"पार्थ नाराज झाला पण तो विसरुन जाईल", आत्या विजया पाटील यांची प्रतिक्रिया
पार्थ पवार यांनी गेल्या पंधरा दिवसात घेतलेल्या भूमिकेमुळं महाराष्ट्रात अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत. त्यात आता पार्थ यांनी आपले काका आणि आत्या यांच्याशी चर्चा करुन योग्य निर्णय घेणार असल्याचं म्हटलं आहे.
कोल्हापूर : पार्थ पवार यांच्याबद्दल शरद पवार यांनी सार्वजनिक ठिकाणी वक्तव्य केल्यानं दोन दिवस महाराष्ट्रात चर्चेला उधान आल आहे. या सगळ्या प्रकारानंतर पार्थ पवार यांनी काका आणि आत्यांशी बोलून निर्णय घेतला जाणार असल्याचं म्हटलं आहे. कोल्हापुरात पार्थ पवार यांच्या आत्या विजया पाटील राहतात. त्यांनी यावर प्रतिक्रिया दिल्या असून त्या म्हणाल्या, "पार्थ यांना वैयक्तिक भूमिका मांडण्याचा अधिकार आहे. आजोबा सार्वजनिक ठिकाणी बोलल्यामुळे पार्थ हा नाराज झाला असेल मात्र तो विसरून देखील जाईल. पार्थ हा आमच्या घरातील सगळ्यात समजूतदार आहे.
पार्थ पवार यांनी गेल्या पंधरा दिवसात घेतलेल्या भूमिकेमुळं महाराष्ट्रात अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत. त्यात आता पार्थ यांनी आपले काका आणि आत्या यांच्याशी चर्चा करुन योग्य निर्णय घेणार असल्याचं म्हटलं आहे. पवार साहेब यांनी सार्वजनिक ठिकाणी पार्थ बद्दल बोलल्यामुळं तो नाराज झाला आहे. पण तो लगेचच विसरुन देखील जाईल असं विजया पाटील म्हणाल्या. आजोबांना नातवाला रागावण्याच्या पूर्ण अधिकार आहे. सगळ्यांच्याच घरी वडिलधारी माणसं समजावत असतात. मात्र शरद पवारांना असं रागवताना पहिल्यांदाच पाहिल्याचं देखील पाटील म्हणाल्या.
"पार्थ पवार हा अतिशय समजूतदार आहे आणि सध्या जी काय परिस्थिती आहे ती हाताळण्यासाठी पवार कुटूंब सक्षम आहे. मुळात इतका विषय वाढवण्याचीच काही गरज नव्हती. पार्थ हा आता सगळे काका आणि आत्या यांच्याशी बोलणार आहे. अजून तरी पार्थ यांचा फोन आला नाही. पण तो सुप्रियाताई सुळे यांच्याशी बोलला. त्या तर पार्थची सगळ्या आवडती आत्या आहे. ज्या वेळी पार्थ या सगळ्या संदर्भात चर्चा करेल त्यावेळी योग्य तो सल्ला दिला जाणार", असल्याचंही विजया पाटील म्हणाल्या आहेत.
शरद पवार काय म्हणाले होते? पार्थ पवार यांनी काही दिवसांपूर्वीच राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेऊन सुशांत सिंह राजपूत प्रकरणाची सीबीआय चौकशी करावी अशी मागणी केली होती. तशा आशयाचं पत्र त्यांनी गृहमंत्र्यांना दिलं होतं. यावर शरद पवार यांनी पार्थ पवार यांच्याबाबत कठोर भूमिका घेतली आहे. याविषयी शरद पवार म्हणाले की, "नातवाच्या बोलण्याला कवडीचीही किंमत आम्ही देत नाही. त्यांचं वक्तव्य इमॅच्युअर आहे. परंतु सीबीआय चौकशी जर कोणाला करायची असेल, मी स्पष्ट सांगितलं की माझा महाराष्ट्र आणि मुंबई पोलिसांवर 100 टक्के विश्वास आहे. पण कोणाला असं वाटत असेल की सीबीआय चौकशीची मागणी करावी, तर त्यालाही कोणी विरोध करायचं कारण नाही."
संबंधित बातम्याकाका, आत्यांशी बोलून पार्थ पवार निर्णय घेणार!
आजोबांचा सल्ला आशीर्वाद म्हणून घेतल्यास ताण कमी होईल : सामना
'नया है वह', छगन भुजबळ यांच्याकडून पार्थ पवार यांचं वर्णन
'पार्थ, तुम्ही जन्मत: फायटर', पद्मसिंह पाटील यांच्या नातवाची पार्थ यांच्या समर्थनार्थ पोस्ट
पार्थ पवार यांचं वक्तव्य इमॅच्युअर, त्यांच्या बोलण्याला कवडीचीही किंमत देत नाही : शरद पवार