पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरण! ती जमीन महार वतनाची नाही तर... एकनाथ खडसेंचा मोठा गौप्यस्फोट
पुण्यातील कोरेगावमधील 40 एकर जमिनीच्या खरेदीवरुन उपमुख्यमंत्री अजित पवारांचे ( Ajit Pawar) चिरंजिव पार्थ पवार (Parth Pawar) अडचणीत सापडले आहेत. याबाबात एकनाथ खडसे यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.
Eknath Khadse on Parth Pawar land scam : पुण्यातील कोरेगावमधील 40 एकर जमिनीच्या खरेदीवरुन उपमुख्यमंत्री अजित पवारांचे ( Ajit Pawar) चिरंजिव पार्थ पवार (Parth Pawar) अडचणीत सापडले आहेत. तब्बल 1804 कोटी रुपये किंमतीची ही जमीन केवळ 300 कोटी खरेदी झाल्याचा समोर आले आहे. याच मुद्यावर राष्ट्रवादी काँग्रेस शऱद पवार गटाचे नेते आणि आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या प्रकरणाबाबत एकनाथ खडसे यांनी मोठा गौप्यस्फोट केल आहे.
नेमकं काय म्हणाले एकनाथ खडसे?
पार्थ पवार यांच्यावर ज्या जमिनीच्या बाबत आरोप होत आहेत, ती जमीन महार वतनाची नाही तर सरकारची जमीन आहे. याबाबत आपल्याकडे पुरावे आहेत, असे मत एकनाथ खडसे यांनी व्यक्त केले. एकनाथ खडसे यांनी या जमिनीचा मागचा इतिहासच माध्यमांच्या पुढे जाहीर केला आहे.
जिल्हा उपनिबंधकाला अटक करुन त्याची नार्को टेस्ट
या घटनेत सरकारने चौकशा लावत बसण्यापेक्षा, ज्या खरेदी विक्री जिल्हा उपनिबंधकाने ही जमीन खरेदी विक्रीचा व्यवहार नोंदविला, त्याला तातडीने अटक करुन त्याची नार्को टेस्ट करावी. कारण या सगळ्या प्रकारात कोण कोण सहभागी आहे, त्यांच्या नावांसह सत्य समोर येणार असल्याचे खडसे यांनी म्हटलं आहे.
मी मंत्री असतानाही याबाबत मंजुरीसाठी ही फाईल आपल्याकडे आली होती
ज्या जमिनीच्या माध्यमातून शासनाची फसवणूक केली गेली, त्या साठी राजकीय वरदहस्त असल्याशिवाय हे शक्य नसल्याचे मत एकनाथ खडसे यांनी व्यक्त केले. आपण मंत्री असतानाही याबाबत मंजुरीसाठी ही फाईल आपल्याकडे आली होती. त्यासाठी आपल्यावर बाहेरच्या व्यक्ती मार्फत दबाव देखील आणण्यात आला होता. मात्र, आपण त्याला मंजुरी दिली नसल्याची माहिती देखील एकनाथ खडसे यांनी दिली आहे.
नेमकं प्रकरण काय? (Pune Parth Pawar Land)
1800 कोटींची जमीन पार्थ पवारांच्या कंपनीने केवळ 300 कोटींमध्ये घेतली तसंच यासाठी स्टँप ड्युटी म्हणून केवळ 500 रूपये मोजल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादस दानवे यांनी केला. महत्वाचं म्हणजे पार्थ पवारांनी कोरेगाव पार्कात आयटी पार्क आणि डेटा सेंटर उभारण्याची तयारीही चालवली, एक लाखाचे भांडवल असलेल्या कंपनीला हे कसे काय शक्य होते, असा सवाल अंबादास दानवेंनी उपस्थित केलाय. या व्यवहारासाठी उद्योग संचालनालयाने 48 तासात स्टॅम्प ड्युटीही माफ केली, तर केवळ 27 दिवसांत हा व्यवहार झाला असं अंबादास दानवे म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:























