एक्स्प्लोर

Petrol and Diesel price | पेट्रोल डिझेलच्या किंमतीत कोणतीही वाढ नाही, सलग तेराव्या दिवशी किंमती स्थिर

मुंबईत आज पेट्रोलची (Petrol) किंमत 97.57 रुपये इतकी आहे तर डिझेलची (Diesel) किंमत ही 88.60 रुपये इतकी आहे. दिल्लीमध्ये हाच दर अनुक्रमे 91.17 आणि 81.47  रुपये इतकी आहे. 

मुंबई : देशात सलग 13 व्या दिवशी  पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती स्थिर राहिल्याचं दिसून आलंय. गेल्या काही दिवसातील इंधनाच्या दरात झालेली वाढ पाहता त्या कधीही शंभरी पार करु शकतात अशी धाकधूक सामान्यांना होती. त्यातच आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किंमतीमध्ये वाढ झाल्याने भारतातही पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढताना दिसत होत्या. बुधवारी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमध्ये कोणतीही वाढ न झाल्याने सामान्यांना काही अंशी दिलासा मिळाला आहे. मुंबईत आज पेट्रोलची किंमत 97.57 रुपये इतकी आहे तर डिझेलची किंमत ही 88.60 रुपये इतकी आहे. दिल्लीमध्ये हाच दर अनुक्रमे 91.17 आणि 81.47  रुपये इतकी आहे. 

सध्या केंद्र सरकारकडून पेट्रोलवर 32.98 प्रति लिटर तर डिझेलवर 31.83 रुपये प्रती लिटर इतका कर लागतो. आता यावरच कर थांबत नाही. राज्य सरकार त्यावर वेगळा कर लावते. महाराष्ट्र सरकार पेट्रोलच्या किंमतीवर 25 टक्के व्हॅट लावते तर डिझेलवर 21 टक्के व्हॅट लावते. आता यावरही अधिकचा सेस लावला जातो. पेट्रोलवर 10 रुपये प्रती लिटर तर डिझेलवर 3 रुपये प्रति लिटर इतका सेस लावण्यात येतो. त्यामुळे देशात पेट्रोल-डिझेलचे दर वाढताना दिसत आहेत.

देशातील प्रमुख शहरातील इंधनाचे दर

मुंबई
पेट्रोल- 97.57 रुपये/लिटर
डिझेल- 88.60 रुपये/लिटर

दिल्ली 
पेट्रोल- 91.17 रुपये/लिटर
डिझेल- 81.47 रुपये/लिटर

राज्यात मुंबई येथे पहिल्यांदा आढळला मोनोलिथ, जाणून घ्या काय आहे मोनोलिथ?

कोलकाता
पेट्रोल- 91.35 रुपये/लिटर
डिझेल- 84.35 रुपये/लिटर

चेन्नई
पेट्रोल- 93.11 रुपये/लिटर
डिझेल- 86.45 रुपये/लिटर

रोज बदलतात पेट्रोल-डिझेलचे दर
देशात 15 जून  2017 पासून इंधनाचे दर रोज बदलण्यास सुरुवात झाली. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती आता भारतातील तेल कंपन्या ठरवतात. आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रत्येक क्षणाला तेलाच्या किंमती बदलत असतात. त्यामुळे देशात आता पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती दर दिवशी सकाळी सहा वाजता बदलतात. 

पेट्रोल आणि डिझेलचे दर कुठे आणि कसे पाहाल?
इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर तीन सोप्या पद्धतीने पाहता येतील.

तुम्ही तुमच्या जिल्हाचं, तालुक्याचं लोकेशन सिलेक्ट करुन किंवा पेट्रोल पंपाचं नाव https://associates.indianoil.co.in/PumpLocator/ या लिंकवर टाकून इंधनाचे दर काय आहेत याची माहिती घेऊ शकता.

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती एसएमएसद्वारे देखील कळू शकते. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल. (शहरांचे कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर देण्यात आले आहेत)

इंडियन ऑईलचं IndianOil ONE Mobile App तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता.

संजय राठोडच्या जागी मला मंत्री करा!, हरिभाऊ राठोड यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र



 


 

 

महत्त्वाच्या बातम्या

राज ठाकरेंना काय ढेकळं कळतात का? आता हलगी वाजवणारे झालेत; गुणरत्न सदावर्तेंची अमित ठाकरेंवरही टीका
राज ठाकरेंना काय ढेकळं कळतात का? आता हलगी वाजवणारे झालेत; गुणरत्न सदावर्तेंची अमित ठाकरेंवरही टीका
Sharad Pawar: बुद्धिबळाचा पट समोर येताच पवारांनी बरोबर राजा अन् वजीरालाच हात घातला, बारामतीमधील 'तो' व्हिडीओ व्हायरल
बुद्धिबळाचा पट समोर येताच पवारांनी बरोबर राजा अन् वजीरालाच हात घातला, बारामतीमधील 'तो' व्हिडीओ व्हायरल
Maharashtra Live blog updates: मुंबईत पुन्हा झाड कोसळले; पवई IIT मार्केटमध्ये कारचे नुकसान, चालक किरकोळ जखमी
मुंबईत पुन्हा झाड कोसळले; पवई IIT मार्केटमध्ये कारचे नुकसान, चालक किरकोळ जखमी
Ravi Rana: पंधरा दिवसात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील, सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री, तर दोन्ही शिवसेना...; आमदार रवी राणांच्या भविष्यवाणीनं भुवया उंचावल्या!
पंधरा दिवसात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील, सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री, तर दोन्ही शिवसेना...; आमदार रवी राणांच्या भविष्यवाणीनं भुवया उंचावल्या!

व्हिडीओ

Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले
NCP Inside Story : राष्ट्रवादीचे बडे नेते-फडणवीसांच्या भेटीबाबत सुनेत्रा पवार अंधारात?
Zero Hour Full : मतदार पुनर्रचवेवरुन देशात नवं राजकारण, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
NCP Merger News : राष्ट्रवादीचं विलिनीकरण की पवारांच्या पक्षात फूट? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Corona Virus Update: आता कोणत्या राज्यात कोरोनानं डोकं वर काढलं? अवघ्या 21 दिवसात 12 जण बाधित अन् 4 जणांचा जीव गेला!
आता कोणत्या राज्यात कोरोनानं डोकं वर काढलं? अवघ्या 21 दिवसात 12 जण बाधित अन् 4 जणांचा जीव गेला!
राज ठाकरेंना काय ढेकळं कळतात का? आता हलगी वाजवणारे झालेत; गुणरत्न सदावर्तेंची अमित ठाकरेंवरही टीका
राज ठाकरेंना काय ढेकळं कळतात का? आता हलगी वाजवणारे झालेत; गुणरत्न सदावर्तेंची अमित ठाकरेंवरही टीका
FDA Raids Parsi Dairy: भिंतीवर बुरशी, माशा अन् उंदरांचा सुळसुळाट, तुकाराम मुंढेंच्या एफडीएने पारशी डेअरीचा परवाना निलंबित का केला?
भिंतीवर बुरशी, माशा अन् उंदरांचा सुळसुळाट, तुकाराम मुंढेंच्या एफडीएने पारशी डेअरीचा परवाना निलंबित का केला?
Sharad Pawar: बुद्धिबळाचा पट समोर येताच पवारांनी बरोबर राजा अन् वजीरालाच हात घातला, बारामतीमधील 'तो' व्हिडीओ व्हायरल
बुद्धिबळाचा पट समोर येताच पवारांनी बरोबर राजा अन् वजीरालाच हात घातला, बारामतीमधील 'तो' व्हिडीओ व्हायरल
Maharashtra Weather Rain Updates: अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा, राज्यात पुन्हा धो धो पाऊस कोसळणार; कोकणात पावसाला सुरुवात, मान्सूनची A टू Z माहिती
अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा, राज्यात पुन्हा धो धो पाऊस कोसळणार; कोकणात पावसाला सुरुवात, मान्सूनची A टू Z माहिती
Ratnagiri News: दापोलीच्या हर्णे राजवाडीत पुन्हा दरडीचे भीषण संकट, बेकायदेशीर उत्खननामुळे 60 कुटुंबे धोक्यात; 2010 च्या 8 बळींच्या आठवणीने ग्रामस्थ धास्तावले
दापोलीच्या हर्णे राजवाडीत पुन्हा दरडीचे भीषण संकट, बेकायदेशीर उत्खननामुळे 60 कुटुंबे धोक्यात; 2010 च्या 8 बळींच्या आठवणीने ग्रामस्थ धास्तावले
धक्कादायक घटना, वरिष्ठांचा जाचाला कंटाळून ZP शिक्षकाची दोन मुलं अन् गाडीसह नदीपात्रात उडी; व्हॉट्सअपला स्टेटस
धक्कादायक घटना, वरिष्ठांचा जाचाला कंटाळून ZP शिक्षकाची दोन मुलं अन् गाडीसह नदीपात्रात उडी; व्हॉट्सअपला स्टेटस
Sonam Wangchuk: सोनम वांगचुक म्हणाले, 'सोमवारपर्यंत जिवंत राहायचंय..' उपोषण सुरू ठेवल्यास अवयव निकामी होण्याचा धोका, परिस्थिती गंभीर असल्याचा डॉक्टरांचा इशारा
सोनम वांगचुक म्हणाले, 'सोमवारपर्यंत जिवंत राहायचंय..' उपोषण सुरू ठेवल्यास अवयव निकामी होण्याचा धोका, परिस्थिती गंभीर असल्याचा डॉक्टरांचा इशारा
Embed widget