एक्स्प्लोर
Advertisement
परळी-वैद्यनाथ देवस्थानचा रेल्वेच्या राष्ट्रीय तीर्थस्थळांच्या यादीत समावेश
रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी परळी रेल्वे स्थानकाचा रेल्वेच्या राष्ट्रीय तीर्थक्षेत्रांच्या यादीत समावेश केला आहे. त्यासंबंधीचं पत्रही खासदार प्रीतम मुंडे यांना पाठवण्यात आलं आहे.
बीड : परळीचे वैद्यनाथ देवस्थान आता खऱ्या अर्थाने संपूर्ण भारताशी कनेक्ट होणार आहे. परळी वैद्यनाथ रेल्वेच्या राष्ट्रीय तीर्थस्थळांच्या यादीत समावेश झाला आहे. मविकास व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे आणि खासदार प्रीतम मुंडे यांच्या पाठपुराव्याला यश मिळालं आहे.
बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेले प्रभू वैद्यनाथाचे देवस्थान आता संपूर्ण भारताशी 'कनेक्ट' झाले आहे. रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी परळी रेल्वे स्थानकाचा रेल्वेच्या राष्ट्रीय तीर्थक्षेत्रांच्या यादीत समावेश केला आहे. त्यासंबंधीचं पत्रही खासदार प्रीतम मुंडे यांना पाठवण्यात आलं आहे.
राज्याचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी जाहीर सभांमधून परळी-वैद्यनाथ मंदिराचा ज्योतिर्लिंगामध्ये कधी समावेश होणार, असा सवाल पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे यांना विचारला होता.
परळी रेल्वे स्थानकाला बारा ज्योर्तिलिंगांशी 'दर्शन' रेल्वेद्वारे जोडण्याची मागणी राज्याच्या ग्रामविकास व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्याकडे केली होती. प्रीतम मुंडे यांनी या मागणीचा सातत्याने पाठपुरावा केला होता.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेडिंग न्यूज
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement