
Donald Trump : आमच्या तेल कंपन्यांना त्यांनी बाहेर फेकलं, अमेरिकेच्या व्हेनेझुएलावरील हल्ल्यानंतर ट्रम्प यांचा व्हिडिओ व्हायरल 
आमच्या तेल कंपन्यांना त्यांनी बाहेर फेकलं,व्हेनेझुएलावरील हल्ल्यानंतर ट्रम्प यांचा व्हिडिओ व्हायरल 
सदानंद दातेंनी स्वीकारला पोलीस महासंचालकपदाचा पदभार; 26/11 मध्ये दहशतवाद्यांशी लढणारे डॅशिंग अधिकारी
सदानंद दातेंनी स्वीकारला पोलीस महासंचालकपदाचा पदभार; 26/11 मध्ये दहशतवाद्यांशी लढणारे डॅशिंग अधिकारी
एबी फॉर्म गिळलेल्या उमेदवाराची माघार, मग मच्छिंद्र ढवळेंचा अर्ज मंजूर कसा? निवडणूक आयोगानेच सांगितलं
एबी फॉर्म गिळलेल्या उमेदवाराची माघार, मग मच्छिंद्र ढवळेंचा अर्ज मंजूर कसा? निवडणूक आयोगानेच सांगितलं
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Solapur Funeral : MNS पदाधिकाऱ्याची अंत्ययात्रा, हजारोनागरिक सहभागी, कडेकोट पोलीस बंदोबस्त
Ravindra Chavan on Ajit Pawar : अजित पवार खुद के गिरेबान झाक कर देखिए, रविंद्र चव्हाणांचा थेट इशारा
Akola BJP : भाजपकडून वीज बिल वाटणाऱ्या तरुणाला थेट उमेदवारी, गरीब कुटुंब रातोरात आलं चर्चेत
Panvel Election : पनवेलमध्ये भाजपला मोठा धक्का, स्नेहा शेंडेंची माघार, अपक्ष उमेदवार बिनविरोध निवडून
Sachin Sawant : फडणवीसांचा मेट्रोमध्येबसून मुलाखत,निवडणूक आयोग कारवाई करणार का?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Palghar : मॅरेथॉनमध्ये तृतीय क्रमांक पटकावला, पण धाप लागल्याने दहावीच्या विद्यार्थिनीला मृत्यूने कवटाळले, पालघरमधील घटना
मॅरेथॉनमध्ये तृतीय क्रमांक पटकावला, पण धाप लागल्याने दहावीच्या विद्यार्थिनीला मृत्यूने कवटाळले, पालघरमधील घटना
Donald Trump : आमच्या तेल कंपन्यांना त्यांनी बाहेर फेकलं, अमेरिकेच्या व्हेनेझुएलावरील हल्ल्यानंतर ट्रम्प यांचा व्हिडिओ व्हायरल 
आमच्या तेल कंपन्यांना त्यांनी बाहेर फेकलं,व्हेनेझुएलावरील हल्ल्यानंतर ट्रम्प यांचा व्हिडिओ व्हायरल 
सदानंद दातेंनी स्वीकारला पोलीस महासंचालकपदाचा पदभार; 26/11 मध्ये दहशतवाद्यांशी लढणारे डॅशिंग अधिकारी
सदानंद दातेंनी स्वीकारला पोलीस महासंचालकपदाचा पदभार; 26/11 मध्ये दहशतवाद्यांशी लढणारे डॅशिंग अधिकारी
एबी फॉर्म गिळलेल्या उमेदवाराची माघार, मग मच्छिंद्र ढवळेंचा अर्ज मंजूर कसा? निवडणूक आयोगानेच सांगितलं
एबी फॉर्म गिळलेल्या उमेदवाराची माघार, मग मच्छिंद्र ढवळेंचा अर्ज मंजूर कसा? निवडणूक आयोगानेच सांगितलं
पोलीस बंदोबस्तात मनसे पदाधिकाऱ्याची अंत्ययात्रा, मोठी गर्दी; शहरात तणाव, राजकीय वादातून हत्या
पोलीस बंदोबस्तात मनसे पदाधिकाऱ्याची अंत्ययात्रा, मोठी गर्दी; शहरात तणाव, राजकीय वादातून हत्या
Venezuela : राष्ट्रपती निकोलस मादुरो अमेरिकेच्या ताब्यात, व्हेनेझुएलाचं नेतृत्त्व कोण करणार? नाव आघाडीवर असलेल्या डेल्सी रॉड्रिग्ज नेमक्या कोण?
राष्ट्रपती निकोलस मादुरो अमेरिकेच्या ताब्यात, व्हेनेझुएलाचं नेतृत्त्व कोण करणार? डेल्सी रॉड्रिग्ज यांचं नाव आघाडीवर
बीडमध्ये सह्याद्री वनराईला दुसऱ्यांदा आग, सयाजी शिंदेंचा संताप; अजित पवारांना भेटणार, काय म्हणाले शिंदे
बीडमध्ये सह्याद्री वनराईला दुसऱ्यांदा आग, सयाजी शिंदेंचा संताप; अजित पवारांना भेटणार, काय म्हणाले शिंदे
Team India Squad Against New Zealand ODI: न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी टीम इंडिया जाहीर; दोघांची घरवापसी, पण मोहम्मद शमीकडे पुन्हा दुर्लक्ष!
न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी टीम इंडिया जाहीर; दोघांची घरवापसी, पण मोहम्मद शमीकडे पुन्हा दुर्लक्ष!
Embed widget