एक्स्प्लोर
मालेगावात नागरिक संतप्त, बँक कर्मचाऱ्यांना बँकेतच कोंडलं!

मालेगाव : जनता सहकारी बँकेच्या कर्मचाऱ्यांना नागरिकांनी बँकेतच कोंडल्याचं समोर आले आहे. दिवसभर रांगेत उभं राहूनही नोटा बदलून मिळत नसल्याने नागरिकांचा संताप अनावर झाला आणि त्यांनी थेट बँक कर्मचाऱ्यांनाच कोंडून ठेवलं. मालेगावातील जनता सहकारी बँकेत नोटा बदलण्यासाठी ग्राहक दिवसभर रांगेत उभे होते. मात्र, सहा वाजता बँक बंद होण्याची वेळ आली, तरी काही लोकांना नोटा बदलून मिळाल्या नाहीत. त्यामुळे संतप्त जमावाने बँकेचं शटर बंद करून कर्मचाऱ्यांना कार्यालयातचं कोडंलं. नोटबंदीच्या निर्णयाला 9 दिवस उलटले. मात्र, अजूनही नोटांसाठी अनेक ठिकाणी लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत. काळ्या पैशाविरोधातील लढाईला बळ मिळावं म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठं पाऊल उचलत, 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर लोकांनी नोटा बदलण्यासाठी बँकांबाहेर गर्दी केली. अनेक लोकांचे दैनंदिन व्यवहार कोलमडले. त्यामुळे अनेक ठिकाणी नागरिकांच्या सहनशीलतेचा उद्रेक झाल्याच्या घटना समोर येत आहेत.
आणखी वाचा























