(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Petrol and Diesel price | सलग नवव्या दिवशी पेट्रोल डिझेलचे भाव स्थिर
मुंबईत आज पेट्रोलची किंमत (Petrol and Diesel price) 97.57 इतकी आहे तर डिझेलची किंमत ही 88.60 इतकी आहे. गेल्या नऊ दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती स्थिर आहेत.
नवी दिल्ली : गेल्या काही दिवसात सातत्याने वाढत चाललेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती सलग नवव्या दिवशी स्थिर आहेत. त्यामध्ये कोणतीही भाव वाढ न झाल्याने सामान्यांना काही अंशी दिलासा मिळाला आहे. मुंबईत आज पेट्रोलची किंमत 97.57 इतकी आहे तर डिझेलची किंमत ही 88.60 इतकी आहे. दिल्लीमध्ये हाच दर अनुक्रमे 31.17 आणि 81.47 रुपये इतकी आहे.
1 जुलै 2017 पासून देशात इंधनाचे दर रोज बदलण्यास सुरुवात झाली. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती आता भारतातील तेल कंपन्या ठरवतात. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती आता दर दिवशी सकाळी सहा वाजता बदलतात.
सध्या केंद्र सरकारकडून पेट्रोलवर 32.98 प्रति लिटर तर डिझेलवर 31.83 रुपये प्रती लिटर इतका कर लागतो. आता यावरच कर थांबत नाही. राज्य सरकार त्यावर वेगळा कर लावते. महाराष्ट्र सरकार पेट्रोलच्या किंमतीवर 25 टक्के व्हॅट लावते तर डिझेलवर 21 टक्के व्हॅट लावते. आता यावरही अधिकचा सेस लावला जातो. पेट्रोलवर 10 रुपये प्रती लिटर तर डिझेलवर 3 रुपये प्रति लिटर इतका सेस लावण्यात येतो.
जगातल्या तेल उत्पादक देशांची संघटना असलेल्या OPEC देशांनी कच्च्या तेलाच्या उत्पादनात कोणतीही वाढ न करण्याचा निर्णय घेतलाय. सध्या ज्या प्रमाणात उत्पादन घेण्यात येतंय तेवढाच उत्पादनाचा स्तर राखण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्चा तेलाच्या किंमती लवकरच कमी होतील हा आशाही धुसर झाली आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या या कच्च्या तेलाच्या किंमती वाढीचा परिणाम हा देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढीवर होण्याची शक्यता आहे.
देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती या शंभरी पार होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. पण गेल्या नऊ दिवसांपासून यामध्ये कोणातही बदल न झाल्याने सामान्यांना काही अंशी दिलासा मिळाला आहे.
Maharashtra Budget, Fuel Price: पेट्रोल-डिझेलवरील कर केंद्रानेच कमी करावेत : अजित पवार
Diesel,petrol, fuel price
इंधन किंमत, पेट्रोल, डिझेल