एक्स्प्लोर

महायुती सरकारला दे धक्का; राज्यपाल नियुक्त 12 आमदारांबाबत कोर्टाचा मोठा निर्णय

Governor Nominated MLC : राज्यपाल नामनिर्देशित 12 आमदारांच्या नियुक्तीबाबत कोर्टाने मोठा निर्णय घेतला आहे. हा महायुती सरकारला मोठा धक्का मानला जात आहे.

मुंबई : राज्यपाल नामनिर्देशित 12 आमदारांच्या नियुक्तीबाबतची (Appointment of 12 MLAs nominated by Governor) याचिका 1 ऑक्टोबरपर्यंत तहकूब करण्यात आली आहे. पुढील सुनावणीपर्यंत नियुक्त्या न करण्याचे निर्देश देण्याची विनंती याचिकाकर्त्यांनी कोर्टाकडे केली आहे. ज्या नियुक्त्या दोन वर्षात झाल्या नाहीत त्या काही लगेच होणार नाहीत, असे म्हणत मुख्य न्यायमूर्तींनी याचिकाकर्त्यांना दिलासा दिला आहे. आता राज्यपाल नामनिर्देशित 12 आमदारांची नियुक्ती रखडल्याने महायुती सरकारसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. 

महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारच्या काळात या 12 आमदारांच्या नियुक्तीसाठी तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांना यादी देण्यात आली होती. कोश्यारी यांनी या नियुक्त्या अडवून धरल्या होत्या. याबाबत शिवसेना ठाकरे गटाचे (Shiv Sena Thackeray Group) कोल्हापूर शहरप्रमुख सुनील मोदी (Sunil Modi) यांनी हायकोर्टात (High Court) याचिका दाखल केली आहे. 

ठाकरे गटाची हायकोर्टात याचिका 

जून 2020 मध्ये महाविकास आघाडी सरकारने बारा आमदारांची नियुक्ती करण्यासाठी राज्यपालांना शिफारस केली होती. मात्र, तत्कालीन राज्यपालांनी ती यादी मंजूर केली नाही. तसंच ती यादी फेटाळलीही नाही. त्यानंतर याप्रकरणी न्यायालयीन वाद सुरू झाला. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर महायुती सरकारनं पूर्वीच्या सरकारनं शिफारस केलेली यादी मागे घेतली. तसेच आपली नवीन यादी राज्यपालांकडे पाठवली. हा निर्णय बेकायदा असून महाविकास आघाडीनं दिलेल्या यादीनुसार आमदारांची नियुक्ती करा अन्यथा ही यादी मागे घेण्याचे सविस्तर कारण द्या, अशी मागणी याचिकेतून करण्यात आली आहे.

'त्या' नियुक्त्या काही लगेच होणार नाहीत 

पुढील सुनावणीपर्यंत नियुक्त्या न करण्याचे निर्देश देण्याची विनंती याचिकाकर्त्यांकडून कोर्टात कोर्टात आली आहे. ज्या नियुक्त्या दोन वर्षात झाल्या नाहीत त्या काही लगेच होणार नाहीत, असा दिलासा मुख्य न्यायमूर्तींना याचिकाकर्त्यांना दिला आहे. तर दुसरीकडे राज्य सरकारचा या याचिकेस विरोध आहे. यादी मागे घेणं हा राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतलेला निर्णय असल्याचे स्पष्टीकरण राज्य सरकारने दिले आहे. 

राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या नियुक्त्या कधी होणार?

दरम्यान,  विधानपरिषदेतील 12 आमदार राज्यपालांद्वारे नियुक्त केले जात असतात. महाविकास आघाडीचे 12 आमदारांच्या नावांची यादी राज्यपालांकडे पाठवली होती. त्यानंतर सरकार बदलले आणि त्यांनी ही यादी परत पाठवली. शिवाय नवीन यादी देण्यासही त्यांनी सुचवले होते. आता या नियुक्त्या नेमक्या कधी होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

आणखी वाचा

C. P. Radhakrishnan : राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या निवडीबाबत सी पी राधाकृष्णन यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mamata Bannerjee: मी दोन तास वाट पाहिली, मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास तयार; ममता बॅनर्जींकडून जनतेची माफी
मी दोन तास वाट पाहिली, मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास तयार; ममता बॅनर्जींकडून जनतेची माफी
तृतीयपंथीयांचा धुमधडाक्यात गणपती बाप्पा; भक्तीगीतांसह गणरायाकडे केलीय खास प्रार्थना
तृतीयपंथीयांचा धुमधडाक्यात गणपती बाप्पा; भक्तीगीतांसह गणरायाकडे केलीय खास प्रार्थना
Sanjay Raut: सोलापुरातील जागेवर काँग्रेसनंतर शिवसेनेचाही दावा; संजय राऊतांचा पोलिसांनाही गर्भीत इशारा
सोलापुरातील जागेवर काँग्रेसनंतर शिवसेनेचाही दावा; संजय राऊतांचा पोलिसांनाही गर्भीत इशारा
Ajit Pawar : अजित पवारांचा महायुतीतील मित्र पक्षांना इशारा, म्हणाले; समाजात धार्मिक ध्रुवीकरण करणाऱ्यांवर कारवाई करायला हवी
अजित पवारांचा महायुतीतील मित्र पक्षांना इशारा, म्हणाले; समाजात धार्मिक ध्रुवीकरण करणाऱ्यांवर कारवाई करायला हवी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ladki Bahin Yojana Scheme benefits : लाडकी बहीण योजनेतून मिळालेल्या पैशांचा योग्य विनियोगSitaram Yechury Death : ज्येष्ठ माकप नेते सीताराम येचुरी यांचं निधन, सीताराम येचुरींचा परिचयBhagyashri Aatram : धर्मरावबाबा आत्रामांची कन्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीत Special ReportWare Nivadnukiche : वारे निवडणुकीचे सुपरफास्ट बातम्यांचा आढावा  : 12 Sep 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mamata Bannerjee: मी दोन तास वाट पाहिली, मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास तयार; ममता बॅनर्जींकडून जनतेची माफी
मी दोन तास वाट पाहिली, मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास तयार; ममता बॅनर्जींकडून जनतेची माफी
तृतीयपंथीयांचा धुमधडाक्यात गणपती बाप्पा; भक्तीगीतांसह गणरायाकडे केलीय खास प्रार्थना
तृतीयपंथीयांचा धुमधडाक्यात गणपती बाप्पा; भक्तीगीतांसह गणरायाकडे केलीय खास प्रार्थना
Sanjay Raut: सोलापुरातील जागेवर काँग्रेसनंतर शिवसेनेचाही दावा; संजय राऊतांचा पोलिसांनाही गर्भीत इशारा
सोलापुरातील जागेवर काँग्रेसनंतर शिवसेनेचाही दावा; संजय राऊतांचा पोलिसांनाही गर्भीत इशारा
Ajit Pawar : अजित पवारांचा महायुतीतील मित्र पक्षांना इशारा, म्हणाले; समाजात धार्मिक ध्रुवीकरण करणाऱ्यांवर कारवाई करायला हवी
अजित पवारांचा महायुतीतील मित्र पक्षांना इशारा, म्हणाले; समाजात धार्मिक ध्रुवीकरण करणाऱ्यांवर कारवाई करायला हवी
Ganeshotsav : जय देव जय देव जय मंगलमूर्ती; वर्षा निवासस्थानी क्लॉस श्वाब यांनी सपत्नीक केली बाप्पांची आरती
जय देव जय देव जय मंगलमूर्ती; वर्षा निवासस्थानी क्लॉस श्वाब यांनी सपत्नीक केली बाप्पांची आरती
Sitaram Yechury आयुष्यभर कष्टकऱ्यांसाठी झिजले, मृत्यूनतंरही समाजाच्या कामी आले; सिताराम येचुरींचे 'देहदान'
आयुष्यभर कष्टकऱ्यांसाठी झिजले, मृत्यूनतंरही समाजाच्या कामी आले; सिताराम येचुरींचे 'देहदान'
पगारवाढ 2020 नाही, तर 2024 पासून मिळणार, एसटी कामगारांना फसवलं; श्रीरंग बरगेंकडून संताप
पगारवाढ 2020 नाही, तर 2024 पासून मिळणार, एसटी कामगारांना फसवलं; श्रीरंग बरगेंकडून संताप
निरोप कॉम्रेड...  कामगार, शेतकऱ्यांचा आवाज हरपला; येचुरींच्या निधनानंतर शरद पवार, राहुल गांधींकडून शोक
निरोप कॉम्रेड... कामगार, शेतकऱ्यांचा आवाज हरपला; येचुरींच्या निधनानंतर शरद पवार, राहुल गांधींकडून शोक
Embed widget